भारताची संसद स्वाध्याय
भारताची संसद स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र
प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) लोकसभेवर ……………… पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.
अ) भौगोलिक मतदारसंघ
ब) धार्मिक मतदारसंघ
क) स्थानिक स्वराज्यसंस्था मतदार संघ
ड) प्रमाणित प्रतिनिधित्व
उत्तर :
लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.
2) भारताचे ………………… हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
अ) राष्ट्रपती
ब) उपराष्ट्रपती
क) प्रधानमंत्री
ड) सरन्यायाधीश
उत्तर :
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
प्रश्न. 2. शोधा व लिहा.
1) लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना ……………….. या नावाने संबोधतात.
उत्तर :
लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना खासदार या नावाने संबोधतात.
2) कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी ……………… यांची आहे.
उत्तर :
कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी संसद यांची आहे.
प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) राज्यसभा हे कायमस्वरुपी सभागृह आहे.
उत्तर :
दर दोन वर्षांनी राज्यसभेतील आपला 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तेवढेच नियुक्त केले जातात. म्हणून राज्यसभा कधीही विर्सजित होत नाही.
2) लोकसभेला पाहिले सभागृह म्हणतात.
उत्तर :
लोकसभेचे सर्व सदस्य हे थेटपणे लोकांकडून निवडून आलेले असतात. म्हणून लोकसभेला पाहिले सभागृह असे म्हणतात.
प्रश्न. 4. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.
1) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात ?
उत्तर :
लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेटपणे निवडले जातात. यासाठी दर 5 वर्षानी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात व त्यासाठी भौगोलिक मतदारसंघ तयार केले जातात; यातून जे उमेदवार निवडून येतात ते लोकसभेवर येतात.
2) लोकसभा अध्यक्षाची कामे स्पष्ट करा.
उत्तर :
संपूर्ण सभागृहाचे कामकाज नि:पक्षपातीपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे.
कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून ते चालवणे सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इ. कामे लोकसभेचे अध्यक्ष करतात.
प्रश्न. 5. कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.
उत्तर :
विधेयकाचे किंवा प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून होते.
पहिले वाचन – संबंधित खात्याचा मंत्री विधेयक मांडताना थोडक्यात त्याचे स्वरूप स्पष्ट करतो.
दुसरे वाचन – याचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पक्ष विधेयकाच्या बाजूने तर विरोधक विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात. दुसऱ्या टप्प्यात विधेयकावर कलमावर चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर सभागृहात मतदान घेतले जाते.
तिसरे वाचन – या वेळेस विधेयकावर चर्चा होते व विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकाला आवश्यक ते बहुमत मिळाले की विधेयक मंजूर होते.
राज्यसभेतील वरील प्रक्रियेतून विधेयक जाते व नंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. (दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात मतदान घेतले जाते.)