सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
उत्तर :
सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. यांच्या निषेधार्थ सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.