संदेशवहन व प्रसार माध्यमे स्वाध्याय
संदेशवहन व प्रसार माध्यमे स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1. प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा.
उत्तर :
प्रसारमाध्यमे शिक्षण क्षेत्रात वरदान ठरले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयावरील माहिती टेलीव्हीजन, वृत्तपत्रे यातून प्रसिद्ध केली जाते. कोणते विषय बदलणार आहेत, कोणत्या विषयात बदल करण्यात आला आहे. याविषयीची सविस्तर माहिती प्रसार माध्यमातून दिली जाते. तसेच काही शैक्षणिक उपक्रम शासनातर्फे राबविले जातात. त्याची ही माहिती मिळते. शासन विद्यार्थ्यांना काही सवलती देतात. ते देखील प्रसारमाध्यमामार्फत आपल्याला माहीत होते.
2. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे ?
उत्तर :
दुरध्वनीच्या वापरापूर्वी अति प्राचीन काळी संदेश पोहचविण्याचे काम व्यक्ती करत, त्यानंतर कबुतराद्वारे संदेश पाठविला जात, कबुतरानंतर दवंडी पिटवून संदेश पोहचविण्यासाठी प्रथा सुरू झाली. नंतरच्या काळात टपाल व तार सेवा या सुविधेचा विकास झाल्याने पत्राद्वारे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचविणे जास्त सोईचे झाले. आता दूरध्वनीच्या वापरामुळे संदेश पोहचविणे फारच सोपे झाले आहे.
3. संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला ?
उत्तर :
आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेट हे जागतिक स्तरावरचे संगणकाचे जाळे आहे. यामध्ये संगणकाचा वापर करणाऱ्यांमध्ये माहितीचे आदान-प्रदान होत असते. लोकांचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. विविध योजनांची माहिती मिळते, तत्त्वज्ञान जाणून घेता येते. त्यामुळे लोकांच्या ज्ञानाचा विस्तार होतो. विद्यार्थी जगातील कोणत्याही प्रकारचा अभ्यास करू शकतात. अशाप्रकारे संगणकामुळे मानवी जीवनात बराच मोठा फरक पडला आहे.