सर्व विश्वचि व्हावे सुखी स्वाध्याय

सर्व विश्वचि व्हावे सुखी स्वाध्याय

सर्व विश्वचि व्हावे सुखी स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

१) खालील चौकटी पूर्ण करा.

अ) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना –

उत्तर :

पसायदान

आ) मानवी सुखदु:खाशी सह्रदयतेने समरस होणे –

उत्तर :

मैत्री

इ) ‘सर्वाभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत –

उत्तर :

संत एकनाथ

ई) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत –

उत्तर :

संत गाडगे बाबा

उ) संत तुकारामांचे जीवनसूत्र –

उत्तर :

परस्पर सहकार्य

२) आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

इ)

उत्तर :

३) फरक सांगा.

सामान्य माणसाचे मागणेसंतांचे मागणे
अ)अ)
आ)आ)

उत्तर :

सामान्य माणसाचे मागणेसंतांचे मागणे
अ) वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात.अ) सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे.
आ) स्वत:पुरते मर्यादित.आ) विश्वव्यापक

४) खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा.

अ) जे खळांची व्यंकटी सांडो

उत्तर :

माणसांच्या मनातील दृष्ट भाव नष्ट होऊ दे.

आ) दुरिताचें तिमिर जावो

उत्तर :

(दुरित म्हणजे दुष्कर्म) सर्व दुष्कर्माचा अंधार नष्ट होऊ दे.

५) खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.

(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)

अ. क्र.काव्यांशसंतांचे नावकाव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
१)‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’……………….……………….
२)‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’……………….……………….
३)‘सर्वाभूती भगवद्भावो’……………….……………….
४)‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’……………….……………….
५)‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’……………….……………….

उत्तर :

अ. क्र.काव्यांशसंतांचे नावकाव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
१)‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’संत तुकडोजी महाराजविश्वकल्याण
२)‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’संत नामदेवनम्रता
३)‘सर्वाभूती भगवद्भावो’संत एकनाथमैत्रभाव
४)‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’संत तुकारामसहकार्य
५)‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’संत गाडगे महाराजस्वप्रयत्न

६) स्वमत

अ) सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

उत्तर :

सकाळी उठल्यावर किंवा घरातून बाहेर पडताना माणूस देवाच्या पाया पडतो आणि ‘दिवस चांगला जाऊ दे; कोणत्याही अडचणी नको येऊ देत’ अशी आळवणी करतो. रात्री झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करून दिवस चांगला गेल्याबद्दल त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करतो. खरे तर दिवसभरात कधीही संकट आले की, देवाची प्रार्थना करतो, नीट पाहिल्यावर लक्षात येईल की, प्रत्येक माणूस स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबीयांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी देवाकडे याचना करतो. ही खूपच मर्यादित, वैयक्तिक व स्वार्थी प्रार्थना आहे. कारण सामान्य माणसे स्वत:पलीकडे पाहू शकत नाहीत.

संतांचे तसे नाही. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दल कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्वमानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वाच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वत:च्या ह्रदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वाच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वानी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वत:साठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.

आ) ‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांचा समजलेला अर्थ लिहा.

उत्तर :

ही ओळ ऐकताच आपल्या सर्वाच्या मनात एक भाव नक्की जागा होतो. सर्वाना एकमेकांविषयी प्रेम वाटावे, जिव्हाळा निर्माण व्हावा अशी इच्छा ज्ञानदेव देवाकडे व्यक्त करतात.

या ओळीतील ‘भूत, मैत्र आणि जीव’ हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण ‘भूत’ होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती-गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वाच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींचा पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.

इ) या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी, सर्वामध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती शांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वानी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सह्रदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वानी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.

भाषाभ्यास

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

अ) म्हणे वासरा। घात झाला असा रे

तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे

वृथा धाडिला राम माझा वनासी

न देखो शके त्या जगज्जीवनासी

उत्तर :

आ) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी

कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी

वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे

स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे

उत्तर :

इ) मातीत ते पसरले अति रम्य पंख।

केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।

चंचू तशीच उघडी पद लांबवीले।

निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।।

उत्तर :

Leave a Comment