सागरतळरचना स्वाध्याय

सागरतळरचना स्वाध्याय

सागरतळरचना स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडा.

अ) जमिनीवरून भुरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरुपे आढळतात कारण ……………

i) पाण्याखाली जमीन आहे.

ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.

iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे,

iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

उत्तर :

जमिनीवरून भुरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरुपे आढळतात कारण पाण्याखाली जमीन आहे.

आ) मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ?

i) भूखंडमंच

ii) खंडान्त उतार

iii) सागरी मैदान

iv) सागरी डोह

उत्तर :

मानव सागरतळरचनेचा भूखंडमंच भाग प्रामुख्याने वापरतो.

इ) खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे ?

i) नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष

ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी-वनस्पती अवशेष

iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पती अवशेष, सागरी मैदाने

उत्तर :

ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

प्रश्न. 2. अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकरांना योग्य नावे द्या.

उत्तर :

आ) वरील आराखड्यातील कोणती भुरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत ?

उत्तर :

सागरी डोह व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत.

इ) कोणती भुरुपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत ?

उत्तर :

सागरी किनारा ही भुरुपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत.

प्रश्न. 3. भौगोलिक कारणे लिहा.

अ) सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

उत्तर :

कारण – i) जमिनीवर असणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात आहेत.

ii) महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागरतळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागरतळरचनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

iii) भूपृष्ठाप्रमाणेच सागरातही अनेक भुरूपे निर्माण झाली आहेत. तसेच महासागरात खनिजांचे भांडार आहे. धातू व अधातूंचा प्रचंड साठा आहे. म्हणूनच सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

आ) भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.

उत्तर :

कारण – i) मानवाच्या दृष्टीने भूखंडमंच महत्त्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंडमंचावरच आढळतात.

ii) भूखंडमंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे तळापर्यंत पोहचतात. तेथे शेवाळ, प्लवंक या सागरी वनस्पतींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते.

iii) त्यामूळे जास्त जलचर प्राणी या भागात आढळतात. हे क्षेत्र मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त असते. म्हणून भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.

इ) काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.

उत्तर :

कारण – i) सागरात असणाऱ्या व सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या लहान भूभागास सागरी बेटे म्हणतात.

ii) सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किमी रुंद तर हजारो किमी लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. म्हणून काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.

ई) खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.

उत्तर :

कारण – i) भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो.

ii) खंडान्त उताराला लागून सागरतळाशी विस्तीर्ण मैदाने सुरू होतात.

iii) म्हणजे भूखंडमंच व सागरी मैदान यांच्यामध्ये खंडान्त उतार आहे. म्हणून खंडान्त उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात.

उ) मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.

उत्तर :

कारण – i) शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्ग पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिक इत्यादी मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते.

ii) या पदार्थामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत. यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रवमूल्य अधिक आहे. म्हणून मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थाचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.

प्रश्न. 4. पृष्ठ क्रमांक 27 वरील ‘पहा बरे जमते का ?’ मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भुरुपांशी संबंधित आहे ?

उत्तर :

मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या सागरी बेटे या भुरुपांशी संबंधित आहे.

आ) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत ?

उत्तर :

मादागास्कर बेट हे आफ्रिका खंड व श्रीलंका बेट हे आशिया खंडाजवळ आहेत.

इ) आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत ?

उत्तर :

आपल्या देशातील बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत.

Leave a Comment