सुरांची जादुगिरी स्वाध्याय

सुरांची जादुगिरी स्वाध्याय

सुरांची जादुगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. चौकट पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

अ) खेडे जिथे विसावते ते ठिकाण –

उत्तर :

सौंदर्याने माखलेले

आ) खेड्याला दिलेली उपमा –

उत्तर :

रानफुले

इ) लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य –

उत्तर :

दळणाचे जाते.

प्रश्न. 3. का ते लिहा.

अ) घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण………..

उत्तर :

अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभतो.

आ) कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण ………………

उत्तर :

ते दुधासाठी आसुसलेले असते.

प्रश्न. 4. खालील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

अ) पहाटेला पुरती जाग आली नव्हती.

उत्तर :

अजून पूर्ण पहाट झाली नव्हती.

आ) थोड्या वेळाने दिशांना आकार आला.

उत्तर :

प्रकाशाने दिशा उजळतात.

इ) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.

उत्तर :

थोडा प्रकाश पडल्याने अंधार मंद झाला.

प्रश्न. 5. योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू
2) सकाळचे हे संगीत
3) एखादा पोपट
4) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे
5) कोंबड्यांचा कॉक – कॉक असा
अ) या संगीतात आपल्या सुरांनी म्हणजे भर घालतो.
आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.
इ) ठेका धरणारा आवाज.
ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात.
उ) वाद्यवृंदासारखे वाटते.

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू
2) सकाळचे हे संगीत
3) एखादा पोपट
4) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे
5) कोंबड्यांचा कॉक – कॉक असा
ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात.
उ) वाद्यवृंदासारखे वाटते.
अ) या संगीतात आपल्या सुरांनी म्हणजे भर घालतो.
आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.
इ) ठेका धरणारा आवाज.

प्रश्न. 6. ‘आवाजाची सोबत’ ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

खेड्यात विविध आवाज आपल्या सोबतीला असतात, तसे ते शहरात नसतात. दळणाचे जाते, गोठ्यात बांधलेल्या गाई, बकऱ्यांचे आवाज इ. आवाज शहरात ऐकायला मिळत नाहीत. पहाटेपूर्वीपासूनच खेड्यात आवाज सुरू होतात ते रात्रीपर्यंत आपली सोबत करतात. अशी आवाजाची सोबत ही संकल्पना आहे. खेड्यात सोबतीला आवाज असतोच.

प्रश्न. 7. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.

ऐकावेसे वाटणारे आवाज त्रासदायक वाटणारे आवाज

उत्तर :

ऐकावेसे वाटणारे आवाज त्रासदायक वाटणारे आवाज
i) कोकिळेचे
ii) चिमण्यांचे
iii) बाळाचे बोल
iv) आकाशवाणीवरचे भक्तिगीत
i) मोटरचे हॉर्न
ii) दुचाकीचा आवाज
iii) आगीच्या बंबाचे सावरन
iv) अँबुलन्स

प्रश्न. 8. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा.

उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.

उत्तर :

i) खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो.

ii) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असते.

iii) मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या सुरात आपल्या सुराची भर घालत असतो.

iv) आपल्या मनात लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते.

खेळूया शब्दांशी

अ) पाठाधारे विशेष्य-विशेषणांच्या जोड्या लावा.

उत्तर :

विशेषण विशेष्य
आसुसलेला
कुर्रेबाज
मुलायम
भरभरीत
किरटा
लडिवाळ
टाहो
तान
स्पर्श
झांज
आवाज
मांडी

आ) तक्ता पूर्ण करा.

शब्दसामान्यरूप विभक्ती प्रत्यय
सुराने
सुरात
सुराचे
सुराला
सुराशी

उत्तर :

शब्दसामान्यरूप विभक्ती प्रत्यय
सुराने रा रे
सुरात रा
सुराचेराचे
सुराला राला
सुराशी राशी

आपण समजून घेऊया

खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.

मी पत्र लिहितो.

अ) लिहिणारा तो कोण → [मी] कर्ता

आ) लिहिले जाणारे ते काय → [पत्र] कर्म

इ) वाक्यातील क्रिया कोणती → [लिहितो] क्रियापद

कर्तरी प्रयोग

वाक्याच्या शेवटी ‘येणे’ या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

1) मी शाळेतून आत्ताच …………….. (येणे)

उत्तर :

मी शाळेतून आत्ताच आलो.

2) ती शाळेतून आत्ताच …………….. (येणे)

उत्तर :

ती शाळेतून आत्ताच आली.

3) रवी शाळेतून आत्ताच……………. (येणे)

उत्तर :

रवी शाळेतून आत्ताच आला.

4) विद्यार्थी शाळेतून आत्ताच……………… (येणे)

उत्तर :

विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले.

कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पूर्ण करा.

1) मुली क्रिकेट ……………….. (खेळणे)

उत्तर :

मुली क्रिकेट खेळतात.

2) तुम्ही क्रिकेट ……………….. (खेळणे)

उत्तर :

तुम्ही क्रिकेट खेळता.

3) आम्ही क्रिकेट ……………….. (खेळणे)

उत्तर :

आम्ही क्रिकेट खेळतो.

4) जॉन क्रिकेट ……………….. (खेळणे)

उत्तर :

जॉन क्रिकेट खेळतो.

5) समिरा क्रिकेट ……………….. (खेळणे)

उत्तर :

समिरा क्रिकेट खेळते.

Leave a Comment