नव्या युगाचे गाणे स्वाध्याय

नव्या युगाचे गाणे स्वाध्याय

नव्या युगाचे गाणे स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. हे केव्हा घडेल ते लिहा.

अ) दिव्य क्रांती –

उत्तर :

विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा.

आ) शून्यामधून विश्व उभारेल –

उत्तर :

भव्य जिद्द असेल तेव्हा.

इ) दुबळेपणाचा शेवट –

उत्तर :

नवी चेतना अंतरी स्फुरेल तेव्हा.

प्रश्न. 2. खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.

उत्तर :

प्रश्न. 3. खालील अर्थाच्या ओळी शोधा.

अ) माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो.

उत्तर :

शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य.

आ) माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात.

उत्तर :

नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती.

प्रश्न. 4. तक्ता पूर्ण करा.

कवीला नको असणाऱ्या गोष्टी विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी
1) 1)
2) 2)
3) 3)

उत्तर :

कवीला नको असणाऱ्या गोष्टी विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी
1) दुबळेपणा 1) नव चेतना
2) नैराश्य 2) नवयुग
3) खिन्नता, दीनता 3) प्रगती

प्रश्न. 5. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

अ) ‘नवसूर्य पहा उगवतो’, ‘संघर्ष पहा बहरतो’ या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

‘नवसूर्य पहा उगवतो’ – सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञानरूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे. माणसाचे डोळे खूप लांबचे पाहू शकत नाही. कान खूप लांबचे ऐकू शकत नाही, हात खूप अवजड वस्तू उचलू शकत नाही, पाय वाऱ्याच्या वेगाने पळू शकत नाही. पण विज्ञानाचे टीव्ही दिला आणि माणूस इंग्लंडमध्ये चाललेली मॅच आपल्या डोळ्यांनी पाहतो, अमेरिकेतले गाणे ऐकतो, क्रेनच्या साह्याने अवजड वस्तू उचलतो, जेट विमानात बसून वाऱ्याच्या गतीने पळतो.

संघर्ष पहा बहरतो – पूर्वी माणूस आरोग्य, दुष्काळ, अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे. कारण विज्ञान नव्हते आणि प्लेग, कॉलऱ्याच्या साथीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. वर्ष वर्ष दुष्काळ चाले आणि लोक मरत किंवा स्थानांतरित होत. देवीच्या कोपामुळे माता हा रोग होतो अशी अंधश्रद्धा होती. विज्ञानामुळे माणसाने प्लेग, कॉलरा नष्ट केले, देवीच्या रोगाचे समूळ उच्चाटन झाले, शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते. या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे.

आ) कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.

उत्तर :

विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल, नवयुग निर्माण होईल, आपण शून्यामधून विश्व उभारू, आपला उत्कर्ष होईल, आपण प्रगती करू, निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल, दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल, उत्कर्ष झळकेल, संघर्ष बहरेल, जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील, या कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे.

खेळूया शब्दांशी

अ) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.

उत्तर :

पुढती – क्रांती,

दिव्य – भव्य,

विझला – दिसला,

गेले – आले,

ज्वाला – दीनता,

उगवतो – झळकतो, बहरतो,

चित्ती – पुढती

आ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून काढा.

1) उजेड –

उत्तर :

उजेड – प्रकाश

2) तेज –

उत्तर :

तेज – प्रभा

3) रस्ता –

उत्तर :

रस्ता – मार्ग

4) उत्साह –

उत्तर :

उत्साह – जोश

Leave a Comment