सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय

सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय

सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान

प्रश्न. 1. शोधा पाहू माझा जोडीदार !

‘अ’ गट ‘ब’ गट
1) कमळ
2) कोरफड
3) अमरवेल
4) घटपर्णी
अ) फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात.
आ) अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
इ) वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित
ई) पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) कमळ
2) कोरफड
3) अमरवेल
4) घटपर्णी
ई) पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित
इ) वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित
आ) अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
अ) फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात.

प्रश्न. 2. परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो.

अ) माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे ?

उत्तर :

जाड त्वचा, पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण थंडीपासून संरक्षण करण्यासाठी असावे.

आ) आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो ?

उत्तर :

शत्रूपासून एकमेकांना संरक्षण देण्यासाठी व थंडीपासून बचाव करण्यासाठी नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहतो.

इ) ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये अनुकूलन हवे आणि का ?

उत्तर :

पेंग्विनच्या त्वचेवरील लांब दाट केस, पांढरा रंग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. पाठीवरील काळे केस त्यांना वरून आच्छादित करते. त्यांची जाड त्वचा त्याला संरक्षण देते. त्याच्या शरीरावरील मऊ केसांमध्ये हवेचा एक थर असतो. तो त्यांना थंड पाण्यापासून सुरक्षित ठेवतो.

ई) मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो ? का ?

उत्तर :

मी दक्षिण ध्रुवारील अंटार्क्टिका या भौगोलिक प्रदेशात राहतो. कारण या प्रदेशात राहण्यासाठी पेंग्विन स्वत:ला जलीय जीवन जगण्यासाठी अनुकूलित करून येतो.

प्रश्न. 3. खोटे कोण बोलतो ?

अ) झुरळ : मला पाच पाय आहेत.

उत्तर :

झुरळ खोटे बोलतो. कारण झुरळाला सहा पाय असतात.

आ) कोंबडी : माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत.

उत्तर :

कोंबडी खोटे बोलते. कारण कोंबडीला बदकाप्रमाणे पाण्यांमध्ये पोहावे लागत नाही म्हणून तिची त्वचेने जोडलेली नाहीत.

इ) निवडुंग : माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे.

उत्तर :

निवडुंग खोटे बोलत आहे. कारण त्याचा मांसल भाग पान नसून हे खोड आहे.

प्रश्न. 4. खालील विधाने वाचून त्याआधारे अनुकूल संदर्भात परिच्छेद लेखन करा.

अ) वाळवंटात खूप उष्णता आहे.

उत्तर :

i) वृष्टी व बाष्पीभवन हे दोन घटक ओसाड प्रदेशाच्या बाबतीत महत्त्वाचे असून त्यावरच या प्रदेशातील जलस्त्रोत अवलंबून असतो.

ii) वाळवंटातील हवा सर्वत्र अतिशय कोरडी असते.

iii) वर्षातील बहुतांश काळ सापेक्ष व निरपेक्ष आर्द्रता शून्याच्या जवळपास असतो.

iv) पाऊस अतिशय अनिश्चित व अनियमित स्वरूपाचा असतो. त्याचे वितरण खूपच विषम असते.

v) पावसाचा कोणताही निश्चित ऋतू नसतो. जो काही आकस्मिक पाऊस पडतो. तो तीव्र वादळाबरोबर पडतो. जेव्हा केवळ हलक्या सरी पडतात तेव्हा जमीन थोडीशी ओली होते. परंतु उष्णतेने ताबडतोड बाष्पीभवन होऊन जाते. सामान्यपेक्षा बाष्पीभवन अधिक होत असते.

vi) काही वेळा ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू लागल्याचे दिसू लागते, परंतु तो जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होऊन जाते. अशा प्रकारे वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते.

आ) गवताळ प्रदेश हिरवागार असतो.

उत्तर :

i) पृथ्वीच्या उबदार आणि समशीतोष्ण कटिबंधातील भागात 500 ते 1300 मिलिमीटर पाऊस पडतो.

ii) 6 ते 8 महिन्यांत पडणाऱ्या पावसामुळे सच्छिद्र जमिनीवर गवताळ प्रदेश तयार होतात.

iii) पृथ्वीच्या सुमारे 25% जमिनीवर असणाऱ्या गवताळ प्रदेशाच्या हवामानाप्रमाणे दोन प्रकार आहेत – उष्ण आणि समशीतोष्ण.

iv) उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात 1 ते 2 मीटर उंचीचे आणि तेवढ्याच उंचीचे झुडपे असतात. सोबत खुरटी झाडेही विखुरलेली असतात.

