कारागिरी स्वाध्याय
कारागिरी स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची ?
उत्तर :
लेखिकेला आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग करूनताटलीत मांडायचे. बेंडराला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे. लेखिकेला लहानपणी या गोष्टींची गंमत वाटायची.
आ) लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची ?
उत्तर :
लेखिकेच्या घरी स्वयंपाकाची सर्व भांडी मातीची असायची. मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी ही सर्व मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची.
इ) लेखिकेचे आजी-आजोबा मातीपासून काय काय बनवयाचे ?
उत्तर :
लेखिकेच्या आजी-आजोबांचा हात मातीच्या वस्तू बनविण्याच्या कामी थोडाफार बसलेला होता. नागपंचमीला मातीपासून चिखलाचा नाग बनवायचे, बेंदराला मातीचा बैल तयार करायचे.
ई) लेखिकेला तासन्तास काय बघत राहावेसे वाटायचे ?
उत्तर :
जिनगरानं बनवलेली लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या, सोनेरी नक्षीतला अन् जिगानं चकचकलेल्या शेंडीचा नारळ आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला ह्यांच्याकडे लेखिकेला तासन्तास बघत राहावेसे वाटायचे.
उ) जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे ?
उत्तर :
जिनगरांचा मामा पाळण्यांवरच्या खेळण्यासाठी राहूमैना अशा तयार करायचा, की खऱ्या-खोट्यातली फसगत व्हावी. खेळण्यांवर चमचमणाऱ्या चंद्रचांदण्याची शोभा तर भुलवणारी असे. म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे.
ऊ) कांबट्यापासून काय काय बनवता येते ?
उत्तर :
कांबट्यापासून रवळ्या, सुपं, कुरंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबलं ह्या वस्तू बनवता येतात.
ए) चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे ?
उत्तर :
चिमाच्या घरी दोरखंड, शिंकी, मुस्की, गोफण, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या बनवलेल्या असायच्या. कांदे, बटाटे ठेवायचा वाखाच्या पिशव्या बनायच्या. ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रंवीला लागणारी लहान धाटणीची दोरी बनायची. चिमाच्या घरी हे सारे बनवलेले असायचे.
ऐ) शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची ?
उत्तर :
शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी अंगडी, टोपडी, नऊ खणांची चोळी, पायघोळ परकर, मुलांसाठी पांघरूणं व मोठ्यांसाठी वाकळ शिवायची. लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी आणि फैनाबाज कुंची शिवायची.
ओ) माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा ?
उत्तर :
लेखिकेची आजी लहानग्यांची फैनाबाज कुंची शिवायची. माहेरवाशीण सासरी गेल्यावर त्या कुंचीची इतर कुंचींशी तुलना व्हायची. त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा.
प्रश्न. 2. कोणाला व का म्हटले आहे ते लिहा.
1) निर्मितीचा धनी
उत्तर :
निर्मितीचा धनी – हे कुंभाराला म्हटले आहे. कारण कुंभार मातीपासून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करत असतो.
2) भुईफुले
उत्तर :
भुईफुले – हे रांगोळीला म्हटले आहे. कारण रांगोळ्या फुलांसारख्या सुंदर वाटतात आणि त्या भुईवर म्हणजे जमिनीवर काढलेल्या असतात.
प्रश्न. 3. खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अ) तहानभूक हरपणे
उत्तर :
तहानभूक हरपणे – तहानभूक विसरून जाणे.
वा. उ. – कन्याकुमारीचा सूर्यास्त पाहून माझी तहानभूक हरपली.
आ) वाहवा मांडणे
उत्तर :
वाहवा मांडणे – स्तुती होणे, तारीफ होणे.
वा. उ. – अवंतीच्या लग्नाच्या जेवणाची सर्वांनी वाहवा मांडली.
इ) तोंडावर हसू फुटणे
उत्तर :
तोंडावर हसू फुटणे – खूप हसू येणे.
वा. उ. – सीमाने प्रशंसा म्हणजे निंदा असा अर्थ सांगितल्यामूळे माझ्या तोंडावर हसू फुटले.
ई) ऐटी मिरवणे
उत्तर :
ऐटी मिरवणे – तोरा गाजवणे
वा. उ. – नीलचा प्रथम क्रमांक आला तेव्हा ऐटी मिरवत तो घरी आला.
उ) हेवा करणे
उत्तर :
हेवा करणे – मत्सर वाटणे
वा. उ. – जयश्रीच्या भाग्याच्या तिच्या काही मैत्रिणींना हेवा वाटतो.
ऊ) तोंडात बोट घालणे
उत्तर :
तोंडात बोट घालणे – नवल करणे
वा. उ. – अलश्रीने नवरीचा केलेला शृंगार पाहून सर्वांनी तोंडात बोट घातले.
खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह या वाक्प्रचार संग्रहित करा.
1. कान
उत्तर :
कान – कान टोचणे, कान पिळणे, कान भरणे, कान फुंकणे, कानाला खडा लावणे.
2. डोळे
उत्तर :
डोळे – डोळे उघडणे, डोळा मारणे, डोळा चुकवणे, डोळा ठेवणे, डोळे झाटक करणे, डोळे पुसणे.
3. नाक
उत्तर :
नाक – नाक कापणे, नाक घासणे, नाक मुरडणे, नाकात दम येणे, नाकाने कांदे सोलणे.
4. डोके
उत्तर :
डोके – डोके उठणे, डोके वर काढणे, डोके टेकणे, डोके फिरणे, डोक्यावर घेणे, डोक्यावर मिरी वाटणे.
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा.
(टवटवीत, निळेशार, नवा, पन्नासावा, उंच)
1. हिमालय ……………… पर्वत आहे.
उत्तर :
हिमालय उंच पर्वत आहे.
2. बागेत …………… फुले आहेत.
उत्तर :
बागेत टवटवीत फुले आहेत.
3. काल बाबांचा ……………… वाढदिवस होता.
उत्तर :
काल बाबांचा पन्नासावा वाढदिवस होता.
4.समुद्राचे पाणी ……………… दिसत होते.
उत्तर :
समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते.
5. ताईने बाळाला ……………. सदरा घातला.
उत्तर :
ताईने बाळाला नवा सदरा घातला.