मातीची सावली स्वाध्याय

मातीची सावली स्वाध्याय

मातीची सावली स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.

अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.

उत्तर :

फरसूचे मातीवर निरतिशय प्रेम असल्यामुळे वाऱ्यातील गारवाही त्याला मातीच्या मडक्यातील पाण्यासारखा छान गार वाटतो.

आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.

उत्तर :

फरसूच्या अंगणात चिंचेचे झाड होते. या झाडावरही त्याचे विलक्षण प्रेम होते. आई जशी लेकराला परदाखाली घेऊन त्याला सावली देते तसे ते झाड आईच्या मायेने आपल्याला सावली देते अशी फरसूची भावना आहे.

इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.

उत्तर :

वाऱ्यामुळे चिंचेच्या झाडाची पाने भिरभिरत खाली येत होती. चिंचेवरील प्रेमामुळे ती पाने फरसूला भिरभिरत येणाऱ्या फूलपाखरासारखी वाटत होती.

प्रश्न. 2. खालील तक्ता पूर्ण करा.

घटना परिणाम/प्रतिक्रिया
1) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो.
2) मनूला फरसूने शिकवले.
3) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला.
4) मनूने जमीन विकायला काढली.

उत्तर :

घटना परिणाम/प्रतिक्रिया
1) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो. सून डाफरायची
2) मनूला फरसूने शिकवले. इंग्रजी नावाच्या कंपनीत कामाला लागला.
3) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. एक आठवड्याच्या आत कोसू मरण पावली.
4) मनूने जमीन विकायला काढली. फरसूने त्याला होकार दिला.

प्रश्न. 3. आकृती पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा.

उत्तर :

1) छंद – छंद मातीची सेवा करणं हा फरसूचा छंद होता. त्यामुळे त्याचे शेत इतके सुपीक झाले होते की लोक त्याला जळायचे. जेवणखाण झाल्यावर चिंचेच्या मुळावर बसून पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत आबूशी गप्पा मारणं हाही त्याचा छंद होता. त्याचा आणखी एक छंद होता. तो म्हणजे पायरीवर बसून झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं.

2) मेहनत – मेहनत फरसू खूप मेहनती होता. चिंचेच्या खाली पडलेल्या पाल्याचं पान न् पान गोळा करून तो वाडीत टाकायचा. फरसू व त्यांची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत शेतात राबायची.

3) दुःख – फरसूला तीन गोष्टीचं दुःख होतं. लहानशा करणानं त्याची पत्नी कोसू मरण पावली आणि त्याचा आधारच गेला, संसार होत्याचा नव्हता झाला. दुसरं दुःख होतं मनूनं जमीन विकायला काढली आणि आपण त्याला मान डोकावली याचं, त्यानं कागदावर निमूट सह्या करून दिल्या याचं आणि तिसरं दुःख होतं आपल्या जमिनीवर बंगला उभारण्यासाठी आपल्याही जन्मापूर्वीपासून उभी असलेली झाडं तोडली गेली याचं.

4) माणूसपणा – जमिनीवर ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलंमोठं दगडविटांचं धूड तिच्यावर उभारलं गेलं. या मातीशी नाळं तुटली की माणूसपण तरी कसं राहणार ? पाय मातीवर असतात तोवरच माणूस माणूस असतो. तिला विकून आपण माणूसपणच विकलं आहे, असं फरसूला वाटते.

प्रश्न. 4. ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

प्रश्न. 5. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.

अ) “आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.”

उत्तर :

आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते.

आ) “त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.”

उत्तर :

त्यांचीची पुण्याई ही विहीर नव्हे, नदी आहे नदी.

प्रश्न. 6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

अ) टकळी चालवणे –

1) सूत कातणे

2) सतत बोलणे

3) वस्त्र विणणे

उत्तर :

टकळी चालवणे – सतत बोलणे

आ) नाळ तुटणे –

1) मैत्री जमणे

2) संबंध न राहणे

3) संबंध जुळणे

उत्तर :

नाळ तुटणे – संबंध न राहणे

प्रश्न. 7. खालील अर्थाची वाक्ये पाठातून शोधून लिहा.

अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले –

उत्तर :

बापजाद्यांची कमायी रे पोरांनो ! त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.

आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला –

उत्तर :

तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.

इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम –

उत्तर :

पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्यांचा निश्चय होता.

प्रश्न. 8. स्वमत

अ) ‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार ?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.

उत्तर :

‘मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार ?’ या फरसूच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत. कारण मातीशी नाळ तुटली की त्याला या मातीबद्दल आणि त्या मातीशी संबंधित माणसाबद्दल प्रेम उरत नाही. आणि जिथं प्रेम नाही तिथं स्वाभाविकच माणूसपण राहत नाही. म्हणूनच विदेशात जाणारे अनेक विद्यार्थी तेथे शिक्षण घेतांना आपल्या मातीशी नाळ तोडतात आणि विदेशातच स्थायिक होतात. पुढे ते देशाशी गद्दारीही करतात.

आ) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर :

फरसू झाडाचा शुद्ध वारा घेत होता. पालापाचोळा वाया जाऊ न देता त्याचे खत करत होता. झाडांवर मुलांसारखे प्रेम करत होता. त्याचे हे सर्व विचार कुणालाही मान्य होण्यासारखे आहेत. ते आम्हालाही मान्य आहेत. आपला जन्म ज्या मातीत गेला ती जमीन विकण्याचे दु:ख होणेही स्वाभाविक आहे. पण त्याने मुलाला शिकवले, मुलगा इंग्रजी कंपनीत नोकरीला लागला. त्याचे लग्न झाले. आपण झोपडीत राहण्याऐवजी बंगल्यात राहावे असे त्याला का वाटू नये ? मनूने मातीशी नाळ तोडली असे वाटत नाही. त्या मातीवर त्याने गुलाब फुलवला हे फरसूने संस्कृतीतले परिवर्तन लक्षात घेतले नाही असे माझे मत आहे.

इ) ‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

वाच्यार्थाने झाडाची सावली असते, तशी मातीची सावली नसते. पाठात सावली हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरला आहे. सावलीत सुखाचा अनुभव येतो. तसा मातीपासून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव फरसूला आला आहे. शेतीच्या दृष्टीने तो धान्यसमृद्ध आहे. संसारातली कोणतीही विवंचना त्याला नाही. मुलीचे विवाहं झाले आहे. मुलाला शिक्षण दिले आहे, त्याचेही लग्न झाले आहे. असे सुख मातीमुळे त्याच्या वाट्याला आले आहे. त्या कुटुंबाला सावलीही त्या मातीमुळेच मिळाली आहे. म्हणून ‘मातीची सावली’ हे शीर्षक समर्पक वाटते.

भाषासौंदर्य

आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.

शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
चेहरा काळवंडणे पोटात कावळे ओरडणेजिवाची उलघाल होणे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी दगडापेक्षा वीट मऊ

उत्तर :

शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
चेहरा काळवंडणे पोटात कावळे ओरडणेजिवाची उलघाल होणे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी दगडापेक्षा वीट मऊ
पोटात येणेमांजर आडवे जाणे. सुखाचा जीव दु:खात पडणे. शिळ्या कढीला ऊत आणणे. विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार
डोळा लवणेकागदी घोडे नाचविणेमनात येईल तसे बोलणे. बोलाचीच कढी, बोलाचाच भात. पळसाला पाने तीन
दात ओठ खाणे पोपटपंची करणेजीवापाड जपणे. हळद लावणे. चोरावर मोर होणे.

Leave a Comment