ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

1) पोर्तुगीज, …………….., फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

अ) ऑस्ट्रियन

ब) डच

क) जर्मन

ड) स्वीडीश

उत्तर :

पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

2) 1802 मध्ये ……………. पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

अ) थोरले बाजीराव

ब) सवाई माधवराव

क) पेशवे नानासाहेब

ड) दुसरा बाजीराव

उत्तर :

1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

3) जमशेदजी टाटा यांनी…………….. येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.

अ) मुंबई

ब) कोलकाता

क) जमशेदपूर

ड) दिल्ली

उत्तर :

जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.

प्रश्न. 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) मुलकी नोकरशाही

उत्तर :

भारतात स्थापन केलेली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये, असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्यांचे पगार वाढवले.

प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती ‘इंडियन सिव्हिल सिर्व्हिसेस’ (आय. सी. एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.

2) शेतीचे व्यापारीकरण

उत्तर :

इंग्रजी सत्तेच्या पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. मात्र इंग्रज सरकारने कापूस, नीळ व तंबाखू यांसारख्या नगदी पिकांना उत्तेजन दिले. त्यामुळे लोकांनी अन्नधान्यांऐवजी जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर भर दिला. या प्रक्रियेला ‘शेतीचे व्यापारीकरण’ असे म्हणतात.

3) इंग्रजांची आर्थिक धोरणे

उत्तर :

इंग्लंड हे आधुनिक व विकसित राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. इंग्रजांनी इंग्लंडमधील भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.

उत्तर :

जमीन महसुल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.

2) भारतातील जुन्या उद्योग धंद्यांचा ऱ्हास झाला.

उत्तर :

इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते. तेथे औद्योगिक कारणामुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले. तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकरत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागीरांना कठीण झाले. परिणामी उद्योगधंदे बंद पडले.

प्रश्न. 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती कार्ये
लॉर्ड कॉर्नवालिस ……………………
……………………सतीबंदीचा कायदा केला.
लॉर्ड डलहौसी ……………………
……………………‘एशिया टिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना

उत्तर :

व्यक्ती कार्ये
लॉर्ड कॉर्नवालिस नोकरशाहीची निर्मिती
लॉर्ड बेंटिंकसतीबंदीचा कायदा केला.
लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कयदा
विल्यम जोन्स‘एशिया टिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना

Leave a Comment