शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय
शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय इयत्ता सहावी नागरिकशास्त्र
1. दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय ओळखा व लिहा.
1) महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचे नाव……………..
(नागपूर, मुंबई, लातूर)
उत्तर :
महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचे नाव मुंबई.
2) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते ……………..
(नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत)
उत्तर :
शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते नगरपंचायत.
3) नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो………………
(मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष)
उत्तर :
नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो अध्यक्ष.
2. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात ?
उत्तर :
शहरामध्ये पुढील समस्या आढळतात. i) शहरामध्ये लोकांना अपुरा निवारा मिळतो.
ii) तेथे लोकसंख्या जास्त असल्याने जागेची टंचाई असते.
iii) वाहतुकीची कोंडी होते.
iv) कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या असते.
v) शहरात वाढती गुन्हेगारीची समस्या आहे.
vi) मोठ्या प्रमाणात लोकांची घरे गलिच्छ वस्त्यांमध्ये आहेत.
2) महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा.
उत्तर :
महानगरपालिकेच्या समित्यांची नावे – शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती, पाणीपुरवठा समिती, प्रभाग समिती.
3. पुढील मुद्द्यांच्या आधारे शहरी स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा.
मुद्दे | नगरपंचायत | नगरपरिषद | महानगरपालिका |
---|---|---|---|
पदाधिकारी | |||
सदस्य संख्या | |||
अधिकारी |
उत्तर :
मुद्दे | नगरपंचायत | नगरपरिषद | महानगरपालिका |
---|---|---|---|
पदाधिकारी | नगराध्यक्ष उपाध्यक्ष | अध्यक्ष उपाध्यक्ष | महापौर उपमहापौर |
सदस्य संख्या | किमान 9 कमाल 15 | किमान 17 कमाल 38 | लोकसंख्येच्या प्रमाणत एकूण सदस्य संख्या ठरते. |
अधिकारी | कार्यकारी अधिकारी | मुख्याधिकारी | आयुक्त |
4. सांगा पाहू.
1) नगरपरिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो ?
उत्तर :
नगरपरिषदेच्या आवश्यक कामांमध्ये पुढील कामांचा समावेश होतो.
i) रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे.
ii) सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
iii) मलनि:सारणाची व्यवस्था करणे.
iv) जन्म-मृत्यूची नोंद करणे, विवाहाची नोंद करणे.
v) सामाजिक व आर्थिक विकासाचे नियोजन करणे.
vi) नागरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण करणे.
vii) धोकादायक इमारतींबाबत सूचना देणे व कारवाई करणे.
viii) प्राथमिक शिक्षणाची व सार्वजनिक दवाखान्याची सोय करणे.
ix) पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
x) अग्निशामक सेवा पुरवणे.
2) नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते ?
उत्तर :
i) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात. तेथे नगरपंचायत असते.
ii) अर्थात ज्या ठिकाणी पूर्णत: खेडेही नाही आणि शहरही नाही अशा ठिकाणी नगरपंचायत असते.
5. तुमच्या जिल्ह्यात कोठे कोठे नगरपंचायत व महानगरपालिका काम पाहते त्यांच्या नावांची यादी करा.
उत्तर :
नगरपरिषद | कळमेश्वर, काटोल, नरखेड, भिवापूर, उमरेड, सावनेर कामठी, रामटेक, मोवाड |
नगरपंचायत | वाडी |
महानगरपालिका | नागपूर |