संतवाणी स्वाध्याय

संतवाणी स्वाध्याय

संतवाणी स्वाध्याय इयत्ता नववी

अ) जैसा वृक्ष नेणे

प्रश्न. 1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.

वृक्ष संत

उत्तर :

वृक्ष संत
1) वृक्ष मान – अपमान जाणत नाही.
2) पुजा केली तरी त्याच्या चित्ती सुख होत नाही.
3) कुणी छेदले तरी प्रहार करू नका असे म्हणत नाही.
4) निंदा व स्तुती समान मानतात.
5) पूर्ण धैर्यवंत असते.
1) संत मान – अपमान जाणत नाही.
2) पुजा केली तरी त्याच्या चित्ती सुख होत नाही.
3) कुणी छेदले तरी प्रहार करू नका असे म्हणत नाही.
4) निंदा व स्तुती समान मानतात.
5) पूर्ण धैर्यवंत असतात.

प्रश्न. 2. खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 3. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.

अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.

उत्तर :

सत्य

आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.

उत्तर :

असत्य

इ) संत निंदा स्तुती समान मानत नाहीत.

उत्तर :

असत्य

ई) संत सुख आणि दुःख समान मानतात.

उत्तर :

सत्य

प्रश्न. 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

1) वृक्ष

उत्तर :

वृक्ष – झाड

2) सुख

उत्तर :

सुख – आनंद

3) सम

उत्तर :

सम – सारखे

प्रश्न. 5. काव्यसौंदर्य

अ) ‘अथवा कोणी प्राणी येउनि तोडिती | तया न म्हणती छेदू नका ||’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.

उत्तर :

वृक्ष माणसाला सावली देतो, फुले – फळे देतो तरी काही लोक त्याचे उपकार न जाणता वृक्ष तोडायला येत असतात. पण मला तोडू नका असे वृक्ष त्यांना कधीच म्हणत नाहीत. वृक्षांप्रमाणेच संतही समाजावर उपकार करत असतात. पण अशा परोपकारी संतावरही काही लोक प्रहार करतात, म्हणजे त्याचा छळ करतात, पण संत प्रतिकार करत नाहीत.

आ) ‘निंदा स्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ||’ या काव्य पंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तुत काव्यपंक्ती ‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगातील असून संतकवी नामदेवांनी साधूसंताची महती अतिशय सोप्या भाषेत केली आहे. या काव्याची भाषा मनाला भावणारी, अबालवृद्ध सर्वांना पटणारी व समजणारी आहे.

सामान्य माणूस स्तुतीमुळे हुरळून जातो व निंदेमुळे क्षुब्ध होतो. पण संत असामान्य असतात. ते स्तुतीमुळे हुरळून जात नाहीत की निंदेमुळे क्षुब्ध होत नाहीत. त्यांना निंदा-स्तुती सारखीच असते. कारण ते धैर्यवंत सज्जन असतात, साधू असतात. अशाप्रकारे साध्या सोप्या शब्दांत जीवनविषयक तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे हे या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य आहे.

प्रश्न. 6. अभिव्यक्ती

अ) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर :

संतांना वृक्षाची उपमा दिली आहे ती अत्यंत समर्पक व सार्थ आहे. कारण वृक्षाप्रमाणेच संत मान-अपमानाची जाणीव ठेवत नाहीत, निंदास्तुती समान मानतात. पूजा केली तरी सुख नाही आणि प्रहार केला तरी प्रतिकार नाही. दोघेही निंदास्तुती सम मानतात. या साम्यामुळे संतांना दिलेली वृक्षाची उपमा समर्पक वाटते. कारण दोघेही स्थित प्रज्ञ आहेत.

आ) तूम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.

उत्तर :

संत तुकारामांचा “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळविती ||” हा मला आवडलेला अभंग आहे. कारण यात संत तुकारामांनी आधुनिक काळात अत्यंत मौल्यवान असलेला असा संदेश दिला आहे. वृक्ष, वेली हे आपले नातलग आहेत आणि मानवी नातलगांवर आपण प्रेम करतो तेवढेच वृक्ष वेली या नातलगांवरही प्रेम करा असे तुकाराम महाराज सांगतात. या नातलगांमुळे आरोग्य लाभते, विवेकबुध्दी जागृत होते आणि मनाचा सुसंवाद साधला जातो असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे.

