पदार्थ : आपल्या वापरातील स्वाध्याय
पदार्थ : आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
प्रश्न. 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
(पांढरे सिमेंट, साबण, अपमार्जक, हाडांची झीज, दंतक्षय, कठीण, मृदू, पोर्टलंडम तेलाम्ल)
1) पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास ………………. म्हणतात.
उत्तर :
पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात.
2) ……………….. रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.
उत्तर :
दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.
3) साबण हा ………………….. व सोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.
उत्तर :
साबण हा तेलाम्ल व सोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.
4) संशिलष्ट अपमार्जके ही ………………….. पाण्यातही वापरता येतात.
उत्तर :
संशिलष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात.
5) बांधकामासाठी प्रामुख्याने ………………… सिमेंट वापरले जाते.
उत्तर :
बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते.
प्रश्न. 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात ?
उत्तर :
i) अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात.
ii) अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. अशा क्रियेने अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ होतात.
2) पाणी कठीण आहे का, ते तुम्ही साबणचुऱ्याच्या साहाय्याने कसे तपासाल ?
उत्तर :
जर पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. व त्यामुळे अपमार्जन करण्याचा गुणधर्म नष्ट होतो. यावरून पाणी कठीण आहे हे तपासता येईल.
3) टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय ?
उत्तर :
कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम, हायड्रोजन, फॉस्फेट हे टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक आहे.
टूथपेस्टमधील घटकांचे कार्य
i) दातांना पॉलिश करणे.
ii) दंतक्षय रोखण्यासाठी.
iii) दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी त्यामधील फ्लोराइड हा उपयोगी पडतो.
4) सिमेंटमधील घटक कोणते ?
उत्तर :
सिलिका (वाळू), अँल्युमिना (अँल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) हे सिमेंटमधील घटक आहेत.
5) कॉक्रीट बनवतात सिमेंट वापरले नाही तर काय होईल ?
उत्तर :
कॉक्रीट बनवतात सिमेंट वापरले नाही तर त्यातील मिश्रणाला कठीणपणा येणार नाही. ते कॉक्रीट टिकाऊ होणार नाही.
6) तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा.
उत्तर :
वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी – साबण, डिटर्जेट, लिक्विड सोप, रिठा, शिकेकाई, कपडे धुन्याचा सोडा, शॅपू इ.
7) उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत ?
उत्तर :
उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके मृदू असावीत.
8) पृष्ठसक्रियता म्हणजे काय ? विविध अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा.
उत्तर :
पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते. पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठसक्रियता म्हणतात.
अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणारी रसायने –
तेलाम्ल, सोडिअम क्षार, पोटाॅशिअम क्षार इत्यादी.
प्रश्न. 3. आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे ?
1) नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके
उत्तर :
नैसर्गिक अपमार्जके | मानवनिर्मित अपमार्जके |
i) हे अपमार्जके निसर्गातच आढळतात. उदा. रिठा, शिकेकाई. ii) या अपमार्जकांमध्ये सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो. iii) या अपमार्जकांचा त्वचा, कपडे यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. | i) ही अपमार्जके मानवाने निर्माण केलेली आहेत. उदा. साबण ii) या अपमार्जकांमध्ये तेलाम्ल, सोडिअम क्षार, पोटॅशिअम क्षार असते. iii) या अपमार्जकांचा त्वचा, कपडे यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. |
सारखेपणा – दोन्ही अपमार्जकांचा फेस तयार होतो.
2) साबण व संश्लिष्ट अपमार्जक
उत्तर :
साबण | संश्लिष्ट अपमार्जक |
i) साबणामध्ये तेलाम्ल, सोडिअम क्षार, पोटॅशिअम क्षार असतो. ii) कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. | i) संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूंमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्धपदार्थ व केरोसीन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. ii) संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात. |
सारखेपणा – साबण व संश्लिष्ट अपमार्जके हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहेत.
3) अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण
उत्तर :
अंगाचा साबण | कपडे धुण्याचा साबण |
i) अंगाचा साबण हा मृदू साबण असतो. ii) हा तेलाम्लांचा पोटॅशिअम क्षार असतो. | i) कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो. ii) हा तेलाम्लांचा सोडिअम क्षार असतो. |
सारखेपणा – अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहे. हे दोन्ही अपमार्जके पृष्ठसक्रिय असतात. अंगाचा साबण शरीर स्वच्छ करण्यासाठी व कपडे धुण्याचा साबण कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो.
4) आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट
उत्तर :
आधुनिक सिमेंट | प्राचीन सिमेंट |
i) आधुनिक सिमेंट हे सिलिका, (वाळू), अँल्युमिना (अँल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) यांच्यापासून तयार करतात. ii) हे सिमेंट तुलेनेने कमी टिकाऊ आहे. | i) प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून ते जलीय सिमेंट बनवतात. ii) हे सिमेंट अतिशय टिकाऊ होते. |
सारखेपणा – दोन्ही सिमेंटचा वापर बांधकामासाठी केला जातो. तसेच दोन्ही सिमेंटमध्ये चुना हा घटक वापरल्या जातो.
प्रश्न. 4. कारणे लिहा.
1) कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.
उत्तर :
कारण – i) कठीण पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते.
ii) या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.
2) तेल पाण्यात मिसळत नाही; परंतु पुरेसा अपमार्जक वापरला, की तेल व पाणी एकजीव होते.
उत्तर :
कारण – i) अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात.
ii) अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू, तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. म्हणून पुरेसा अपमार्जक वापरला, की तेल व पाणी एकजीव होते.
3) संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत.
उत्तर :
कारण – i) संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूंमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्धपदार्थ किंवा केरोसीन या कच्च्या मालापासून मिळवले जातात.
ii) त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात.
iii) संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यातसुद्धा वापरता येतात. ती कठीण पाण्यात तरी त्या पाण्यात साबणाचा साका तयार होत नाही. त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत.
4) बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात.
उत्तर :
कारण – कपड्यांवरील तेलांचे डाग व अपमार्जके यांतील घटक यांची अभिक्रिया होऊन बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात.
5) दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.
उत्तर :
तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घातक पदार्थ असतो. हा पदार्थ कर्करोगास कारणीभूत ठरतो. म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.