मुघलांशी संघर्ष स्वाध्याय
मुघलांशी संघर्ष स्वाध्याय इयत्ता सातवी
Table of Contents
प्रश्न. 1. खालील घटना कालानुक्रमे लिहा.
1) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
2) लाल महालावर छापा
3) आग्र्याहून सुटका
4) राज्याभिषेक
5) पुरंदरचा तह
6) शायिस्ताखानाची स्वारी
उत्तर :
6) शायिस्ताखानाची स्वारी
2) लाल महालावर छापा
5) पुरंदरचा तह
3) आग्र्याहून सुटका
4) राज्याभिषेक
1) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
प्रश्न. 2. शोधा म्हणजे सापडेल.
1) संस्कृत शब्द असणारा कोश –
उत्तर :
राज्यव्यवहारकोश
2) त्र्यंबकगड जिंकून घेणारा –
उत्तर :
मोरोपंत पिंगळे
3) वणी-दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार –
उत्तर :
दाऊदखान
4) इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण –
उत्तर :
सूरत
प्रश्न. 3. तुमच्या शब्दांत लिहा.
1) शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक
उत्तर :
i) सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे, हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे, हे महाराजांच्या लक्षात आले.
ii) यासाठी विधिवत राज्यभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला.
iii) या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून त्यांनी ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शककर्ते झाले.
iv) राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा ‘होन’ व तांब्याची ‘शिवराई’ ही खास नाणी पाडली. या नाण्यांवर ‘श्री राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे कोरण्यात आली.
2) आग्र्याहून सुटका
उत्तर :
i) महाराज आग्ऱ्यास पोहचले तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशाहाने त्यांना नजरकैदेत.
ii) बादशाहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली.
iii) औरंगजेबाच्या कैदेत असतांना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग घेतले. हा आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली.
iv) पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढेपुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी या पेटाऱ्यातून पसार झाले. अशा प्रकार ते आग्र्याहून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहचले.
3) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहिम
उत्तर :
i) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षानी ऑक्टोबर 1677 मध्ये दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
ii) गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला.
iii) पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूरू, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.
iv) जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली.
v) तसेच दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले.
4) शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी.
उत्तर :
शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक करण्याचे ठरविले. त्यांनी राज्याभिषेकासाठी पुढील तयारी केली.
i) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान रत्नजडित सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले. त्यावर शुभ्र छत्र बसवले.
ii) राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीला स्थायिक झालेले गागाभट्ट यांना बोलवण्यात आले. राजेरवाड्यांना आमंत्रणे गेली.
iii) शिवरायांना सोन्याच्या चौरंगावर बसवले. सात नद्यांच्या आणि समुद्रांच्या पाण्याने भरलेल्या घागरींच्या धारांनी शिवरायांचा जलाभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी जिजाबाईचा आशीर्वाद घेतला.
iv) गागाभुट्टांनी सोन्यामोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व शिवछत्रपतींच्या जयजयकार झाला. अशा तऱ्हेने 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा राज्यभिषेक झाला.
प्रश्न. 4. कारणे लिहा.
1) शिवरायांनी पुरंदरचा तह केला.
उत्तर :
कारण – i) जयसिंगाने शिवाजीमहाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याची योजना आखली.
ii) दिलेरखान आणि जयसिंगाने पुरंदरला वेढा घातल्यामुळे प्रचंड मुघल फौजेला तोंड देतांना मराठ्यांची अवस्था बिकट होऊ लागली.
iii) स्वराज्याचा भूप्रदेश या प्रचंड मुघल सैन्याने बेचिराख केला. तरीही शिवाजीमहाराजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुरंदरच्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडेला लढताना वीरमरण आले.
iv) मुघलांच्या लष्करी सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही. आणि आपल्या प्रजेचे मोठे नुकसान होत आहे, असे महाराजांच्या लक्षात येताच शिवाजीमहाराजांनी जयसिंगाबरोबर बोलणी करण्याचा निर्णय केला. या सर्व बाबींमुळे शिवरायांनी पुरंदरचा तह केला.
2) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
उत्तर :
कारण – i) स्वराज्याच्या विविध भागांत मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली.
ii) तसेच पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.