माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय

माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय

माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) लेखिका कोठे राहत होती ?

उत्तर :

लेखिका कोल्हापूरमधल्या मध्यवर्ती कारागृहाजवळ असलेल्या एका झोपडीत राहत होती.

आ) झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा ?

उत्तर :

झोपडीत नेहमी कुबट वास यायचा कारण आतली जमीन सतत ओलसर असायची.

इ) लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करत होते ?

उत्तर :

लेखिकेचे आईबाबा बोरगावाला जायची तयारी करत होते.

ई) दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता ?

उत्तर :

दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता कारण त्याला तिला शाळेत घालून शिक्षण द्यायचे होते.

उ) वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले ?

उत्तर :

वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले कारण लेखिकेने नाव शाळेत दाखल करण्यासाठी जे पैसे हवे होते ते वहिनीजवळ नव्हते.

प्रश्न. 2. कोण, कोणास, म्हणाले ते लिहा.

अ) “कित द स हितं बसून खायाचं ?”

उत्तर :

आई अशोकला म्हणाली.

आ) “चांगल शिकल तर कुठंतर नाकर कर ल.”

उत्तर :

अशोक वडिलांना म्हणाला.

इ) “पारांना जवायला घालून शाळत पाठव.”

उत्तर :

अशोक सुमितीला म्हणाला.

ई) “मुल चं पूण नाव काय ?”

उत्तर :

शाळेची बाई वहिनीला म्हणाली.

उ) “तुमच्याजवळ सव्वा रुपया आह का ?”

उत्तर :

वहिनी लताक्काला म्हणाली.

प्रश्न. 3. खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा.

उदा. झोपायला – झोपा, पाय, पाला, झोला.

1. आजकाल

उत्तर :

आजकाल – आज, काल, आकाल, जल, काज

2. घालताना

उत्तर :

घालताना – घाल, घाना, लता, ताना, ताल, नाल

3. माझ्याजवळ

उत्तर :

माझ्याजवळ – माझ्या, माज, माळ, जमा, जव, जवळ, मावळ, वळ, वज

4. आठवण

उत्तर :

आठवण – आठ, आठव, आव, आण, वढ, वण

प्रश्न. 4. ‘फुटकीतुटकी’ यासारखे पाठात आलेले जोडशब्द लिहा.

उत्तर :

i) अंथरायला

ii) पांघरायला

प्रश्न. 5. धाड्कन यांसारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर :

काडकन, खाडकन, ताडकन, थाडकन, फाडकन, भाडकन

खेळ खेळूया

भाजी विकणाऱ्या सुबामावशीविषयीला खालील परिच्छेद वाचा. यातील रंगीत शब्द स्वत:ची जागा चुकलेत. ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहा.

डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर गर्द उन्हातून चालून सुबामावशी वैतागली होती. पाटीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती. सकाळी निघतानाची सुकलेली वांगी उन्हाच्या तडाक्यानं रसरशीत दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहचतो, अस सुबामावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी दोन वाजता होती अन् आता भर दुपारचे फक्त सहा वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीचे स्टँडजवळचे आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या टळटळीत सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले.

उत्तर :

डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर टळटळीत उन्हातून चालून सुबामावशी वैतागली होती. पाटीतली हिरवीगार मेथी उन्हाने कोमेजून पिवळी पडू लागली होती. निघतानाची रसरशीत वांगी उन्हाच्या तडक्यानं सुकलेली दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहचतो, असे सुबामावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी सहा वाजता होती अन् आता भर दुपारचे दोन वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टँडजवळचे आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या गर्द सावलीत आल्यांवर तिला हायसे वाटले.

वाचूया, समजून घेऊया.

सूचना फलक व जाहिरात यांचे काही नमुने दिलेले आहेत, ते वाचा. यासारखे आणखी नमुने तयार करा.

उत्तर :

खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व संबंधित प्रश्नांची उत्तरे द्या.

अ) पेरूची विक्री कुठे होणार आहे ?

उत्तर :

पेरूची विक्री निमगाव बसस्टँडच्या शेजारी सुरू होणार आहे.

आ) ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत’ प्रसिद्ध म्हणजे काय ?

उत्तर :

‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत’ म्हणजे खेड्यापाड्यांपासून ते मोठ्या शहरापर्यंत.

इ) 10 जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त किती दिवस पेरू अल्पदरात मिळतील ?

उत्तर :

10 जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त पाच दिवस पेरू अल्पदरात मिळतील.

ई) अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले गेले होते का ? ते तुम्हांला कशावरून कळले ?

उत्तर :

अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले गेले नव्हते हे ‘यावर्षी पहिल्यांदाच’ या शब्दांवरून कळते.

उ) वत्सलाबाईच्या मळ्यातले पेरू संपणार, म्हणून चित्रातले पोपट उदास होत असतील का ? पोपट खरोखरच पेरू खातात का ? शोधण्याचा प्रयत्न करा.

