गवताचे पाते स्वाध्याय
गवताचे पाते स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी
1) आकृत्या पूर्ण करा.
1)
उत्तर :
2)
उत्तर :
3)
उत्तर :
4)
उत्तर :
2) कारणे लिहा.
अ) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ……………..
उत्तर :
कारण – पानांच्या आवाजामुळे त्याची झोपमोड झाली होती.
आ) ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ……………..
उत्तर :
कारण – गवताच्या पात्याने जन्मात कधी आ केले नव्हते. म्हणजेच गाण म्हटले नव्हते.
इ) वसंताच्या संजीवक स्पर्शाचे पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण …………….
उत्तर :
कारण – त्या स्पर्शात विलक्षण जादू होती.
3) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
अ) बेजबाबदारपणा –
उत्तर :
जबाबदार, बाब, दार, जर, जप, दाणा, दाब
आ) धरणीमाता –
उत्तर :
माता, ताणी, रमा, मार, धर, धरणी
इ) बालपण –
उत्तर :
बाप, लप, बाण, लपण, बाल
4) खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांगा पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय.
उत्तर :
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे.” ते म्हणाले, “तुझे म्हणणे स्पष्ट करून सांगा पाहू.” यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, “सर ! शून्याला शून्याने भागले तर ?” त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय.
5) खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही.
अ) ज्ञानी X सुज्ञ
आ) निरर्थक X अर्थपूर्ण
इ) ऐच्छिक X अनिवार्य
ई) दुर्बोध X सुबोध
उत्तर :
ज्ञानी X सुज्ञ
6) स्वमत
अ) ‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
हिवाळा सुरू झाला होता. झाडावरून पिकलेली पाने गळत होती. त्या आवाजाने गवताचे झोपलेले पाते चिडले होते. ते पिकले पान खाली गळून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले. वसंताच्या संजीवक स्पर्शाने त्याचे रूपांतर चिमुकल्या गवताच्या पात्यात आणि तेच आता गळून पडणाऱ्या पानांच्या आवाजाने चिडले. याचाच अर्थ माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते.
आ) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते ?
उत्तर :
मी जर गवताच्या पात्याच्या ठिकाणी असतो तर पानाला म्हटले असते, “कशाला खोटा दंभ मिरवतोस ? एक दिवस तू मातीलाच मिळणार आहेस आणि माझ्यासारखाच नव्या पिढीत जन्माला येणार आहेस. जुने जातात आणि त्यातूनच नवे निर्माण होतात. हा सृष्टीचा नियमच आहे. यात आपण मोठे आहोत असा अहंकार बाळगण्याचे काही कारणच नाही.
इ) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
उत्तर :
हिवाळा सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट…पट…पट… त्यांचा तो पट, पट असा कर्णकटु आवाज. तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. भिरक्या खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, ‘अरे किती छान गातोस न्, रणवाद्यासारखा स्फूर्तिदायक, जगजागृती करणारा, पानाला आनंद झाला. ते म्हणाले, “रसिक असावा तर तुझ्यासारखा. आम्ही नुसते गातो पण तू रसग्रहण करतोस. खरं तर तूच आम्हाला मोठा वाटतोस.” हे बोलता बोलता ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
वसंत ऋतूनं त्याला संजीवक स्पर्श केला. त्या जादूई स्पर्शाने त्या पानाचं रूपांतर चिमुकल्या पात्यात झालं होतं.
पुन्हा हिवाळा आला. पुन्हा पिकलेली पाने गळू लागली. पट पट असा आवाज करीत ही पाने पृथ्वीवर पडत होती. पानाचे रूपांतर झालेले ते नवे गवताचे पाते म्हणाले, काय पहाडी आवाज हा ! मला जर असं जनजागृती करणारं गाणं गाता आलं असतं तर !
7) खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
“… एक विचारू ?”
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.
“हं.”
“मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंच…. पण..”
“पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?”
“…हो.”
“अरे ! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..”
“पण वाढणं देखील सुंदरच असेल ना ?”
“हो ! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात….”
…. आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला !
उत्तर :
जुन्या पिढीतील मोठ्या माणसांना दुसरे कुणी आपल्यासारखे मोठे व्हावे ते खपत नाही. नव्या पिढीला मात्र मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा असते. धूर्त मोठी माणसं त्यांना जाणीवपूर्वक आपल्या आश्रयाखाली वाढवतात. आणि त्यांनी मोठं होऊ नये याची व्यवस्था करतात. जुन्याचा हा कावा लक्षात आलेला एक सुधारक लाकूडतोड्या त्या मोठ्या माणसावर चालून जातो.
(मोठी माणसं – स्मृतिकार, सावली – वर्णबंधने, लाकूडतोड्या – सुधारक)