स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय
स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले ?
उत्तर :
सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले. कारण ही देशसेवा आहे आणि कोणतेही काम हलके नसते, असे त्यांचे मत होते.
आ) गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले ?
उत्तर :
तात्या एवढा शिकलेला असूनही हातात झाडू घेऊन सफाईचे काम करतो आणि या कामात सामील व्हावे असे म्हणतो, असे गावकऱ्यांनी तात्याच्या वडिलांना सांगितले.
इ) तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला ?
उत्तर :
हातात झाडू घेऊन सफाई करणे हे वंगाळ काम आहे अशी लोकांची वृत्ती होती. तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या या वृत्तीत बदल होत गेला.
ई) थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात ?
उत्तर :
थोर व्यक्ती आपल्याला त्यांच्या आचरणातून शिकवण घालून देतात.
प्रश्न. 2. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ) तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता ?
उत्तर :
स्वातंत्र्यदिन, गणराज्य दिन, बालकदिन, शिक्षकदिन आणि जेव्हा जेव्हा शाळेत कार्यक्रम होतात तेव्हा तेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो.
आ) जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता, तेव्हा कशकशाची सफाई करता ? का ?
उत्तर :
जेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो, तेव्हा प्रत्येक वर्गाची, शाळेच्या आवाराची, पटांगणाची, बागेची आणि वाचनालयाचीही सफाई करतो. प्रयोगशाळेचीही सफाई करतो. कारण यामुळे मन प्रसन्न राहते आणि शाळेत येणाऱ्यांनाही आनंद वाटतो.
इ) तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल ? ते आठ-दहा ओळींत लिहा.
उत्तर :
आमच्या मित्राला स्वच्छता आवडत नाही. स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायला आम्ही त्याला सांगू की, स्वच्छता न ठेवणे म्हणजे रोगांना निमंत्रण देणे होय. आपण रोज आंघोळ करून स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला चर्मरोग होतील. बाहेरून आल्यावर हातपाय न धूताच जेवायला बसलो तर जंतू पोटात जातील आणि विकार होईल. भाजी देखील बाजारातून आणल्यावर ती तशीच शिजवली तर ती खाल्याने आजार होऊ शकतो. अस्वच्छतेमुळेच माशा आणि डास यांचा उपद्रव होत असतो. त्यामुळे मलेरियासारखे रोग फैलावतात. अस्वच्छता ही आरोग्याचा शत्रू आहे. शरीराची स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मंत्र होय. गावाची स्वच्छता ही देशभक्ती होय. स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे.
ई) आपल्या देशातील तुम्हांला ‘स्वत:च्या’ वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा.
उत्तर :
माझ्या देशातील मला ‘स्वत:च्या’ वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे रेल्वे, बसेस, रस्ते, बगिचे, नद्या, पर्वत ह्या आहेत.
स्वच्छतेविषयीच्या खालील पाट्या वाचा व अशा प्रकारची घोषवाक्ये तयार करा.
उत्तर :
