नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन स्वाध्याय

नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन स्वाध्याय

नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

अ. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी …………….. किरणे शोषून घेतो.

उत्तर :

ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो.

आ. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण ……………. टक्के साठा उपलब्ध आहे.

उत्तर :

पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण 0.3 टक्के साठा उपलब्ध आहे.

इ. मृदेमध्ये …………….. व ………………. घटकांचे अस्तित्व असते.

उत्तर :

मृदेमध्ये जैविकअजैविक घटकांचे अस्तित्व असते.

2. असे का म्हणतात ?

अ. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.

उत्तर :

i) ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे.

ii) सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजिवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. म्हणून ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे, असे म्हणतात.

आ. पाणी हे जीवन आहे.

उत्तर :

i) सजीवांना जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

ii) प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यांमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

iii) कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. म्हणून पाणी हे जीवन आहे, असे म्हणतात.

इ. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

उत्तर :

i) जलचक्राला बाष्परुपी इंधन पुरवण्याचे मोठे काम महासागरातून निर्माण होणाऱ्या बाष्पातून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्त्रोत निर्माण होतात.

ii) समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात. त्यांचा अन्न म्हणून उपयोग होतो.

iii) काही देशांत समुद्राचे पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यास उपयुक्त व्हावे म्हणून संशोधन सुरू आहे. तसेच आपल्या घरातील मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून तयार केले जाते. म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

3. काय होईल ते सांगा.

अ. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले.

उत्तर :

मृदेतील सूक्ष्मजीव वनस्पती व प्राणी यांचे विघटन करतात म्हणजेच ते कुजून, मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणता. ती तयार होणार नाही आणि जमिनीला पोषक घटक पण पुरविणार नाही.

आ. तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली.

उत्तर :

तर प्रदूषणाचे प्रमाण वाढेल. पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. प्रदूषणामुळे आजाराचे प्रमाण सुद्धा वाढेल.

इ. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.

उत्तर :

पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर प्यायला पाणी मिळणार नाही. उद्योगधंदे बंद पडतील, शेती पिकवायला सुद्धा पाणी मिळणार नाही. रोजच्या दैनंदिन कामासाठी पाणी मिळणार नाही.

4. सांगा मी कोणाशी जोडी लावू ?

‘अ’ गट ‘ब’ गट
1. कार्बन डाऑक्साइड
2. ऑक्सिजन
3. बाष्प
4. सूक्ष्मजीव
अ. मृदेची निर्मिती
आ. पाऊस
इ. वनस्पती व अन्ननिर्मिती
ई. ज्वलन

उतर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. कार्बन डाऑक्साइड
2. ऑक्सिजन
3. बाष्प
4. सूक्ष्मजीव
इ. वनस्पती व अन्ननिर्मिती
ई. ज्वलन
आ. पाऊस
अ. मृदेची निर्मिती

5. नावे लिहा.

अ. जीवावरणाचे भाग

उत्तर :

शिलावरण, जलावरण, वातावरण

आ. मृदेचे जैविक घटक

उत्तर :

सूक्ष्मजीव, कृमी, कीटक

इ. जीवाश्म इंधन

उत्तर :

खनिज तेल – पेट्रोल, डांबर, डिझेल, मेण, रॉकेल, पॅराफीन

ई. हवेतील निष्क्रीय वायू

उत्तर :

अरगॉन, हेलिअम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन

उ. ओझोनच्या थरास घातक असणारे वायू

उत्तर :

क्लोरोफ्लुरोकॉर्बन्स, कार्बन टेट्राक्लोराईड

6. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

अ. जमीन आणि मृदा ही एकच असते.

उत्तर :

चूक

आ. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.

उत्तर :

बरोबर

इ. मृदेला 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात.

उत्तर :

चूक

ई. रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.

उत्तर :

चूक

7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ. मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा.

उत्तर :

i) जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते.

ii) मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो.

iii) ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते.

iv) या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळेदेखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात.

v) मृदानिर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात.

आ. पृथ्वीवर सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते ?

उत्तर :

i) पृथ्वीचा सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे.

ii) त्यापैकी 97% समुद्राचे पाणी खारट आहे. 2.7% पाणी गोठलेल्या म्हणजे बर्फस्वरूपात आहे.

iii) अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

इ. हवेतील विविध घटक कोणते ? त्यांचे उपयोग लिहा.

उत्तर :

i) नायट्रोजन – सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी आहे.

ii) ऑक्सिजन – सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे.

iii) कार्बन डायऑक्साइड – वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यांमध्ये वापरतात.

iv) अरगॉन – विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

v) हेलिअम – कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.

vi) निऑन – जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

vii) क्रिप्टॉन – फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो.

viii) झेनॉन – फ्लॅश फोटो ग्राफीमध्ये उपयोग होतो.

इ. हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत ?

उत्तर :

i) पृथ्वीवरील काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत. काही घटक पाण्यात, तर काही जमिनीवर आहे. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत.

ii) पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. हे तीनही घटक नैसर्गिकरित्या मिळतात म्हणून हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने आहेत.

Leave a Comment