महाराष्ट्रातील समाजजीवन स्वाध्याय
महाराष्ट्रातील समाजजीवन स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास
प्रश्न. 1. तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 2. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.
उत्तर :
i) पूर्वी समाजात बालविवाहाची पद्धत रूढ होती.
ii) पूर्वी छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा.
iii) स्वप्न, शकुन यांवर लोकांचा विश्वास होता.
iv) देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने, केली जायची. त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते.
समाजातील अनिष्ट चालीरिती दूर करण्यासाठीच्या उपाययोजना –
i) शासनाद्वारे त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.
ii) समाजात लोकजागृती करण्यासाठी पथनाट्य, जाहिराती, यांचा आधार घेता येतो.
iii) समाजातील सर्वासाठी मोफत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या जाव्या.
iv) शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना समाजातील अनिष्ट चालीरीती दूर करता येईल.
v) अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण कराव्या. त्यासंस्थाद्वारे लोकांना अंधश्रद्धेबद्दल माहिती द्यावी. या अनिष्ट चालीरिती नष्ट करण्यासाठी शासनासोबतच समाजातील लोकांचे सहकार्य ही आवश्यक आहे.
प्रश्न. 3. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा.
उत्तर :
गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, नाताळ, गणेशोत्सव, शारदोत्सव, मकरसंक्रांत, होळी, ईद, नवरात्र, कृष्णजन्माष्टमी इत्यादी सण-उत्सव साजरे केले जातात.
आमच्या परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तो प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. या उत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. शेवटी महाप्रसादाचे वितरण केले जातो. नवरात्रामध्ये जागोजागी दुर्गादेवी बसविल्या जातात. रोषनाई केली जाते. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभकार्याची सुरुवात लोक करतात. या दिवशी शस्त्रास्त्रांची, लोकंडाची पूजा केली जाते. मोठ्या माणसांना आपट्याची पाने दिली जाते. त्यानंतर दिवाळीत घरोघरी रंगरंगोटी केली जाते. सर्वाच्या घरी फराळाचे बनवल्या जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून हा सण साजरा केला जातो.
अशा प्रकारे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. मकरसंक्रांतीत स्त्रिया तीळगुळ बनवितात व मुले पतंग उडवतात. होळी हा फाल्गुन मासतील सण आहे. होळी पेटविली जाते. होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तयार केला जातो. नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. या दिवशी दहीहांडीचे आयोजन केले जाते. दहीदांडी फोडणाऱ्या चमूला मोठमोठी बक्षिसे दिल्या जाते. त्या दिवशी गोपाळकाला प्रसाद म्हणून दिला जातो.
तसेच ईद हा सण साजरा केला जातो. बकरी ईद व रमजान ईद मुस्लिम लोक साजरी करतात. रमजान ईदला परिसरातील लोकांना व नातेवाईकांना शेवई खायला बोलावतात. त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात ख्रिश्चन लोक नाताळ हा सण साजरा करतात. त्यावेळी लहान मुलांना खेळणी व केक वाटला जातो.
प्रश्न. 4. खालील मुद्यांच्या आधारे शिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा.
क्र. | मुद्दे | शिवकालीन समाजजीवन | सध्याचे समाजजीवन |
1) | व्यवहार | ……………………… | ……………………… |
2) | घरे | ……………………… | पक्की बांधलेली सिमेंट, काॅक्रीटची अनेक मजली घरे. |
3) | दळणवळण | ……………………… | बस, रेल्वे, विमान. |
4) | मनोरंजन | ……………………… | ……………………… |
5) | लिपी | ……………………… | ……………………… |
उत्तर :
क्र. | मुद्दे | शिवकालीन समाजजीवन | सध्याचे समाजजीवन |
1) | व्यवहार | वस्तू स्वरूपात | पैशाच्या स्वरूपात |
2) | घरे | गावात साधी माती-विटांची घरे. शहरात एकमजली व दुमजली वाडे. | पक्की बांधलेली सिमेंट, काॅक्रीटची अनेक मजली घरे. |
3) | दळणवळण | बैलगाड्या, होड्या. | बस, रेल्वे, विमान. |
4) | मनोरंजन | कुस्ती, मल्लखांब, दंड, लाठी, दंडपट्टा, बोथाटी, हतुतू, खो-खो, आट्या-पाट्या, सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ. | टिव्ही, मोबाईल, वृत्तपत्रे, मासिके, इंटरनेट, सिनेमागृहे, आकाशवाणी |
5) | लिपी | मोडी लिपी | देवनागरी लिपी |