बोलतो मराठी स्वाध्याय

बोलतो मराठी स्वाध्याय

बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

प्रश्न. 1. आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. शब्दांची व्युपत्ती शोधण्याचे फायदे लिहा.

उत्तर :

प्रश्न. 3. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अ) मराठी भाषेची खास शैली

उत्तर :

वाक्यप्रचार

आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा

उत्तर :

हवा

इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन

उत्तर :

शब्दकोश

प्रश्न. 4. गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

अ) ऐट, डौल, रुबाब, चैन

उत्तर :

चैन

आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल

उत्तर :

हस्त

इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय

उत्तर :

विनोद

ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत

उत्तर :

कांता

उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध

उत्तर :

प्रज्ञा

प्रश्न. 6. खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

अ) रस्ते

उत्तर :

रस्ते – रस्ता

वाक्य – हा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे.

आ) वेळा

उत्तर :

वेळा – वेळ

वाक्य – माझी जेवणाची वेळ झाली.

इ) भिंती

उत्तर :

भिंती – भिंत

वाक्य – ही भिंत जुनी असुनही मजबूत आहे.

ई) विहिरी

उत्तर :

विहिरी – विहिर

वाक्य – या विहिरीला उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते.

उ) घड्याळे

उत्तर :

घड्याळे – घड्याळ

वाक्य – हे घड्याळ खूप महाग आहे.

ऊ) माणसे

उत्तर :

माणसे – माणूस

वाक्य – माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो.

प्रश्न. 6. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

अ) पसरवलेली खोटी बातमी –

उत्तर :

अफवा

आ) ज्याला मरण नाही असा –

उत्तर :

अमर

इ) समाजाची सेवा करणारा –

उत्तर :

समाजसेवक

ई) संपादन करणारा –

उत्तर :

संपादक

प्रश्न. 7. स्वमत

अ) ‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.

उत्तर :

‘तुम्ही शहाणे आहात’, असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणा वर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलाला, “बाळा तू शहाणा आहेस” असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते. आपला मुलगा विवेकी आहे. तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही, असा तिला विश्वास असतो. कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते.

मात्र प्रत्येक वेळेला ‘ तुम्ही शहाणे आहात’, या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. मग त्यांना ‘तुम्ही शहाणे आहात’, असे ऐकवावे लागते. येथे ‘शहाणे’ हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात ‘तुम्ही अतिशहाणे आहात’, म्हणजे ‘तुम्ही मूर्ख आहात’ असेच म्हणत असतो.

आ) ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.

उत्तर :

लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे. परभाषेची मैत्री करावी पण तिचे गुलाम बनू नये. ‘मी टेन्थमध्ये आहे’ यातून तोच अर्थ कळतो जो ‘मी दहावीत आहे’ या म्हणण्यातून कळते. गरज नसताना परभाषेतले शब्द वापरणे यात आपल्या मायबोलीचा न कळत आपण अपमान करत असतो.

इ) लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा सन्मान केला आहे. त्या म्हणतात की, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मारणे हे एकच क्रियापद गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. मराठीतील वाक्यप्रचार ही मराठीची खास शैली आहे. नुसते ‘पोट’ या अवयवावर किती तरी वाक्प्रचार आहे. पोटी येणे(जन्म), पोटात येणे(मत्सर), पोट येणे(अवैध गर्भ) इत्यादी. भाषेचे जीवनातील महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. तिचा सन्मान राखायला हवा. तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. कारण मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. असा लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान केला आहे.

Leave a Comment