कापणी स्वाध्याय
कापणी स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते ?
उत्तर :
कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.
आ) पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते ?
उत्तर :
पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे उभ्या पिकांची (दान्याची) मापनी उभी राहाते.
इ) पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते ?
उत्तर :
पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धमक दिसते.
ई) कवयित्रीने ‘हिंमत धरा’ असे का म्हटले आहे ?
उत्तर :
विळ्यांना धार लावून कापणी करायची आहे. म्हणून कवयित्रीने ‘हिंमत धरा’ असे म्हटले आहे.
उ) कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे ?
उत्तर :
कापणी करायची आहे. म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे.
प्रश्न. 2. खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा.
अ) आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा.
उत्तर :
आता धरारे हिंमत, इय्ये ठेवा रे गोफनी.
आ) हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या.
उत्तर :
हातामधी धरा इय्ये, खाले ठेवा रे गोफनी.
इ) कापलेल्या पिकांची रास लागलेली आहे.
उत्तर :
थाप लागली पिकाची
ई) कापणी झाल्यावर रगडणी येते.
उत्तर :
आली पुढे रगडनी, आता कापनी कापनी.
प्रश्न. 3. पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात, ते क्रमाने लिहा.
उत्तर :
पिके कापायला आल्यानंतर कापणी येते, विळ्यांना धार लावून ठेवावी लागते, हातातील गोफण खाली ठेवून हातात विळे घ्यावे लागतात. कणसे तोडावी लागतात. रगडणी करावी लागते. रास रचण्याकरिता खळे करावे लागते.
प्रश्न. 4. तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे कसे बदल होत गेले, याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा.
कामे | पूर्वीची स्थिती | सध्याची स्थिती |
---|---|---|
शेताला पाणी देणे. | बैलांच्या साह्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे, काढणे, शेताला पाटाने पाणी देणे. | बोअरला मोटर लावून पाणी उपसणे. तुषार सिंचन, ठिबक सिंचन करणे |
उत्तर :
कामे | पूर्वीची स्थिती | सध्याची स्थिती |
---|---|---|
शेताला पाणी देणे. | बैलांच्या साह्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे, काढणे, शेताला पाटाने पाणी देणे. | बोअरला मोटर लावून पाणी उपसणे. तुषार सिंचन, ठिबक सिंचन करणे |
धान्य कापणी | विळ्याने धान्य कापले जाई. | यंत्राच्या साहाय्याने धान्य कापले जाते. |
प्रश्न. 5. ‘डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते’ असा उल्लेख या कवितेत आलेला आहे. काहीतरी शुभ घडणार असेल, तर असे म्हणतात. अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत. तुमचे आजी-आजोबा, आई-वडील, शेजारी, आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या. त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या. त्या मागील वैज्ञानिक कारणे लिहा.
उत्तर :
i) मांजर आडवे जाणे (अशुभ)
ii) मुंगुस दिसणे (शुभ)
iii) पालीचा स्पर्श होणे (अशुभ)
प्रश्न. 6. ही कविता तुम्हांला आवडली का ? या कवितेतील तुम्हांला आवडलेल्या ओळी लिहा.
उत्तर :
ही कविता आम्हांला आवडली. आम्हांला आवडलेल्या ओळी –
i) पीक पिवये पिवये,
आली कापनी कापनी.
ii) थाप लागली पिकाची
आली डोयाले झापनी !
प्रश्न. 7. इया म्हणजे विळा, बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत ‘व’ ऐवजी ‘इ’ आणि ‘ळ’ ऐवजी ‘य’ चा उपयोग करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा.
उत्तर :
i) डोयाची – डोळ्याची
ii) पिवये – पिवळे
iii) इय्ये – विळे
iv) डोयाले – डोळ्यांना
v) खये – खळे
प्रश्न. 8. खालील वाक्ये वाचा. त्यांतील समानार्थी शब्द शोधा व लिहा.
उदा., शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना.
1) पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते.
उत्तर :
पंकज – सरोज – कमळ
2) सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिले.
उत्तर :
सौदामिनी – वीज
3) रजनी, यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या.
उत्तर :
रजनी – यामिनी – निशा – रात्री
4) संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते.
उत्तर :
संग्राम – समर – युद्ध
5) सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली.
उत्तर :
सुमन- कुमुद – कुसुम – फूल
6) रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात.
उत्तर :
रवी – भास्कर – आदित्य – सविता – भानू – मित्र – सूर्य
कंसांत काही क्रियापदे दिली आहेत. त्यांची योग्य रुपे तयार करून खालील वाक्यांतील रिकाम्या जागी लिहा.
उदा., राधाने टाळ्या ……………….. (वाजवणे)
राधाने टाळ्या वाजवल्या.
1. शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन …………………. (करणे)
उत्तर :
शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले.
2. चंदूने झाडांना पाणी ……………….. (घालणे)
उत्तर :
चंदूने झाडांना पाणी घातले.
3. आईने नीताला प्रश्न ………………… (विचारणे)
उत्तर :
आईने नीताला प्रश्न विचारले.
4. मंदा गाणी छान ……………… (म्हणणे)
उत्तर :
मंदा गाणी छान म्हणते.
कंसातील सुचनेनुसार वाक्ये बदलून पुन्हा लिहा.
1. आकाशात ढग येताच मोर नाचू लागला.
(‘मोर’ ऐवजी ‘मुले’ हा शब्द घ्या.)
उत्तर :
आकाशात ढग येताच मुले नाचू लागली.
2. साप दिसताच तो घाबरला.
(‘तो’ ऐवजी ‘त्या’ हा शब्द घ्या.)
उत्तर :
साप दिसताच त्या घाबरल्या.
3. अभयने दप्तर जागेवर ठेवले .
(‘अभय’ ऐवजी ‘शारदा’ हा शब्द घ्या.)
उत्तर :
शारदाने दप्तर जागेवर ठेवले.
4. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
(‘पृथ्वी’ ऐवजी ‘चंद्र’ हा शब्द घ्या.)
उत्तर :
चंद्र सूर्याभोवती फिरतो.