आर्द्रता व ढग स्वाध्याय
आर्द्रता व ढग स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल
प्रश्न. 1. योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा.
अ | ब | क |
---|---|---|
अ) सिरस आ) क्युम्युलोनिम्बस इ) निम्बोस्ट्रेटस ई) अल्टोक्सुम्युलस | i) आकाशात उभा विस्तार ii) जास्त उंचीवरील iii) मध्यम उंचीवरील iv) कमी उंचीवरील | a) गरजणारे ढग b) तरंगणारे ढग c) रिमझिम पाऊस d) हिमस्फटिक ढग |
उत्तर:
अ | ब | क |
---|---|---|
अ) सिरस आ) क्युम्युलोनिम्बस इ) निम्बोस्ट्रेटस ई) अल्टोक्सुम्युलस | ii) जास्त उंचीवरील i) आकाशात उभा विस्तार iv) कमी उंचीवरील iii) मध्यम उंचीवरील | d) हिमस्फटिक ढग a) गरजणारे ढग c) रिमझिम पाऊस b) तरंगणारे ढग |
प्रश्न. 2. कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा.
(क्युम्युलोनिम्बस, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता)
1) हवेची ………………. हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
उत्तर :
हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
2) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून ……………… काढली जाते.
उत्तर :
एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते.
3) वाळवंटी प्रदेशात …………….. कमी असल्याने हवा कोरडी असते.
उत्तर :
वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते.
4) ……………… प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
उत्तर :
क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
5) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे ………………… वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
उत्तर :
मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
प्रश्न. 3. फरक स्पष्ट करा.
1) आर्द्रता व ढग
उत्तर :
आर्द्रता | ढग |
---|---|
i) प्रत्येक दिवशी सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठावरील पाण्याचे बाष्पात रुपांतर होते. या हवेतील बाष्पाच्या प्रमाणात हवेची आर्द्रता असे म्हणतात. ii) आर्द्रतेचे मुख्य दोन प्रकार आहेत. 1) निरपेक्ष आर्द्रता व 2) सापेक्ष आर्द्रता इत्यादी iii) आर्द्रतेमध्ये बाष्पीभवनाची क्रिया घडते. | i) सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्मजलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ii) ढगाचे मुख्य तीन प्रकार आहेत. 1) जास्त उंचीवरील ढग. 2) मध्यम उंचीवरील ढग. 3) कमी उंचीवरील ढग इत्यादी. iii) ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. |
2) सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता
उत्तर :
सापेक्ष आर्द्रता | निरपेक्ष आर्द्रता |
---|---|
i) एका विशिष्ट तापमान व आकारमानाच्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच तापमानातील त्याच हवेची बाष्पधारणक्षमता यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. ii) निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रता सांगता येते. iii) तापमानातील फरकानुसार हवेतील सापेक्ष आर्द्रता बदलते. | i) हवेत प्रत्यक्ष असलेल्या बाष्पाच्या प्रमाणास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. ii) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे. त्यावरून निरपेक्ष आर्द्रता सांगता येते. iii) पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. |
3) क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिम्बस ढग
उत्तर :
क्युम्युलस ढग | क्युम्युलोनिम्बस ढग |
---|---|
i) क्युम्युलस ढग हे आल्हाददाय हवेचे निदर्शक असतात. ii) हे ढग करड्या रंगाचे असतात. iii) हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. iv) या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रुपांतर होते व वृष्टी होते. | i) क्युम्युलोनिम्बस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण वादळाचे निदर्शक आहेत. ii) हे ढग काळ्या रंगाचे असतात. iii) हे ढग घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. iv) या ढगांतून वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते व विजाच्या कडकडाटासह पाऊस पडतो. |
प्रश्न. 4. प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते ?
उत्तर :
i) तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते.
ii) ज्या प्रदेशातील सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्या प्रदेशातील हवा कोरडी असते.
2) आर्द्रतेचे मापन कसे केले जाते ?
उत्तर :
आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते.
3) सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
उत्तर :
सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या गोष्टी आवश्यक आहेत.
4) ढग म्हणजे काय ? ढगांचे प्रकार लिहा.
उत्तर :
सांद्रीभवनांमुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ढगांचे उंचीनुसार तीन मुख्य प्रकार करता येतात.
अ) जास्त उंचीवरील ढग – यात सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या ढगांच्या प्रकाराचा समावेश होतो.
ब) मध्यम उंचीवरील ढग – यात अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो.
क) कमी उंचीवरील ढग – यात स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगांचा समावेश होतो.
क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिम्बस ढग हेही ढगांचेच प्रकार आहेत.
5) कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो ?
उत्तर :
अल्ट्रो स्ट्रेटस, अल्टो क्युम्युलस, स्ट्रॅटोक्युम्युल, स्ट्रॅटस, निम्बरेस्टॉटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिम्बस इत्यादी प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो.
6) सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे ?
उत्तर :
सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी ही निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे.
प्रश्न. 5. भौगोलिक कारणे लिहा.
1) ढग हे आकाशात तरंगतात.
उत्तर :
कारण – i) वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते.
ii) सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात.
iii) हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. म्हणून ढग हे आकाशात तरंगतात.
2) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
उत्तर :
कारण – i) तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते.
ii) उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. अशाप्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
3) हवा बाष्पसंपृक्त बनते.
उत्तर :
कारण – i) एका घनमीटर हवेत 150° से तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंपृक्त आहे, असे म्हणतात.
ii) जेव्हा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. तेव्हा हवा बाष्पसंपृक्त बनते.
4) क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगात रूपांतर होते.
उत्तर :
कारण – i) क्युम्युलस ढगाचा भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो.
ii) हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर होते.
प्रश्न. 6. उदाहरण सोडवा.
1) हवेचे तापमान 30° से असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.36 ग्रॅम/मी3 असते जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रतिघन मीटर असेल, तर सापेक्ष आर्द्रता किती असेल ?
उत्तर :
2) एक घनमीटर हवेत o° से तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल ?
उत्तर :
एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. एक घनमीटर हवेत o° से तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता 4.08 ग्रॅम/मी3 असेल.
प्रश्न. 7. वर्तमानपत्रातून झालेली दैनिक हवेची स्थितीदर्शक माहिती जुलै महिन्यासाठी संकलित करा. कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यांतील सहसंबंध जोडा.
उत्तर :
जून 2018 मधील कमाल व किमान तापमान
दिनांक | कमाल | किमान |
---|---|---|
01/06/2018 02/06/2018 03/06/2018 04/06/2018 05/06/2018 06/06/2018 07/06/2018 08/06/2018 09/06/2018 10/06/2018 11/06/2018 | 47° 45° 46° 43° 42° 40° 42° 43° 44° 43° 42° | 42° 43° 40° 39° 35° 33° 37° 39° 40° 38° 39° |
दिलेल्या तक्त्यावरून असे लक्षात येते की, ज्या दिवशी तापमान जास्त होते त्या दिवशी आर्द्रता कमी होती. व ज्या दिवशी तापमान कमी होते त्या दिवशी आर्द्रता जास्त होती.