सूर्य, चंद्र व पृथ्वी स्वाध्याय

सूर्य, चंद्र व पृथ्वी स्वाध्याय

सूर्य, चंद्र व पृथ्वी स्वाध्याय इयत्ता सातवी


Table of Contents

प्रश्न. 1. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.

1) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – i) चंद्र हा स्वत:भोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो.

ii) तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला, तरी तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो.

2) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.

3) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – i) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात.

ii) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5° चा कोन करते.

4) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो.

5) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे चुकीचे आहे. कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकतो. म्हणून सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते.

6) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

प्रश्न. 2. योग्य पर्याय निवडा.

1) सूर्यग्रहण :

अ)

आ)

इ)

उत्तर :

आ)

2) कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब :

उत्तर :

3) चंद्राची अपभू स्थिती :

उत्तर :

प्रश्न. 3. पुढील तक्ता पूर्ण करा.

तपशील/वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण
तिथी दिवस अमावास्या
स्थिती चंद्र-पृथ्वी-सूर्य
ग्रहणांचे प्रकार
खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे

उत्तर :

तपशील/वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण
तिथी दिवस अमावास्या
स्थिती चंद्र-पृथ्वी-सूर्य
ग्रहणांचे प्रकार
खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे

प्रश्न. 4. आकृती काढा व नावे लिहा.

1) खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण

उत्तर :

2) खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण

उत्तर

प्रश्न. 5. उत्तरे लिहा.

1) दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत ?

उत्तर :

i) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात.

ii) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5° चा कोन करते.

iii) परिणामी, चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो.

iv) प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180° असतो. त्यामुळे दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाही.

2) खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते ?

उत्तर :

i) सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते.

ii) मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय.

iii) त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशत: ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते.

3) ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा.

उत्तर :

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ-अभुभ असे काहीही नसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते.

‘दे दान सुटे गिराण’ च्या अनेक आरोळ्या तुम्ही ग्रहणाच्या वेळी ऐकल्या असतील. देशभरातल्या ‘पवित्र’ नद्यांमध्ये हजारो भाविकांनी डुबकी मारली असेल आणि दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर हे ग्रहण कोणत्या राशींच्या व्यक्तींना शुभ अथवा अशुभ आहे याची प्रदीर्घ चर्चा तज्ज्ञ व्यक्तींकडून सुरू असते. प्रत्येक ग्रहणाच्या वेळी ही स्थिती असते. खरं तर ग्रहण हा निव्वळ सावल्यांचा खेळ आहे. तुमची-माझी सावली पडते तशी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण घडून येते. इतकी ती साधी आणि नैसर्गिक गोष्ट आहे. दूरचित्रवाणी ही तर विज्ञानाची देणगी आहे. पण याच साधनांचा वापर करून अनेक वाहिन्या अवैज्ञानिक विचारांना वारेमाप प्रसिद्धी देतात. दूरचित्रवाणी आता घरघरात पोहचली आहे. या दृकश्राव्य माध्यमाची शक्ती प्रचंड आहे. तिचा उपयोग अंधश्रद्धेच्या प्रचार-प्रसारासाठी अजिबात होता कामा नये.

4) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल ?

उत्तर :

सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

5) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील ?

उत्तर :

उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण होते.

Leave a Comment