पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सहावी

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सहावी

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

१. योग्य शब्द वापरुन रिकाम्या जागा भरा.

अ. व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर ………………… पदार्थ आहे.

उत्तर :

व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर टणक पदार्थ आहे.

आ. नैसर्गिक पदार्थावर ………………… करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात.

उत्तर :

नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात.

इ. न्यूयॉर्क व लंडन येथे ………………….. हा कृत्रिम धागा तयार झाला.

उत्तर :

न्यूयॉर्क व लंडन येथे नायलॉन हा कृत्रिम धागा तयार झाला.

ई. रेयॉनला ………………… नावाने ओळखले जाते.

उत्तर :

रेयॉनला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते.

२. उत्तरे लिहा.

अ. मानवनिर्मित पदार्थाची गरज का निर्माण झाली ?

उत्तर :

i) मानव सर्व प्राण्यांमध्ये अधिक बुद्धिजिवी प्राणी आहे. त्यामुळे तो सतत नवीन गोष्टींचा शोध घेत असतो.

ii) जीवन अधिक सुकर करण्याच्या प्रयत्नांतून मानवनिर्मित पदार्थाची गरज निर्माण झाली.

आ. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणिजन्य पदार्थ मिळतात ?

उत्तर :

निसर्गातून मिळणारे वनस्पतीजन्य पदार्थ – कापूस, ताग, फळे, पालेभाज्या, साग, लाकूड इत्यादी.

निसर्गातून मिळणारे प्राणिजन्य पदार्थ – लोकर, मोती, रेशीम, चामडे, लाख इ.

इ. व्हल्कनायझेशन म्हणजे काय ?

उत्तर :

या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर तीन-चार तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. ज्या कामासाठी रबर उपयोगात त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते. खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी यामध्ये कमी-अधिक प्रमाणात गंधक मिसळलेले असते. यालाच व्हल्कनायझेशन म्हणतात.

ई. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात ?

उत्तर :

रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. तसेच कापसापासून धागे मिळतात. लोकरीपासून सुद्धा धागे मिळतात.

३. आमचे उपयोग काय आहेत ?

अ. माती

उत्तर :

झाडे लावण्यासाठी, घरे बांधण्यासाठी, मातीची भांडी बनविण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी, मातीची कौले तयार करण्यासाठी.

आ. लाकूड

उत्तर :

लाकडापासून फर्निचर तयार करतात. कागद तयार करतात, पेन्सिली तयार करतात.

इ. नायलॉन

उत्तर :

नायलॉनचा उपयोग वस्त्रनिर्मिती, मासेमारीची जाळी आणि दोरखंड इ. तयार करण्यासाठी वापरतात.

ई. कागद

उत्तर :

पुस्तके, वह्या छापण्यासाठी उपयोग होतो. पुठ्ठे तयार करण्यासाठी, फोटो छापण्यासाठी, पुस्तकांचे कव्हर तयार करण्यासाठी, वर्तमानपत्र छापण्यासाठी, दिनदर्शिका छापण्यासाठी, नोटा छापण्यासाठी, टपाल तिकीटासाठी कागदाचा उपयोग होतो.

उ. रबर

उत्तर :

खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी, रबरबॅंड तयार करण्यासाठी, गाड्यांचे टायर तयार करण्यासाठी रबराचा उपयोग होतो.

४. कागदनिर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

कागद बनवण्यासाठी पाइनसारख्या सूचिपर्णी वृक्षांचा उपयोग होतो. या वृक्षांच्या ओंडक्यांची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते. त्यामुळे त्याचा लगदा तयार होतो. रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. त्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो.

५. कारणे लिहा.

अ. उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.

उत्तर :

कारण – i) उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते. त्यामुळे उष्णता वाढते.

ii) सुती कपडे शरीराचा घाम शोषून घेते. त्यामुळे उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.

आ. पदार्थाचा वापर करण्यामागे काटकसर करावी.

उत्तर :

कारण – i) मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपुर वापर केला. बऱ्याच नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहेत.

ii) वाढत्या गरजांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडतो.

iii) तसेच मानवनिर्मित पदार्थामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो. आपली नैसर्गिक साधनसंपत्ती पुरवून वापरण्यासाठी व त्यांचा नाश होऊ नये म्हणून पदार्थाचा वापर करण्यामागे काटकसर करावी.

इ. कागद वाचविणे काळाजी गरज आहे.

उत्तर :

कारण – i) कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे, कागद तयार करण्यासाठी झाडे तोडण्यात येतात.

ii) पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे गरजेचे आहे.

ई. मानवनिर्मित पदार्थाना जास्त मागणी आहे.

उत्तर :

कारण – मानवनिर्मित पदार्थ वापरायला अधिक सोईचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला.

उ. कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.

उत्तर :

कारण – i) मृदेतील विघटन करणारे जीवाणू आणि इतर सजीव मृतावशेषांचे विघटन करून त्याचे खतात रूपांतर करतात.

ii) या प्रक्रियेपासून कुथित मृदा नैसर्गिकरित्या तयार होते. म्हणून कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.

६. कसे मिळवतात याची माहिती मिळवा.

अ. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात ?

उत्तर :

i) लाख हा पदार्थ लाखेच्या मादी किड्यांपासून मिळविला जातो.

ii) लाखेचा मादी किडा एका ठराविक ग्रंथीतून रेझिनप्रमाणे द्रव स्त्रोवतो. हा स्त्राव हवेच्या संपर्कात आल्याने सुकतो व त्याची लाख तयार होते.

iii) ही लाख मोठ्या वृक्षांवर जास्त प्रमाणात आढळते. पळस, बोर या झाडांवर जास्त आढळते.

आ. मोती हे रत्न कसे मिळवतात ?

उत्तर :

i) मोती हा मौल्यवान खड्यांतील एक खडा आहे. हा प्राणिजन्य आहे.

ii) मोती हे रत्न शिंपल्यात कोणताही कण शिरला की त्याच्या सभोवताली कॅन्कर नावाच्या पदार्थाचे थर टाकले जातात आणि त्यातूनच मोती तयार होते.

Leave a Comment