उत्तर :

पेरी खाताना मी पोपटाला पाहिले आहे. वत्सलाबाईच्या नाही तर इतर कुणाच्या मळ्यातले पेरू खातील. म्हणून ते उदास होणार नाहीत.

ऊ) पेरूचा बाजारभाव 30 रुपये प्रतिकिलो होता. सुमाच्या आईने संक्रांतीच्या आदल्या दिवशी 45 रुपयांचे पेरू आणले. तिला किती किलो पेरू मिळाले असतील ?

उत्तर :

सुमाच्या आईला दीड किलो पेरू मिळाले असतील.

ए) बाजारापेक्षा निम्म्या भावात पेरू विकण्याचे कारण काय असेल ? चर्चा करून उत्तर लिहा.

उत्तर :

असे केल्याने आपले पूर्ण पेरू विकले जातील आणि भरपूर पैसा आपल्याला मिळेल अशी वत्सलाबाईची अपेक्षा असावी.

ऐ) गाताची वाडी, ता. बार्शी इथले शेतकरी श्री. उस्मान मुलाणी त्यांच्या स्वत:च्या शेतातली दगडी आणि मालदांडी ज्वारी बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकणार आहेत. त्यांच्यासाठी सोबतच्या नमुन्याप्रमाणे जाहिरात तयार करा.

उत्तर :

विजेबाबत दिलेले निवेदन वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) वीज बंद-निवेदन कोणी दिलेले आहे ?

उत्तर :

वीज बंद-निवेदन कार्यकारी अभियंता, हसेनगर विभाग यांनी दिलेले आहे.

आ) वीज बंद-निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे ?

उत्तर :

कोणत्या दिवशी व किती वेळाकरिता वीज पुरवठा होणार नाही हे लोकांना कळावे यासाठी वीज बंद-निवेदन देण्यात आलेले आहे.

इ) कोणत्या दिवशी वीजपुरवठा बंद करण्यात जाणार आहे ?

उत्तर :

गुरुवार दि. 25/02/16 रोजी स. 10 ते दु. 4 पर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

ई) कोणत्या भागातील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे ?

उत्तर :

हसेनगर परिसरात वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

उ) तुमच्या परिसरात एखाद्या दिवशी वीजपुरवठा बंद राहणार आहे, हे तुम्हांला कशावरून कळते ?

उत्तर :

वृत्तपत्रातील बातम्यांवरून

ऊ) कोणकोणत्या कारणांसाठी वीजपुरवठा बंद केला जातो ? चर्चा करा व लिहा.

उत्तर :

लोडशेडिंगसाठी व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद केला जातो.

ए) तुमच्या घरात विजेवर चालणारी कोणकोणती उपकरणे आहेत ?

उत्तर :

आमच्या घरी टीव्ही, कॉप्युटर, मिक्सर, पंखे, दिवे, इस्त्री, कूलर ही विजेवर चालणारी उपकरणे आहेत.

ऐ) तुमच्या घरामध्ये वीज वाचवण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

उत्तर :

उपकरणांची गरज संपताच ताबडतोब विजेचे बटन करू.

ओ) तुमच्या घरी दरमहा विजेचे बिल किती येते ? ते कमी येण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल ?

उत्तर :

विजेचे बिल किती आले ते बाबा सांगत नाहीत. वीज कमी वापरा एवढंच सांगतात आणि आम्ही उगीच वीज खर्च न करता काटकसरीने वागत असतो.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ‘प्रदर्शन’ या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा.

कोणत्या महिन्यात, किती दिवस, स्थळ, कोणाबरोबर पाहिले, पाहण्याचा उद्देश, पाहिलेल्या वस्तू, आवडलेल्या गोष्टी, संपूर्ण प्रदर्शनाविषयीचे मत.

उत्तर :

प्रदर्शन

नागपूरला धंतोली विभागात दरवर्षी दुर्गाप्रदर्शन भरत असते. दीनानाथ हायस्कूलच्या पटांगणात हे प्रदर्शन घटस्थापनेला सुरू होते. ते दसऱ्यापर्यंत चालते. देवीची मूर्ती बनवायला कोलकताचे कारागीर येत असतात.

प्रदर्शन पाहायला खूप गर्दी असते कारण या प्रदर्शनात लहान मुलांसाठी खूप काही असते. फुगे असतात, खेळणी असतात, विविध प्रकारचे आकाशपाळणे असतात. हे प्रदर्शन पाहायला मुले हट्ट धरतात. म्हणून बहुतेक लोक हे प्रदर्शन पाहायला सहकुटुंब सहपरिवार येत असतात. मीही हे प्रदर्शन आईवडिलांसोबत पाहिले.

बाजारात उपलब्ध नाहीत अशा अनेक वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध होतात. आईबाबांनी काही वस्तूंची खरेदी केली. मलाही माझ्या आवडीची खेळणी घेऊन दिली. पण तिथे असलेले आकाशपाळणे आणि इतर खेळणी यांचाच आस्वाद घेण्यात मला खूप आनंद येत होता.

करमणूक हाच माझा उद्देश होता आणि तो पूर्ण झाला होता.

Leave a Comment