पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट स्वाध्याय

पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट स्वाध्याय

पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल

1) द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

द्विमित साधनांची वैशिष्ट्ये –

i) नकाशे हे द्विमिती असतात.

ii) द्विमिती घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते.

त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये –

i) पृथ्वीगोल हा त्रिमित असतो.

ii) त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते, तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते.

2) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील ?

उत्तर :

अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखविता येतील. तसेच पृथ्वीवरील भूभाग, देश, बेट, सागर, महासागर इत्यादी बाबी दाखविता येतील.

3) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते ?

उत्तर :

नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल.

4) तुमचे गाव/शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल ?

उत्तर :

आमचे गाव/शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल.

5) पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल ?

उत्तर :

पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल.

Leave a Comment