स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय

स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय

स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. तुमचे मत स्पष्ट करा.

अ) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या’ म्हणत.

उत्तर :

गावात एक माणूस घोड्यावर बसून यायचा. पिंपळाच्या पाराखाली थांबायचा. देशोदेशीचे खूप अनुभव सांगायचा. त्याची बडबड लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकत असत. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. काही काळ आपण आपलं दु:ख विसरतो. तो त्यांच स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो. म्हणून लोक त्याला ‘सपनविक्या’ म्हणत.

आ) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.

उत्तर :

गावात जाणे, तिथल्या लोकांना एकत्र जमवणे, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुका मेवा विकणे यातून स्वप्नं विकणाऱ्या माणसाला खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे व दुसऱ्यांना आनंद द्यावा हे स्वप्नं विकणाऱ्या माणसाचं स्वप्नं होतं, हा त्याचा गावात येणाचा उद्देश होता.

प्रश्न. 2. स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.

उत्तर :

प्रश्न. 3. खालील आकृत्या पूर्ण करा.

1)

उत्तर :

2)

उत्तर :

3)

उत्तर

4)

उत्तर :

प्रश्न. 4. स्वप्नं विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

प्रश्न. 5. कल्पना करा व लिहा.

स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे.

उत्तर :

मी – तुम्ही पारावरच का बसता?

तो – कारण इथे लोक गोळा होतात. त्यांचा गराडा पडतो.

मी – स्वप्न विकल्यानं पैसे मिळत नाहीत. मग स्वप्नं का विकता ?

तो – मला समाधान मिळतं.

मी – कसलं समाधान ?

तो – मी अनुभवलेलं समृध्द विश्व त्यांना फुलवून सांगण्याचं समाधान.

मी – मी विद्यार्थी आहे. मला एखादं स्वप्न द्या ना, मला समाधान वाटेल असं.

तो – शिकत असताना नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नकोस. नवं काहीतरी शोधून काढ. संशोधन कर. नवे प्रयोग कर.

मी – संशोधन ? ते कशासाठी ?

तो – लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी. हे स्वप्न उराशी जपून ठेव.

मी – हे स्वप्न मी या क्षणापासूनच उराशी जपून ठेवलंय. धन्यवाद.

चर्चा करूया

झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील, याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा.

मी – ताई, झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील ?

ताई – अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचं चिंतन करत असतो त्या कधी कधी स्वप्नात दिसतात. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’.

आई – हे तर खरं आहेच पण शिवाय ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्या स्वप्नातून दिसत असतात.

बाबा – आणि एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो. त्याचाही आविष्कार स्वप्नातून होत असतो. प्रकटमन आपले अनुभव अप्रकट मनाजवळ ठेवतो. ते अप्रकट मन स्वप्नांना जबाबदार असते.

व्याकरण व भाषाभ्यास

खेळूया शब्दांशी

प्रश्न. 1. पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसवण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे ‘पार’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

1) हार

उत्तर :

हार – हरणे, माळ

2) कर

उत्तर :

करणे, हात

3) वात

उत्तर :

दिव्याची वात, वारा किंवा वायू

प्रश्न. 2. खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) मती कुंठित होणे अ) कंठ दाटून येणे.
2) तरतरी पेरणे आ) विचारप्रक्रिया थांबणे
3) गहिवरून येणे इ) उत्साह निर्माण करणे

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) मती कुंठित होणे आ) विचारप्रक्रिया थांबणे
2) तरतरी पेरणे इ) उत्साह निर्माण करणे
3) गहिवरून येणे अ) कंठ दाटून येणे.

प्रश्न. 3. खालील दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.

अ) कुतूहल

उत्तर :

कुतूहल – त्या छोट्या बाळाला इंद्रधनुष्याने मोठे कुतूहल वाटत होते.

आ) संभ्रम

उत्तर :

संभ्रम – ती कागदी फुलं इतकी हुबेहुब होती की ती खरी की खोटी असा संभ्रम पडायचा.

इ) ढब

उत्तर :

ढब – त्याची बोलण्याची ढब विलक्षण आकर्षक आहे.

ई) आतुरतेने

उत्तर :

आतुरतेने – पंढरपूरंहून परतलेल्या आईची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.

खेळ खेळूया

प्रश्न. 1. दिलेल्या अक्षराने सुरू होणाऱ्या गावाचे नाव सुरुवातीला लिहायचे आहे. त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या दुसऱ्या नावाचे नाव लिहायचे. पुन्हा एकदा त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या तिसऱ्या गावाचे नाव लिहायचे. आता तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे गावाचे नाव लिहायचे; पण अशा गावाचे नाव लिहायचे आहे, ज्याचे शेवटचे अक्षर ‘र’ असेल. बघूया जमते का ते!

उदा., स – सोलापूर

र – रांजवगाव

व – वडनेर

र – रावेर

1) म

उत्तर :

म – मणिपूर

र – रामटेक

क – कन्हान

न – नागपूर

2) ख

उत्तर :

ख – खडकपूर

र – राची

च – चंद्रपूर

र – रायपूर

3) क

उत्तर :

क – करजगाव

व – वाशीम

म – मनसर

र – रामपूर

आपण समजून घेऊया

आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा.

ही माझी नवी छोटी शाळा ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत
पुस्तक पुस्तकात
पंखापंख्याला
पुस्तके पुस्तकांमध्ये

उत्तर :

ही माझी नवी छोटी शाळा ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत
हे माझे नवे छोटे पुस्तक ह्या माझ्या नव्याछोट्या पुस्तकात
हा माझानवापंखा पंखाह्या माझ्या नव्या छोट्या पंख्याला
ही माझी नवी छोटी पुस्तके ह्या माझ्या नव्या पुस्तकांमध्ये

अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

वाक्ये सरळरूप सामान्यरूपप्रत्यय
1) रमेशचा भाऊ शाळेत गेला.1)
2)
2) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.1)
2)
3) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.1)
2)
4) मंडईत फळांच्या गाड्या आहेत. 1)
2)

उत्तर :

वाक्ये सरळरूप सामान्यरूपप्रत्यय
1) रमेशचा भाऊ शाळेत गेला.1) रमेश
2) शाळा
रमेश
शाळे
चा
2) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.1) बँक
2) शेतकरी
बँके
शेतकऱ्या
ने
ला
3) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.1) सुट्टी
2) मित्र
सुट्टी
मित्रां

शी
4) मंडईत फळांच्या गाड्या आहेत. 1) मंडई
2) फळे
मंडई
फळां

च्या

Leave a Comment