निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय

निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय

निवारा ते गाव वसाहती स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2

1. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकरीवर अधिक भर होता ?

उत्तर :

बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरीण, डोंगरी शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकरीवर अधिक भर होता.

आ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते ?

उत्तर :

शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

2. पुढील विधानांची कारणे लिहा.

अ) मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.

उत्तर :

कारण – i) मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केले होती.

ii) या युगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.

2) मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.

उत्तर :

कारण – i) बदलत्या हवामानानुसार मानव धान्याची कापणी करणे, फळे, कंदमुळे गोळा करणे ही कामे करीत होता.

ii) मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्यांचा फायदा करून घेत होते.

iii) कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेच याचे निरीक्षण करत होते. यामुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.

3. मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

अ) चित्रातील घरांची रचना कशी आहे ?

उत्तर :

चित्रातील घरांची रचना झोपडीसारखी आहे.

आ) चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते ?

उत्तर :

चित्रातील घरांच्या बांधणीसाठी लाकूड, वाळलेली झाडे, वाळलेले गवत, झाडपाला हे साहित्य वापरलेले आढळते.

इ) हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात ?

उत्तर :

हंगामी तळातील व्यक्ती शेती करणे, शिकार करणे, मासेमारी करणे. इत्यादी व्यवसाय करीत असाव्यात.

4. विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा.

उत्तर :

i) पावसाळा – सतत पावसामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. पावसाच्या पाण्यामुळे गटारे तुडूंब भरतात. मानवाला प्रवास करतांना त्रास होतो. पिण्याचे पाणी दूषित, गढूळ असते. त्यामुळे कावीळ, कॉलरा, विषमज्वर यासारखे रोग होतात. पावसाळ्यातील कोंदट व दमट वातावरणामुळे अन्नावर लवकरच बुरशी येते. ते अन्न खाण्यायोग्य राहत नाही. तसेच या ऋतूमध्ये जड आहार घेण्याऐवजी पचायला हलका असा आहार घेतो. पाणी उकळून थंड करून आपण पितो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू नष्ट होतात.

ii) हिवाळा – हिवाळा या ऋतूत हवामान थंड असते. या हवामानात वेगवेगळी फळे, भाजीपाला मिळतो. त्यामुळे मानवाची प्रकृती चांगली राहते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण लोकरीचे व उबदार कपडे वापरतो. शक्यतोतर उन्हात बसतो. उष्णता निर्माण करणारे अन्नपदार्थ खातो.

iii) उन्हाळा – उन्हाळा या ऋतूत उष्ण हवामान असते. सर्वाना उन्हाचा त्रास होतो. या उष्ण हवामानामुळे चक्कर येणे, घाबरल्यासारखे होते. शरीराला घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. या ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो. तसेच आपल्या आहारात थंड पदार्थाचा समावेश करतो.

5. नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा.

उत्तर :

नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना पुढीलप्रमाणे केली आहे.

नवाश्मयुगीन खेडेआधुनिक खेडे
i) नवाश्मयुगीन खेड्यामध्ये लोकसंख्या विरळ होती.
ii) नवाश्मयुगीन खेड्यात शेती ही अगदी पारंपरिक पद्धतीने केल्या जात होती.
iii) नवाश्मयुगीन खेड्यातील घरांची रचना ही झोपडीवजा होती.
iv) या खेड्यामध्ये वस्तूविनिमय पद्धतीने व्यवहार केल्या जात होते.
v) या खेड्यामधील जीवनमानाचा दर्जा शिक्षणाअभावी खालावलेला होता.
i) आधुनिक खेड्यामध्ये लोकसंख्या जास्त असते.
ii) आधुनिक खेड्यामध्ये शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर केला जातो.
iii) आधुनिक खेड्यामध्ये घरांच्या रचनेत बदल झाला आहे. तेथे मातीची घरे, सिमेंटची घरे अशा पद्धतीची घरे आढळतात.
iv) या खेड्यामध्ये देवाण-घेवाणीचे व्यवहार पैशामार्फत होते. त्यामुळे व्यवहार सुरळीत होतात.
v) या खेड्यामधील जीवनमानाचा दर्जा शिक्षणामुळे उंचावलेला आहे.

Leave a Comment