लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय

लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय

लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. योग्य विधान शोधा.

अ)

1) लेखकाची नागपूर – दादर पॅसेंजर गाडी होती.

2) म्हातारा व तरुण करोडपती होते.

3) तरुण वकिली करायला परदेशात जात होता.

4) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !

उत्तर :

दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !

आ)

1) म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते.

2) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.

3) म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते.

4) म्हातारा व तरुण बेजबाबदार होते.

उत्तर :

म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.

प्रश्न. 3. तुमच्या शब्दांत लिहा.

अ) समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा.

उत्तर :

लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत, हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची खरी बाब ओळखायला हवी होती. बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, हे ऐकून तर हे नट आहेत, हे कुणाच्याही लक्षात आले असते. पण तेवढंसुद्धा त्याच्या लक्षात आले नाही. म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भाबडेपणाचेच नाही, तर बावळटपणाचे वाटते.

आ) पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.

उत्तर :

पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले. आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला.

खेळूया शब्दांशी

अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

1) “राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?”

उत्तर :

प्रश्नार्थक

2) “तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.”

उत्तर :

विधानार्थी

3) “तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये.”

उत्तर :

आज्ञार्थी

4) “म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!”

उत्तर :

उद्गारवाचक

आ) खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1) भावाला
2) शाळेतून
3) पुस्तकांशी
4) फुलाचा
5) आईने

उत्तर :

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1) भावालाभाऊ वा
2) शाळेतून शाळाळे
3) पुस्तकांशी पुस्तके कां
4) फुलाचाफूल ला
5) आईने आई

इ) खालील शब्दसमुहांचा वाक्यांत उपयोग करा.

1) गप्पा रंगणे

उत्तर :

कोजागिरीच्या रात्री आम्हा मित्रांच्या गप्पा खूप रंगल्या.

2) पंचाईत होणे

उत्तर :

माझे पैशाचे पाकीट हरवल्यामुळे माझी मोठी पंचाईत झाली.

ई) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

1) त्यांचा खेळातील दम संपत आला.

उत्तर :

त्याचा खेळातील दम संपत आला.

2) कॅप्टनेने खेळाडूला इशारा दिला.

उत्तर :

कॅप्टनेने खेळाडूंना इशारा दिला.

3) क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

उत्तर :

क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

शोध घेऊया

विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या साहाय्याने घ्या. त्याची यादी तयार करा.

उत्तर :

विनोदी साहित्यिकांची नावे त्यांचे साहित्य
1) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सुदाम्याचे पोहे, अठरा धान्यांचे कडबोळे
2) पु. l. देशपांडे बटाट्याची चाळ, गोळा बेरीज
3) राम गणेश गडकरी संपूर्ण बाळकराम
4) चिं. वि. जोशी मोरू आणि मैना, चौथा चिमणराव
5) द. मा. मिरासदार माझ्या बापाची पेंड
6) प्र. के. अत्रे भ्रमाचा भोपळा, हास्यतुषार
7) डॉ. मनोहरराव रोकडे एक राणी तीन गुलाम

Leave a Comment