हवेचा दाब स्वाध्याय
हवेचा दाब स्वाध्याय इयत्ता सातवी
Table of Contents
प्रश्न. 1. कारणे द्या.
1) हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
उत्तर :
कारण – i) हवेतील धूलिकण, बाष्प, जड, वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत असते. उंची वाढत जाते, तसे हे प्रमाण कमी होते.
ii) म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. म्हणून हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
2) हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते.
उत्तर :
कारण – i) सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धा दरम्यान बदलत जाते. त्यामुळे तापमान पट्टे व त्यांवर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो.
ii) हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात 5° ते 7° उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात 5° ते 7° दक्षिणेकडे सरकतात. अशा प्रकारे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते.
प्रश्न. 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1) हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो ?
उत्तर :
i) तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो.
ii) जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.
2) उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो ?
उत्तर :
i) पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते.
ii) या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो.
iii) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
प्रश्न. 3. टिपा लिहा.
1) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे
उत्तर :
i) विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते.
ii) जाड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते.
iii) परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° ते अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते. त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही.
iv) परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.
2) हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण
उत्तर :
i) तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो, तर हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात. हवेच्या दाब पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित असतो.
ii) तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात.
प्रश्न. 4. गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
1) हवा उंच गेल्यावर …………….. होते.
(दाट, विरळ, उष्ण, दमट)
उत्तर :
हवा उंच गेल्यावर विरळ होते.
2) हवेचा दाब ……………….. या परिमाणात सांगतात.
(मिलिबार, मिलीमीटर, मिलिलिटर, मिलिग्रॅम)
उत्तर :
हवेचा दाब मिलिबार या परिमाणात सांगतात.
3) पृथ्वीवर हवेचा दाब ………………. आहे.
(समान, असमान, जास्त, कमी)
उत्तर :
पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे.
4) 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान ………………. दाबाचा पट्टा आहे.
(विषुववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी, मध्य अक्षवृत्तीय जास्त)
उत्तर :
5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे.
प्रश्न. 5. 30° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो. तो भाग वाळवंटी का असतो ?
उतर :
i) विषुववृत्तीय उष्ण हवा हलकी होऊन वर जाते. वर गेल्यावर थंड व जड होते. जड हवा परत खाली येऊ पाहते परंतु विषुववृत्तीय उष्ण हवेचे ऊर्ध्ववहन प्रभावी असल्याने हवा परत वर रेटली जाते.
ii) ही हवा शेवटी 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान भूपृष्ठावर खाली येते व तेथेच कोंडून राहते. त्यामुळे 30° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो.
iii) ही हवा कोरडी असल्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी तो भाग वाळवंटी बनतो.
प्रश्न. 6. हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या.
उत्तर :