महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया स्वाध्याय

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया स्वाध्याय

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. वैशिष्ट्ये लिहा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. असत्य विधान ओळखा.

1) धुरंधर शिवरायांना स्मरावे.

2) असत्यास्तव शिंग फुंकावे.

3) स्वातंत्र्याची आण घ्यावी.

4) जन्मभूमीचे उपकार फेडावे.

उत्तर :

2) असत्यास्तव शिंग फुंकावे.

प्रश्न. 3. कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तुत कवनात कवी अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रातील आपला देह अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आपण कोणते प्रयत्न करायला पाहिजे ते सांगितले आहे. महाराष्ट्रावरून काया ओवाळून टाकायला हवी. हाती कंकण बांधून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करायला हवे. प्रयत्नपूर्वक अखंड महाराष्ट्र निर्माण करूया. महाराष्ट्रातील लढण्याची आण घ्यायला हवी. जन्मभूमीचे उपकार फेडायलाच हवे.

प्रश्न. 4. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

महाराष्ट्रात मंदिरापुढे यशाची ज्योत तेवते. गड, किल्ले त्याचे पोवाडे गातात. अरबी समुद्र त्याच्या पाया लागतो. ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. यावनी सत्तेला आव्हान देऊन याच भूमीत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करणारे शिवराय झाले. महाराष्ट्रात ऐक्य आहे.

प्रश्न. 5. काव्यसौंदर्य.

अ) ‘धर ध्वजा करी ऐक्याची | मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्य पंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.

उत्तर :

प्रस्तुत कवनात कवी अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेत महाराष्ट्रावरील असणारे प्रेम व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा,खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग असले तरी या सर्व विभागांना एकत्र करून त्यातून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. संयुक्त याचा अर्थच एकत्र जोडलेला असा होतो. हे विभाग स्वतंत्र राज्ये म्हणून अस्तित्वात आली तर दिल्ली दरबारात आणि भारताच्या राजकारणात त्यांना आणि मराठी माणसाला वजन राहणार नाही. तो भारताचा बलवान नव्हे तर दुर्बल घटक ठरेल. हे या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य आहे.

आ) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.

उत्तर :

कवन म्हणजे पोवाडा आहे. पोवाडा नेहमी वीररसात्मक असतो. स्वाभाविकच याही पोवाडात रस आहे. उदा. पहिलीच ओळ आहे, “कंबरड्या बांधून ऊठ घाव झेलाया | महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया” शौर्याबद्दलचा अभिमानही वीर रसात्मक असतो. “तो अरबी सागर लागे जयाचे पाया”, त्याचेप्रमाणे शौर्य-कृतीतही वीररस असतो. “पाऊले टाक हिंमतीची | कणखर जणू पोलादाची | घे आण स्वातंत्र्याची | महाराष्ट्रास्तव लढण्याची” इथे सरळसरळ लढण्याची प्रेरणा आहे. म्हणजेच वीररस आहे.

प्रश्न. 6. अभिव्यक्ती.

अ) तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानस्पद बाबींचे वर्णन करा.

उत्तर :

अखिल भारतीय काँग्रेसची स्थापनाच मुळी महाराष्ट्रात मुंबईला झाली. लो. टिळकांनी संपूर्ण भारत चेतवणारी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही घोषणा दिली. म. गांधीचे राजकीय गुरू ना. गोखले हे ही महाराष्ट्रातलेच, ‘भूमिदान यज्ञा’ तून हृदयपरिवर्तन करणारे विनोबा, क्रिकेटमधील उच्चांक मोडणारे सचिन तेंडुलकर आणि गानकोकिळा लता मंगेशकर या साऱ्यांचा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला अभिमान वाटतो.

Leave a Comment