बाली बेट स्वाध्याय
बाली बेट स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. खालील आकृती पूर्ण करा.
अ)
उत्तर :
आ)
बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांची वापरलेले शब्द | बाली बेटावरील कलांसाठी लेखकांची वापरलेले शब्द |
---|---|
उत्तर :
बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांची वापरलेले शब्द | बाली बेटावरील कलांसाठी लेखकांची वापरलेले शब्द |
---|---|
लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे बाली बेट आहे. | ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणलेला. |
प्रश्न. 2. खालील कल्पना स्पष्ट करा.
अ) बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
उत्तर :
रत्नजडित कंठ्यात कंठमणी हे सर्वात प्रमुख रत्न असते. त्याप्रमाणेच इंडोनेशिया हा अनेक बेटांचा मिळून बनलेला देश आहे आणि या सर्व बेटांमध्ये बाली हे सर्वात प्रमुख बेट आहे.
आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
उत्तर :
टुरिस्टांना जे जे आवडते, जे जे पाहावेसे वाटते, जे जे, हवेहवेसे वाटते ते ते सर्व बाली बेटावर आहे, म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
इ) ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
उत्तर :
भर दुपार असो की मध्यरात्र असो, तेथील तरुणी सारख्याच उत्साहाने टुरिस्टांचे स्वागत करतात. या स्वागताला वेळेचे बंधन नाही.
ई) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.
उत्तर :
बाली बेटावरील बागेत जणू शिशुवर्गात जाणारी व डोळे मिचकावणारी बहरलेली रोपटी होती. अंगधुणे झालेल्या वेली होत्या. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या देत होता. म्हणून ती बाग कुटुंबासारखी वाटत होत.
प्रश्न. 3. खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा.
उत्तर :
बाली बेट – बाली बेट हे इंडोनेशियाच्या बेटांच्या कंठ्यातील कंठमणी आहे. लक्ष मोती उधळून मोतीत चूर व्हावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे हे बाली बेट आहे.
स्थान – बाली बेट हे जकार्ताहून विमानाने सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. तेथे जायचे म्हणजे देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरावे लागते. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
घरे व हॉटेल्स – इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. लेखक कोण आहे हे कळल्यावर विमानतळावरच एक तरुण अधिकारी म्हणाला, “तुम्हां उभयतांचे अधिक मन:पूर्वक स्वागत!” मध्यरात्री लेखक विमानतळावरून सागर बीच हॉटेलकडे कारने जायला निघाले. रस्ता माडांच्या रायातून जात होता. भोवताली किर्र झाली होती. मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका दिसायचा. सुमारे दीड तासाने कार त्या हॉटेलसमोर उभी राहिली. हॉटेल म्हणजे टुमदार बंगली होती.
टुरिस्ट खात्याची तत्परता – रात्री दीड-दोन वाजले होते. तरीही हॉटेलरच्या मुलींनी प्रवाशांचे तत्परतेने स्वागत केले. स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करीत होते. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्टच जणू नव्हती. त्यांनी सर्व टुरिस्टांना त्यांच्या विश्रांतीच्या खोल्या दाखवून दिल्या.
निसर्गसौंदर्य – समुद्र हॉटेललगतच होता. पहाटेलाच कोळ्यांच्या होड्या समुद्रात मासेमारीला निघाल्या होत्या. हे बेट थेट गोव्यासारखे सुंदर आहे. लेखक तर ते सौंदर्य पाहून प्रिये पहा! रात्रीचा समय सरुनि येत उष: काल हाss! हे नाट्यगीत गाऊ लागले. त्या पहाटेने लेखकांच्या स्वप्नांची नांदी सुरू केली होती. हॉटेलच्या परिसरात एक सुंदर बगीचा होता. त्यातील रोपटी बालकांसारखी वेली तरुणी सारख्या व वृक्ष वृद्धासारखे वाटत होते. ती बाग म्हणजे एकत्र कुटुंब वाटत होते. एकूणच हे भेट रम्य, मनोहर आणि निष्पाप वाटते.
