हवा व हवामान स्वाध्याय
हवा व हवामान स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल
अ) मी कोण ?
1) मी नेहमी बदलत असते.
उत्तर :
हवा
2) मी सर्व ठिकाणी सारखे नसते.
उत्तर :
हवामान
3) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते.
उत्तर :
हिम
4) मी वातावरणात बाष्परूपात असते.
उत्तर :
आर्द्रता
ब) उत्तरे लिहा.
1) महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे ?
उत्तर :
i) महाबळेश्वर हे ठिकाण अति उंचावर म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे.
ii) समुद्रपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे.
2) समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय ?
उत्तर :
i) समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते. त्या पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळते.
ii) हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास हवा दमट होते. म्हणून समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते.
3) हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे ?
उत्तर :
हवा | हवामान |
---|---|
i) एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला ‘हवा’ म्हणतात. ii) हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगता येते. iii) हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. | i) एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरीस्थितीला ‘हवामान’ असे म्हणतात. ii) हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. iii) हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात. |
4) हवेची अंगे कोणती ?
उत्तर :
तापमान, वारे,, आर्द्रता, वायुदाब, वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत.
5) समुद्रसान्निध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो ?
उत्तर :
i) समुद्रसान्निध्याचा हवामानावर होणारा परिणाम – समुद्रसान्निध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ होऊन हवेत मिसळते. त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान दमट होते. याउलट समुद्रसान्निध्य नसणाऱ्या भागात हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने हवामान कोरडे होते.
ii) समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचा हवामानावर होणारा परिणाम – समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. त्यामुळे हवामान थंड असते. याउलट समुद्रपाटीजवळच्या भागात भूपृष्ठाजवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते.
क) खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा. (नकाशासंग्रह वापरा)
उष्ण | |
उष्ण व दमट | |
शीत | |
उष्ण व कोरडे | |
शीत व कोरडे |
उत्तर :
उष्ण | भोपाळ |
उष्ण व दमट | मुंबई |
शीत | शिमला |
उष्ण व कोरडे | नागपूर |
शीत व कोरडे | महाबळेश्वर |
ड) पुढील तक्ता पूर्ण करा.
हवा | हवामान |
---|---|
वातावरणाची अल्पकालीन स्थिती | |
लवकर बदलत नाही. | |
विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते. | |
हवामानांची अंगे-तापमान, वारे, वृष्टी, आर्द्रता, वायुदाब. |
उत्तर :
हवा | हवामान |
---|---|
वातावरणाची अल्पकालीन स्थिती | हवेची दीर्घकालीन स्थिती |
लवकर बदलते | लवकर बदलत नाही. |
विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते. | सर्वच ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते |
हवेची अंगे-तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी | हवामानांची अंगे-तापमान, वारे, वृष्टी, आर्द्रता, वायुदाब. |