भाषा सौंदर्य

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे – आखीव – आखीव कागद

(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

i) रेखणे

उत्तर :

रेखणे – रेखीव – रेखीव मूर्ती

ii) कोरणे

उत्तर:

कोरणे – कोरीव – कोरीव नक्षीकाम

iii) ऐकणे

उत्तर :

ऐकणे – ऐकीव – ऐकीव गोष्टी

iv) घोटणे

उत्तर :

घोटणे – घोटीव – घोटीव दूध

v) राखणे

उत्तर :

राखणे – राखीव – राखीव जागा

भाषाभ्यास

1) रूपक अलंकार :

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी |

i) वरील उदाहरणातील उपमेय –

उत्तर :

उपमेय – नयन

ii) वरील उदाहरणातील उपमान –

उत्तर :

उपमान – कमल

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाही रमा |

दावि मुखचंद्रमा | सकळिकांसी ||

i) उपमेय –

उत्तर :

उपमेय – मुख

ii) उपमान –

उत्तर :

उपमान – चंद्रमा

आ) धरिला पंढरीचा चोर

प्रश्न. 1. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) विठ्ठलाला धरले अ) शब्दरचनेच्या जुळणीने
2) विठ्ठल काकुलती आला आ) भक्तीच्या दोराने
3) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) विठ्ठलाला धरले आ) भक्तीच्या दोराने
2) विठ्ठल काकुलती आला इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
3) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी अ) शब्दरचनेच्या जुळणीने

प्रश्न. 3. काव्यसौंदर्य

अ) ‘सोहं शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुलती आला ||’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर :

‘सोहं’शब्दाचा अर्थ आहे स: + अहं म्हणजे ‘तू मीच आहे’, परमेश्वर मीच आहे. संत एकनाथांची शिष्या जनाबाई वारकरी संत आहेत आणि अद्वैतवाद हे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आहे. अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे आत्मा व परमात्मा एकच आहे. म्हणून विठ्ठल तू आणि मी एकच आहोत असा विचार संत जनाबाईंनी वारंवार उच्चारल्यामुळे विठ्ठल काकुळतीला आला असे जनाबाई म्हणते.

आ) ‘जनी म्हणे बा विठ्ठला | जीवें न सोडी मी तुला ||’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा.

उत्तर :

संत जनाबाई विठ्ठलाला लटक्या रागाने म्हणतात की, मी तुला भक्तीच्या दोराने बांधले आहे, हृदयाच्या बंदिखान्यात कोंडले आहे, शब्दांच्या जुळणीने पायात बेडी घातली आहे, सोहं शब्दाने तू काकुळतीला आला आहेस. आता तुला जीव गेला तरी मी सोडणार नाही. यातून जनाबाईची विठ्ठलावरची आत्यंतिक एकनिष्ठ भक्ती हा भाव व्यक्त झाला आहे.

इ) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.

उत्तर :

प्रस्तुत अभंगातून कवयित्री जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीची उत्कट भक्तिभावना दिसून येते. तिच्या उत्कट भक्तीतून तिचे आर्त भाव व्यक्त होतात. विठ्ठलावरच्या तिच्या एकनिष्ठ प्रेमाची प्रचिती देते. तसेच परमेश्वराप्रति मानवी जीवनातील निष्ठा व भक्ती हा भाव व्यक्त होतो.

प्रश्न. 4. अभिव्यक्ती

अ) मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न हे मानवी समाजाच्या उत्कर्षाचे मूलाधार आहेत. निष्ठा नसेल तर कोणतेही महान कार्य घडून येऊ शकणार नाही. निष्ठा विविधांगी असतात. राष्ट्रनिष्ठा, साहित्यनिष्ठा, विज्ञाननिष्ठा अशा सामाजिक अंग असलेल्या निष्ठा व्यक्तिनिष्ठेपेक्षा अधिक मोलाच्या असतात. विज्ञाननिष्ठा नसेल तर अंधश्रद्धा बळावते. राष्ट्रनिष्ठा नसेल तर राष्ट्र दुर्बल बनते. भक्ती एकनिष्ठ असावी. विविध देवतांची पूजा ही परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती नव्हे. माणूस स्वार्थासाठी देवतांची भक्ती करतो. कुणाला पुत्र व्हावा म्हणून, कुणाला नोकरी मिळावी म्हणून, कुणाला आपल्याला यश मिळावे म्हणून जी भक्ती केली जाते ती खरी भक्ती नसते. खरी भक्ती नि: स्वार्थ असते. लो. टिळक, म. गांधी, क्रांतिकारक, पारतंत्र्यकाळातील सत्याग्राही यांची राष्ट्रभक्ती नि: स्वार्थ होती आणि ती खरी भक्ती होय. प्रयत्न तर अति महत्त्वाचे. देशभक्तांनी प्रयत्न केले आणि त्याकरिता वाटेल तसे हाल सहन केले म्हणून देश स्वतंत्र झाला. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला बंदी होती त्या काळात म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढून त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, त्याचे फळ आज दिसत आहे.

एकूणच व्यक्तिविकास, समाजविकास व राष्ट्रविकास यांचा पाय म्हणजे निष्ठा, भक्ती व प्रयत्न होय.

Leave a Comment