आतां उजाडेल स्वाध्याय
आतां उजाडेल स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी
प्रश्न. 1. दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा.
अ) किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते ?
उत्तर :
आता पहाट होईल, उजाडेल. खिन्न आंधळा अंधार पार ओसरून जाईल. तेव्हा त्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते.
आ) आनंदाने मृदू गळ्यात कोण गणार आहेत ?
उत्तर :
आता पहाटेला शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील. तेव्हा आनंदाने मृदू गळ्यात किलबिल करीत खग म्हणजे पक्षी गाणार आहेत.
इ) पानांवर दहिंवर केव्हा हसेल ?
उत्तर :
आता पहाटेला वारा पर्णामध्ये हसेल. मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशात दहिंवर मिसळेल. तेव्हा दहिंवर पानावर हसेल.
ई) गारवा कशामुळे थरारेल ?
उत्तर :
आता पहाटेला पारिजात आनंदात बरसात उधळील. तेव्हा गोड कोवळा गारवा सुंगधात थरारेल.
उ) प्रकाशाचे महादान कोणते ?
उत्तर :
आता पहाट होईल. निळे आकाश प्रकाशाने भरेल. दाही दिशा उजळून निघतील. सर्वत्र उजेड पसरणे हे प्रकाशाचे महादान होय.
ऊ) उजडल्यामुळे कोणते भय संपणार आहे ?
उत्तर :
उरात ज्योतिर्मय झरे वाहतील. पहाटेला आशीर्वाद प्राणातून उगवेल. कारण उजाडल्यामुळे अंधाराचे, काळोखाचे भय संपणार आहे.
प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते ?
उत्तर :
उजळल्यामुळे खिन्न, आंधळा अंधार पार ओसरून जाईल. किरणांची कलाबूत मोहरेल. आनंदाने मृदू गळ्यात पाखरे गातील. वारा पर्णामध्ये हसेल. पानांवर दहिवर हसेल. पारिजात आनंदात बरसात उधळील. गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल. निळे आकाश आणि दाही दिशा प्रकाशाने भरून जातील. उजाडल्यामुळे निसर्गात ह्या सर्व घटना घडतील असे कवीला वाटते.
आ) ‘पहाटेला आशीर्वाद प्राणांतून उगवेल’ या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा.
उत्तर :
पहाटेचा आशीर्वाद म्हणजे उत्साह, प्रफुल्लता, चैतन्य होय. पहाटे उठणाऱ्याच्या मनात, प्राणांत उत्साह, प्रफुल्लता, उल्हास, चैतन्य फुलत असतो. असा या ओळीचा अर्थ आहे. म्हणून आपला आळस, निराशा, खिन्नता दूर होण्यासाठी पहाटेचा आशीर्वाद घ्यावा असे कवी म्हणतात.
प्रश्न. 3. खालील ओळी वाचा. त्याचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
अ) खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार.
उत्तर :
अंधार आंधळा असतो म्हणजे अंधारात आपल्याला काहीच दिसत नाही. अंधारात आपल्याला काहीच दिसच नसल्यामुळे आपल्याला कोणतेही काम करता येत नाही. उजाडले की असा अंधार पार नाहीसा होतो. उजाडल्यामुळे प्रकाश पडतो. आपल्याला दिसू लागते आणि करायचे ते करता येते.
आ) मृदु गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल.
उत्तर :
उजाडले की पाखरांच्या कोमल कंठातून त्यांची किलबिल पसरेल, त्यांची किलबिल ऐकू येईल.
इ) आनंदात पारिजात उधळील बरसात.
उत्तर :
उजाडले की पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो. म्हणजे पारिजात आनंदाने फुलांचा वर्षाव करील.
ई) प्रकाशाचे महादान कणकणांत स्फुरेल.
उत्तर :
प्रकाशाचे महादान म्हणजे उजेड सर्वत्र पसरेल. तो कणाकणात पसरेल म्हणजे मनामनातही पसरेल असे कवीला म्हणायचे आहे.
प्रश्न. 4. ‘आता उजाडेल !’ या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. ‘आता पाऊस पडेल !’ व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या चार ओळी लिहा.
आतां उजाडेल !
खिन्न आंधळा अंधार
आतां ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !
उत्तर :
आता पाऊस पडेल !
सारा दाह संपेल
तृर्षात भूमी निवेल
झरे पाझरतील उल्हसित
मने हिरवी अंकुरतील !
प्रश्न. 5. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा.
अ) ……………… आनंदाच्या लाटा.
उत्तर :
शुभ्र आनंदाच्या लाटा.
आ) ……………. आकाश.
उत्तर :
निळे आकाश.
इ) ……………. गळ्यांत.
उत्तर :
मृदु गळ्यांत.
ई) …………….. गारवा.
उत्तर :
गोड कोवळा गारवा.
प्रश्न. 6. दान-महादान यासारखे तुम्हांला माहीत असलेले शब्द लिहा.
उत्तर :
i) प्राण – महाप्राण
ii) प्रयाण – महाप्रयाण
iii) पुण्य – महापुण्य
iv) राजा – महाराजा
v) पापी – महापापी
vi) भयंकर – महाभयंकर
खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा.
उदा., कान टवकारणे
उत्तर :
i) पोटात कावळे ओरडणे.
ii) धुडकावून लावणे.
iii) डोळ्यात सलणे.
iv) कापरे भरणे.
v) टवाळकी करणे.
vi) वनवासी होणे.
vii) कानगोष्टी करणे.
viii) नकार देणे.
ix) मरगळ येणे.
x) कावराबावरा होणे.
xi) वाट लावणे.
xii) वजन असणे.
xiii) असर होणे.