बदलते रूप – पण आज सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहे. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल वर्तमानपत्रेही आहेतच. बाली बेटाचे रूप असे बदलत आहे.
प्रश्न. 4. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
अ) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.
उत्तर :
रात्री झोपेत स्वप्न पडायला सुरुवात होतो आणि पहाटेला स्वप्न पडणे बंद होते, असा याचा अर्थ.
आ) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
उत्तर :
लेखकाला त्या हॉटेलच्या खोलीमध्ये पाच मिनिटातच झोप लागली व ते मोठमोठ्याने घोरू लागले.
इ) वेलींचेही अंगधुणे झाले होते.
उत्तर :
दवबिंदूंनी वेली भिजल्या होत्या.
ई) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
उत्तर :
सकाळी पक्षी चिवचिव करून गात असतात. पण बाली बेटावर लेखकाला पक्षीच आढळले नाहीत. म्हणून त्यांचे गाणेही नव्हते. लेखक गायला लागले आणि पक्ष्यांच्या गाण्याची उणीव भरून काढू लागले.
खेळूया शब्दांशी
अ) खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या.
अ) टुरिस्टांचा स्वर्ग
उत्तर :
टुरिस्टांचा स्वर्ग – टुरिस्टांना जे हवे ते सर्व उपलब्ध असलेली जागा.
आ) किर्र जंगल
उत्तर :
किर्र जंगल – अतिशय दाट जंगल.
इ) आश्राप माणसे
उत्तर :
आश्राप माणसे – सरळ स्वभावाची निरुपद्रवी माणसे.
ई) गाणारे भाट
उत्तर :
गाणारे भाट – चिवचिव करणारे पक्षी
उ) तंबूतला सिनेमा
उत्तर :
तंबूतला सिनेमा – दूरदर्शन
आ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा.
अ) अभंग –
उत्तर :
अभंग – i) कवितेतील एक वृत्त
ii) न भंगणारे
आ) बोट –
उत्तर :
बोट – i) हातापायांची बोटे
ii) जहाज
इ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1) अभयता
उत्तर :
आमच्याकडे आपण अभयता जेवायला यावे.
2) यत्किंचितही
उत्तर :
तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मला यत्किंचितही संशय नाही.
3) चौघडा
उत्तर :
श्री शिवाजींनी पुरंदर जिंकला तेव्हा सैनिकांनी चौघडा वाजवला होता.
4) चित्रविचित्र
उत्तर :
भारतात अजूनही चित्रविचित्र रूढी रूढ आहेत.
शोध घेऊया
अ) आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रांत कोणते बेटे आहेत याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा.
देश | लाभलेला समुद्रकिनारा | तेथील बेटे |
---|---|---|
उत्तर :
देश | लाभलेला समुद्रकिनारा | तेथील बेटे |
---|---|---|
भारत | अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर. | अंदमान-निकोबार लक्षद्वीप, न्यू मूर बेट |
बांग्लादेश | बंगालचा उपसागर |
आ) आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान-निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा.
1) तेथील आदिवासी
2) आदिवासींचे जीवनमान
3) निसर्गसौंदर्य
4) तेथील सोईसुविधा
उत्तर :
अंदमान-निकोबार
1) तेथील आदिवासी – अंदमान-निकोबार बेटांवर ग्रेट अंदमानी, जारवा, सेंटिनेलस हे आदिवासी या बेटांवरील मूळ आदिवासी आहेत.
2) आदिवासींचे जीवनमान – आदिवासींचे जीवनमान अगदी साधे आहे. या आदिवासींचे मुख्य व्यवसाय शिकार, मासेमारी, वनातील पदार्थ गोळा करणे आहेत. ते आपली उपजीविका भागवतात.
3) निसर्गसौंदर्य – अंदमान आणि निकोबार बेटांवरील निसर्गसौंदर्य हे भूरळपडणारे सृष्टी सौंदर्य आहे. तेथील समुद्रातील पाणी काळेशार असल्यामुळे तेथील निसर्गसौंदर्यातील वेगळेपणा जाणवतो. हा समुद्राकिनारा बघण्यासाठी पर्यटक तेथे येतात.
