जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय

जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय

जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) जनपदे म्हणजे काय ?

उत्तर :

जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होय.

2) महाजनपदे म्हणजे काय ?

उत्तर :

काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांचा महाजनपदे म्हणतात.

3) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे सुरू झाली ?

उत्तर :

गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वानाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली.

4) वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली ?

उत्तर :

नंद राजांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली.

2. सांगा पाहू.

1) आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता –

उत्तर :

आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या ‘अश्मक’ या जनपदाने व्यापलेला होता.

2) जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे –

उत्तर :

जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची ‘गणपरिषद’ असे.

3) ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई –

उत्तर :

ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला ‘संथागार’ असे म्हटले जाई.

4) गौतम बुद्ध गणराज्यातील होते –

उत्तर :

गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते.

5) चतुरंग सैन्य –

उत्तर :

पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य नंदराज्याच्या जवळ होते.

3. जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) संगिती
2) धनानंद
3) पाटलीग्राम
अ) अजातशत्रू
ब) परिषद
क) महागोविंद
ड) नंदराजा

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) संगिती
2) धनानंद
3) पाटलीग्राम
ब) परिषद
ड) नंदराजा
अ) अजातशत्रू

4. भारतातील विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा.

उत्तर :

राज्य राजधानी
आंध्र प्रदेश हैद्राबाद
अरुणाचल प्रदेश इटानगर
आसाम दिसपूर
बिहार पटना
छत्तीसगढ रायपूर
गोवा पणजी
गुजरात गांधीनगर
हरियाणा चंदीगढ
हिमाचल प्रदेश शिमला
तेलगांणा हैद्राबाद
झारखंड रांची
कर्नाटक बंगळूर
केरळ तिरुअनंतपुरम
मध्य प्रदेश भोपाळ
महाराष्ट्र मुंबई
मणिपूर इंफाळ
मेघालय शिलॉग
मिझोराम ऐजॉल
नागालँड कोहिमा
उडिसा भुवनेश्वर
पंजाब चंदीगढ
राजस्थान जयपूर
सिक्किम गंगटोक
तमिळनाडू चेन्नई
त्रिपुरा आगरताळा
उत्तर प्रदेश लखनऊ
उत्तराखंड डेहराडून
पश्चिम बंगाल कोलकाता

Leave a Comment