इ) कीटक जास्त प्रमाणात आढळतात.

उत्तर :

i) कीटक संधिपाद प्राणी वर्गातील कायटिनचे बाह्य आवरण असलेल्या या बहुपेशीय प्राण्यांचे शरीर, डोके, वक्ष आणि पोट अशा तीन प्रमुख भागांनी बनलेले असते.

ii) सर्वाधिक विविधता असलेला हा वर्ग आहे. आजपर्यंत सुमारे दहालाख कीटकांच्या प्रजातीचे वर्गीकरण झाले आहे.

iii) प्राणीसृष्टीमध्ये सहा ते दहा दशलक्ष जाती असतात. त्यापैकी नव्वद टक्के बहुपेशीय प्राणी आहे.

iv) कीटक पृथ्वीवरील सर्व प्रदेशांत आढळणारा प्राणी आहे.

v) प्रत्यक्षात असलेला कीटक बहुविविधतेचा आकडा नक्की करणे कठीण असले तरी 14 ते 18 लाख कीटक पृथ्वीवर असावेत असा अंदाज आहे. दरवर्षी असलेल्या कीटकांच्या यादीमध्ये वीस हजार नव्या कीटकांची भर पडते आहे.

ई) आम्ही लपून बसतो

उत्तर :

i) विषारी व बिनविषारी सापांची ओळख नसल्याने सापाला मारण्याचे प्रकार सर्रास होत आहेत.

ii) मोरांना कायद्याने मिळणाऱ्या संरक्षणाने वाढणारी संख्या, शेतांमध्ये त्यांचे सतत दिसणारे कळप त्यांच्याकडून पिकांबरोबर सापांचा केला जाणारा सुपडासाफ यातून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सापांची संख्या जाणवण्याइतपत कमी झाली आहे.

iii) शेतीत तसेच पठरांवर पहायला मिळणारे साप यामुळे सहजासहजी दिसत नसल्याची बाब समोर येत आहे.

iv) ते स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बिळात लपून बसतात.

उ) आमचे कान लांब असतात.

उत्तर :

i) ससा हा अतिशय लोभस, शांत व भित्रा प्राणी आहे. तसेच तो चपळ व लांब कानाचा प्राणी म्हणून ओळखला जातो.

ii) याची ऐकण्याची क्षमता इतर प्राण्यापेक्षा जास्त आहे.

iii) शत्रू पासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता सश्यात आहे. कारण त्याचे कान लांब व मजबूत आहे.

iv) त्याच्या लांब कानामुळे तो स्वत:चा बचाव करू शकतो.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ) उंटाचा ‘वाळवंटातील जहाज’ का म्हणतात ?

उत्तर :

i) वाळवंटातील हवामान अतिशय शुष्क व कोरडे असते. दिवसा जमीन खूप तापते व रात्री लवकर थंड होते. पाण्याची या भागात कमतरता जाणवते.

ii) या भागात उंट हा एकमेव प्राणी असा आहे की तो 21 दिवस पाण्याशिवाय गरम वाळूवर प्रवास करू शकतो. त्यामुळे वाहन म्हणून उंटाचा उपयोग केला जातो.

iii) उंटाची चालण्याची गती 65 किमी च्या जवळपास असते. तसेच लांबच्या प्रवासा दरम्यान त्याची गती 40 किमी पर्यंत कायम ठेवू शकतो. म्हणून उंटाला “वाळवंटातील जहाज’ असे म्हणतात.

आ) निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात.

उत्तर :

i) वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा असल्यास ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्याचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते.

ii) या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते.

iii) खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे ते मांसल बनते.

iv) पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषन करावे लागते म्हणून ती हिरवी असतात.

v) या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात. या वनस्पतींच्या खोडावरदेखील मेणचट पदार्थाचा जाड थर असतो म्हणून निवडुंग, बाभूळ व इतर वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज जगू शकतात.

इ) सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे ?

उत्तर :

अनुकूलन व सभोवतालची परिस्थिती यांचा घनिष्ट संबंध दिसून येतो.

i) अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय.

ii) अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वत:ला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वत:चे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय.

ई) सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ?

उत्तर :

सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या गुणधर्माचे निकष लावून केले जाते.

i) वनस्पतींच्या खोडाचा आकार व उंचीनुसार, जीवनक्रम कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते.

ii) प्राण्यांचे पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते.

Leave a Comment