4) तेथील सोईसुविधा – पोर्ट ब्लेअर हे अंदमान व निकोबार बेटांचे राजधानीचे शहर चैन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकात्याशी जोडलेले आहे. या केंद्रावरून भारताच्या मुख्य भूमीकडे जहाज सेवा आहे. या समुद्रातील एकमेव विमानतळ पोर्ट ब्लेअर येथे आहे.
प्रेक्षणीय स्थळाच्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा.
उत्तर :
रामटेक
रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील एक सर्वागसुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. हे प्रेक्षणीय स्थळ आहे याचे कारण या स्थळाला नैसर्गिक सौंदर्य तर आहेच शिवाय त्याला धार्मिक व ऐतिहासिकही महत्त्व आहे. हे स्थळ नागपूरपासून उत्तरेला पन्नास कि.मी. अंतरावर आहे. तेथे नागपूरहून बसने किंवा रेल्वेनेही जाता येते. आम्ही बसने गेलो होतो.
बस कन्हान नदी ओलांडून रामटेकला जाते. रामटेकडीवर रामाचे मंदिर आहे. रामाने येथे विश्रांती घेतली होती म्हणून या गडाला ‘रामटेक’ असे नाव पडले अशी एक आख्यायिका आहे. याच गडावर कविकुलगुरू कालिदासाने ‘मेघदूत’ हे काव्य लिहिले. गडाच्या पायथ्याशी रामटेक हे गाव आहे. तिथून पाच सात कि.मी. अंतरावर ‘मनसळ’ हे गाव आहे. प्राचीन काळात नळराजाने ज्या सरोवरात हंसाला पकडले होते ते सरोवर म्हणजे मनसळ होय अशी आख्यायिका आहे.
गडावर चढताना घाम फुटतो. पण डोंगराचा गार वारा अंगाला लागताच असे श्रम गळून पडतात. या डोंगरावरच कवीकुलगुरू कालिदास विद्यापीठ आहेत. कदाचित हे एकमेव डोंगरातील विद्यापीठ असावे. आपण टेकडीवरून पाहावे तर रामटेकची सर्व घरे खूप लहान व समान वाटतात. माणूस विचारांच्या उंचीवर गेला की त्याला सर्वत्र समान दिसू लागते हा अनुभव येतो.
डोंगराच्या पलीकडे रामसागर तलाव आहे. तेथे नौकाविहाराची खूप मजा येते. आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होतो. त्यातून कलुषित मने निर्मळ झाली. विश्रांतीसाठी येथे एक डाकबंगला आहे. ग.त्र्यं. माडखोलकरांनी याच डाकबंगल्यावर आपली ‘डाकबंगला’ ही सुप्रसिद्ध कांदबरी लिहिली आहे.
या प्रेक्षणीय स्थळाचा आपल्या मनावर परिणाम होतो तो असा ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||’
माहिती मिळवूया
वरील जाहिरात वाचा. त्याआधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) सहलीचे आयोजक कोण आहेत ?
उत्तर :
लक्ष्मी टूर्स हे सहजीचे आयोजक आहेत.
2) सहलीची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर :
i) उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल.
ii) मे महिना हा कालावधी.
iii) प्रवासशुल्कात 50% सवलत.
iv) भेटववस्तूंची खैरात ही सहलीची वैशिष्ट्ये आहेत.
3) सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
टुरिस्टना आकर्षित करण्याकरिता सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी, असे मला वाटते.
4) प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे, असे तुम्हांला वाटते का ? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हांला अविश्वसनीय वाटते ?
उत्तर :
प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय वाटत नाही. प्रवासशुल्कात 50% जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हांला अविश्वसनीय वाटते.
आपण समजून घेऊया
खालील पाट्यांवर वाहतूक सुरक्षिततेच्या संदर्भात घोषवाक्ये तयार करून लिहा.
उत्तर :