माझ्या देशावर माझे प्रेम आहे स्वाध्याय
माझ्या देशावर माझे प्रेम आहे स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी
प्रश्न. 1. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
अ) प्रतिज्ञा
उत्तर :
प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे, असा दृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दामधून व्यक्त होतो.
आ) सस्यश्यामला माता
उत्तर :
सस्य म्हणजे पिकलेले धान्य. पिकलेल्या धान्याने समृध्द अशी काळी माती असलेली भारत माता.
प्रश्न. 2. खालील आकृत्या पूर्ण करा.
अ)
1) ‘भारतमाता की जय’ मधील भारतमाता म्हणजे
उत्तर :
भारतातली सर्व लोक
2) महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये
उत्तर :
i) सक्रिय
ii) सुबुद्ध
आ)
उत्तर :
प्रश्न. 3. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा.
विचार | व्यक्ती |
---|---|
अ) ‘भारतमाता’ म्हणजे भारतातले सर्व लोक. | 1) ………………….. |
आ) ‘प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही.’ | 2) ………………….. |
इ) ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ | 3) ………………….. |
उत्तर :
विचार | व्यक्ती |
---|---|
अ) ‘भारतमाता’ म्हणजे भारतातले सर्व लोक. | 1) पं. जवाहरलाल नेहरू |
आ) ‘प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही.’ | 2) महात्मा गांधी |
इ) ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ | 3) साने गुरुजी |
प्रश्न. 4. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ) प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर :
प्रतिज्ञेत ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत असे वाक्य आहे. यातील बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा, आमच्या आळीत शिक्षणासाठी आलेले रहीम व त्याचा छोटा भाऊ राहतो. आळीतली माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात, जणू ते अतिरेकेच आहे या भावनेने एकदा रहीम एकाएकी आजारी पडला. त्याचा लहान भाऊ अनेक घरी जाऊन त्याने त्याला दवाखान्यात नेण्याबद्दल मदत मागितली. कुणीच तयार झाले नाही. मी आणि दादा मात्र ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले. कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता.
आ) तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा.
उत्तर :
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये माझ्या सर्व मित्रांनी पोहणे शिकण्याचे ठरविले. मला मात्र पाण्यात उतरण्याची भीती वाटत असल्यामुळे मी शेवटपर्यंत नाही नाहीचा रट्टा लावला. त्यामुळे माझे सर्व मित्र माझी मजा घेऊ लागले, मला हसू लागले. भित्रा म्हणू लागले. हे माझ्या आईने ऐकले. तिला ते आवडले नाही. तिच्या मुलाला कोणी भित्रा म्हटलेले तिला आवडत नसे. कारण “आपण शिवरायांच्या वंशातले आहोत. मग आपण इतक्या छोट्या गोष्टीला का म्हणून घाबरायचे?” पण मला पाण्याची भीती वाटत असल्यामुळे माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नव्हता. मला पोहता यावे म्हणून आई मला स्वतः बरोबर जिथे पोहणे शिकवले जात होते, तिथे घेऊन गेली, आणि म्हणाली, “तू फक्त दुसऱ्यांना पोहतांना बघ. तुला नाही पाठवत पाण्यात.” परंतु तिने आधीच तिथल्या शिक्षकांशी बोलणे केले होते. ठरल्याप्रमाणे तिने मला त्या पाण्यात ढकलेले. मी जोरजोरात ओरडलो, ‘मेलो.. मेलो.. ‘ परंतु तिला काही फरक पडत नव्हता. मी माझी सर्व शक्ती एकवटून पोहता येत नसूनही पोहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या मदतीला तेथील आजूबाजूला असलेले शिक्षक आले. आणि माझी भीती कमी झाली. आज मी उत्तम जलतरणपटू आहे, तो मी माझ्या आईमुळेच. त्यावेळी तिने जर ‘तो’ निर्णय घेतला नसता, तर मी पोहणे शिकलोच नसतो.
माझी आई प्रेमळ आहे; परंतु ती वेळप्रसंगी कठोर होत असते. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम आहे, खरी माया आहे. कधी कठोर प्रेमाळे तर कधी गोड प्रेमाने.
खेळूया शब्दांशी
अ) समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.
उदा. पालनपोषण
1) दंगा –
उत्तर :
दंगा – मस्ती
2) कोड –
उत्तर :
कोड – कौतुक
3) थट्टा –
उत्तर :
थट्टा – मस्करी
4) धन –
उत्तर :
धन – दौलत
5) बाजार –
उत्तर :
बाजार – हाट
आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.
1) मी, आपण, रत्ना, त्यांचे
उत्तर :
रत्ना – कारण इतर शब्दांप्रमाणे तो सर्वनाम नाही.
2) राहणे, वाचणे, गाणे, आम्ही
उत्तर :
आम्ही – कारण इतर शब्दांप्रमाणे ते क्रियापद नाही.
3) तो, हा, सुंदर, आपण
उत्तर :
सुंदर – कारण इतर शब्दांप्रमाणे तो सर्वनाम नाही.
4) भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे
उत्तर :
करणे – कारण इतर शब्दांप्रमाणे तो विशेषण नाही.
इ) खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.
गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा.
पुल्लिंग | स्त्रीलिंग | नपुंसकलिंग |
---|---|---|
उत्तर :
पुल्लिंग | स्त्रीलिंग | नपुंसकलिंग |
---|---|---|
देश, शेला, मुलगा, निसर्ग | आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा, भाषा | गाव, गावे, काम, सणंग, मूल, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी, गीत |
ई) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
गगनभेदी घोष करणे, रचनात्मक काम करणे, पोटापलीकडे पाहणे, कचाट्यात सापडणे
i) गगनभेदी घोष करणे – भारताने क्रिकेटचा विश्वकप जिंकताच प्रेक्षकांनी गगनभेदी घोष केला.
ii) रचनात्मक काम करणे – म. फुले यांनी नुसतेच विचार दिले नाहीत तर मुलांसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा काढण्याचेही रचनात्मक काम केले.
iii) पोटापलीकडे पाहणे – पोटापालीकडे पाहणारेच खरे देशभक्त असतात.
iv) कचाट्यात सापडणे – फुटबॉलची स्पर्धा व शाळेची परीक्षा एकाच महिन्यात आल्यामुळे मी फुटबॉलचा सराव करावा की अभ्यास या कचाट्यात सापडलो होतो.
Hiii