स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय

स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय

स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2

1. पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा.

अ) दगडाची हत्यारे : ……………….. युग

उत्तर :

दगडाची हत्यारे : अश्म युग

आ) तांब्याची हत्यारे व इतर वस्तू : ……………. युग

उत्तर :

तांब्याची हत्यारे व इतर वस्तू : ताम्र युग

इ) लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू : ……………. युग

उत्तर :

लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू : लोह युग

2. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा.

अ) 1) तांबे 2) सोने 3) लोखंड

उत्तर :

1) सोने 2) तांबे 3) लोखंड

आ) 1) ताम्रयुग 2) लोहयुग 3) अश्मयुग

उत्तर :

1) अश्मयुग 2) ताम्रयुग 3) लोहयुग

3. पुढील घटनांचे परिणाम लिहा.

अ) तांबे या धातूचा शोध

उत्तर :

तांबे या धातूचा शोध लागला त्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली. तांब्याच्या शोधामुळे मानवाला हत्यारे व अवजारे तयार करणे शक्य झाले.

आ) चाकाचा शोध

उत्तर :

चाकाच्या शोधामुळे मातीची भांडी घडविली जाऊ लागली. तसेच वाहनासाठी चाकाचा उपयोग केल्या जाऊ लागला. चाकाच्या शोधामुळे मानवाच्या प्रगतीला वेग आला.

इ) लिपीचे ज्ञान

उत्तर :

व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे लिपीमुळे शक्य झाले.

4. टीपा लिहा.

अ) धातूचा वापर

उत्तर :

i) आधीच्या काळातील दगडाची हत्यारे, तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा, हे थॉमसेनने सप्रमाण दाखवून दिले.

ii) त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली. तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय. अशी समजूत तयार झाली.

iii) प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गत: अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता.

iv) सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की, ज्यापासून त्याला हत्यारे, अवजारे बनवता येणे शक्य झाले. तो धातू म्हणजे ‘तांबे’ होय. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली, त्या काळाला ‘ताम्रयुग’ असे म्हटले जाते.

आ) नागरी समाजव्यवस्था

उत्तर :

i) नागरी संस्कृतींचा पाया नवाश्मयुगातील कृषिसंस्कृतीवर आधारलेला होता. कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या.

ii) व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले.

iii) अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातांत एकवटले.

Leave a Comment