मानवाचे व्यवसाय स्वाध्याय
मानवाचे व्यवसाय स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल

अ) योग्य पर्याय निवडा.
1) …………….. ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते.
अ) बस कंडक्टर
ब) पशुवैद्यक
क) वीटभट्टी कामगार
उत्तर :
बस कंडक्टर ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते.
2) उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने ……………. व्यवसाय आढळतात.
अ) प्राथमिक
ब) द्वितीयक
क) तृतीयक
उत्तर :
उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात.
3) अमोलची आजी पापड, लोणची विकते. हा व्यवसाय कोणता ?
अ) प्राथमिक
ब) द्वितीयक
क) तृतीयक
उत्तर :
तृतीयक
ब) कारणे लिहा.
1) व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो.
उत्तर :
कारण – i) प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेती करणे, लाकूड तोडणे यासारख्या कामांसाठी विशेष पदवी प्राप्त करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींचे उत्पन्न कमी असते.
ii) चतुर्थक व्यवसायातील लोकांना विशेष पदवी प्राप्त करावी लागते. जसे डॉक्टर, संशोधक. त्यामुळे व्यवसायातील लोकांचे उत्पन्न जास्त असते. म्हणून व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो.
2) प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात.
उत्तर :
कारण – i) प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यफळ लागते. या व्यवसायात कमी उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते.
ii) या उलट तृतीय व्यवसायातील लोकांचे उत्पन्न जास्त असते. त्यामुळे तृतीय व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त असते. ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक तो देश विकसित म्हणून गणल्या जातो. म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात.
3) चतूर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत.
उत्तर :
कारण – i) चतुर्थक व्यवसायातील सेवा या विशेष पदवी प्राप्त लोकांकडून पुरविल्या जातात. त्यासाठी अधिक मूल्य खर्च करावे लागते.
ii) या सेवा सर्वसामान्य नसतात. म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत.