अन्नघटक स्वाध्याय
अन्नघटक स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1. काय करावे बरे ?
शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत.
उत्तर :
शरीराला पुरेशी प्रथिने मिळण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थाचा समावेश असावा.
2. जरा डोके चालवा.
रोज दूध प्यायला का सांगतात.
उत्तर :
कारण दुधामध्ये शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने इत्यादी आवश्यक अन्नघटक असतात. ही आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा तसेच शरीराची झीज भरून काढणारे घटक आहेत. म्हणून रोज दुध प्यायला हवे.
3. खालील प्रत्येक अन्नघटकाचे दोन स्त्रोत सांगा.
अ) खनिजे
उत्तर :
खनिजे – विविध फळे (चिकू, पेरू, संत्री, मोसंबी इ.), पालेभाज्या (पालक, मेथी इ)
आ) प्रथिने
उत्तर :
प्रथिने – अंडी, शेंगदाणे, दूध, विविध कडधान्ये, डाळी, दही, खवा, पनीर इत्यादी.
इ) पिष्टमय पदार्थ
उत्तर :
पिष्टमय पदार्थ – बटाटा, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इत्यादी
4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ) ……………… मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.
उत्तर :
जीवनसत्त्वां मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.
आ) कॅल्शिअममुळे आपली हाडे ……………… होतात.
उत्तर :
कॅल्शिअममुळे आपली हाडे मजबूत होतात.
इ) गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या ………………… असतात.
उत्तर :
गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात.
ई) सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला ………………… आहार म्हणतात.
उत्तर :
सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.
5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो ?
उत्तर :
पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेला शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते.
आ) तंतुमय पदार्थाचे स्त्रोत कोणते ?
उत्तर :
फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थाचे स्त्रोत आहेत.
इ) कर्बोदके कशाला म्हणतात ?
उत्तर :
पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात.
ई) कुपोषण कशाला म्हणतात ?
उत्तर :
आहारात काही अन्नघटकांची सतत कमतरता राहिल्याने शरीराचे नीट पोषण न होणे, यालाच कुपोषण असे म्हणतात.
6. जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) स्निग्ध पदार्थ | अ) ज्वारी |
2) प्रथिने | आ) तेल |
3) जीवनसत्त्वे | इ) धान्याचा कोंडा |
4) खनिजे | ई) कडधान्ये |
5) पिष्टमय पदार्थ | उ) लोह |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) स्निग्ध पदार्थ | आ) तेल |
2) प्रथिने | ई) कडधान्ये |
3) जीवनसत्त्वे | इ) धान्याचा कोंडा |
4) खनिजे | उ) लोह |
5) पिष्टमय पदार्थ | अ) ज्वारी |