प्रिय बाई स्वाध्याय
प्रिय बाई स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे ?
उत्तर :
पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव ऊर्मिला माने असे आहे.
आ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही काशावरून ओळखले ?
उत्तर :
पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव आम्ही तिच्या पत्यातील नावावरून ओळखले.
इ) ऊर्मिला आनंदाने का उडाली ?
उत्तर :
ऊर्मिलाला शिकवणाऱ्या बाईला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी आणि प्रत्यक्ष बाई तिला दिसल्या म्हणून ऊर्मिला आनंदाने उडाली.
ई) ऊर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे ?
उत्तर :
ऊर्मिला सध्या पाचव्या वर्गात शिकत आहे.
उ) ऊर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत ?
उत्तर :
ऊर्मिलाने तिसऱ्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत.
ऊ) ऊर्मीलाचे बाईच्या घरी येणे-जाणे होते, हे कोणत्या वाक्यावरून कळते ?
उत्तर :
ऊर्मीलाचे बाईच्या घरी येणे-जाणे होते, हे ‘तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय ?’ या वाक्यावरून कळते.
प्रश्न. 2. खालील प्रश्नांची चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) ऊर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला ? का दिला ?
उत्तर :
ऊर्मिलाच्या आजोबांनी तिला आपल्या बाईला मोबाईल करण्याऐवजी पत्र लिहिण्याचा सल्ला दिला. कारण ऊर्मिला मोबाईल लावू लागली तर ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ ही टेप वाजू लागली होती. शिवाय पत्र लिहिले तर बाईच्या कायम आठवणीत राहील असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी ऊर्मिलाला पत्र लिहिण्याचा सल्ला दिला होता.
आ) पाचवीत आल्यापासून ऊर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टींत बदल झाला ?
उत्तर :
पाचवीत आल्यापासून ऊर्मिला शाळेत एकटी चालत जाऊ लागली. तिला एकदम मोठ्ठी झाल्यासारखं वाटलं. ती भरपूर अभ्यास करू लागली आणि भरपूर खेळू लागली. खेळण्यासाठी रोज संध्याकाळी दोन तास ती मैदानावर असायची. पाचवीत आल्यापासून ऊर्मिलाच्या या सर्व गोष्टीत बदल झाला.
इ) ऊर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे ?
उत्तर :
बाईनी शिकवलेल्या कविता, त्यांनी स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, सहलीच्या वेळी बाईनी घेतलेले भन्नाट खेळ यांचा ऊर्मिलाने आपल्या पत्रात उल्लेख केला. तसेच बाईच्या घराबाहेरच्या गुलमोहराचाही उल्लेख केला आहे. शिवाय स्वाती, जय आणि सलमा यांचाही उल्लेख केला आहे.
प्रश्न. 3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ) तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता ?
उत्तर :
आम्ही टीव्हीवरचे कार्टून्स, नॅशनल जॉग्रफी आणि डिस्कव्हरी ही कार्यक्रम बघतो. संध्याकाळच्या बातम्याही पाहतो.
आ) टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हांला बघायला आवडतात ? का आवडतात ?
उत्तर :
आम्हांला टीव्हीवरचे कार्टून्स, नॅशनल जॉग्रफी आणि डिस्कव्हरी ही कार्यक्रम बघायला आवडतात. कारण कार्टून्स पाहताना आम्हाला मजा वाटते आणि हसायला येते. नॅशनल जॉग्रफी आणि डिस्कव्हरी यातील निसर्ग आणि प्राणी पाहणे आम्हाला आवडते.
इ) तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हांला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात ? त्यामागील कारणे सांगा.
उत्तर :
आमच्या घरातील मोठी माणसे रामायण, महाभारत, अशा सिरियल्स पाहायला सांगतात. कारण आमच्या संस्कृतीचे आम्हाला ज्ञान व्हावे हा त्यांचा हेतू असतो.
ई) दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल, तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरतात ?
उत्तर :
दूर राहत असलेल्या व्यक्तींना आमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचाराचे असेल, तर आम्ही भ्रमणध्वनी, दूरध्वनी किंवा पत्रलेखन ही माध्यमे वापरतो.
शोध घेऊया
माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत. पुढील पानावरील चौकटीत काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व काही दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा. एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे → अशी खूण करा. तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे ↔ अशी खूण करा. या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा.

उत्तर :

खालील संवाद वाचा. सर्वनामांना अधोरेखित करा.
नीता : आज आपण झोका खेळूया.
मंदार : दादा, तू पण चल ना !
दादा : मी नाही येणार. मुग्धाला ने.
मंदार : ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत.
दादा : त्या आल्या की तुम्ही खेळा.
नीता : आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय !
उत्तर :
नीता : आज आपण झोका खेळूया.
मंदार : दादा, तू पण चल ना !
दादा : मी नाही येणार. मुग्धाला ने.
मंदार : ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत.
दादा : त्या आल्या की तुम्ही खेळा.
नीता : आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय !
खालील वाक्य वाचा. त्याखालील वाक्यांत ‘पिशवी’ ऐवजी योग्य सर्वनामे वापरुन वाक्ये लिहा.
पिशवी खूप सुंदर होती.
अ) पिशवीचा रंग गुलाबी होता.
उत्तर :
तिचा रंग गुलाबी होता.
आ) पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या.
उत्तर :
तीत खूप वस्तू ठेवता येत होत्या.
इ) पिशवीला काचा, मणी लावलेले होते.
उत्तर :
तिचा काचा, मणी लावलेले होते.
ई) पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली.
उत्तर :
ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली.
खालील वाक्यांतील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा.
अ) ………………. बाजारातून भाजी आणूया.
(तुम्ही, आपण, आम्ही)
उत्तर :
आपण बाजारातून भाजी आणूया.
आ) आईने जेवायला ……………….. केले आहे.
(कोणी, कोण, काय)
उत्तर :
आईने जेवायला काय केले आहे.
इ) कर्ण दानशूर होता. ………………….. दररोज दान द्यायचा.
(तो, ती, त्या)
उत्तर :
कर्ण दानशूर होता. तो दररोज दान द्यायचा.
ई) ताईने ………………… मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला.
(तिच्या, त्याच्या, त्यांच्या)
उत्तर :
ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला.
उ) आज …………………… खूप मजा केली.
(आपण, स्वत:, आम्ही)
उत्तर :
आज आम्ही खूप मजा केली.
ऊ) रमेशने ………………….. मित्रांना वाढदिवसाला बोलवले.
(त्याच्या, तिच्या, त्यांच्या)
उत्तर :
रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलवले.