कवितेची ओळख स्वाध्याय

कवितेची ओळख स्वाध्याय

कवितेची ओळख स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. खालील चौकटी पूर्ण करा.

अ) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ.

उत्तर :

कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं.

आ) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत.

उत्तर :

कुटुंबातील सर्वजण कवितेत संभाषण करू लागले.

इ) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण.

उत्तर :

पद्यातील संभाषण म्हणजे कविता नव्हे. खरी कविता वेगळीच असते हे सुधीरला समजावे म्हणून.

ई) कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण.

उत्तर :

सुधीरने शांता शेळके, नारायण सुर्वे, ग. दि. माडगूळकर, बालकवी, या कवींच्या कविता वाचल्या. त्यामुळे त्याच्या मनात भावनांचे मोहोळ चेतल्याचे त्याने सांगितले.

प्रश्न. 2. पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.

उत्तर :

पाठातील सर्व पात्रांची अशी चुकीची कल्पना आहे की यमक जुळवले की कविता तयार होते. म्हणून सर्वजण साधीच वाक्ये बोलतात आणि त्यात यमक जुळवतात. उदा. आजी म्हणते, ‘घरामध्ये लावते सांजवात | भाजी करते आता कांद्याची पात.’ सुधीर म्हणतो, ‘ए माझी सुपर आजी | तुला आवडेल ती कर भाजी’ आजोबा म्हणतात, ‘मला द्या काठी नि चप्पल’ कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल’ आई म्हणते, ‘चिडता का हो माझ्यावर ?’ माया करावी सर्वावर’ बाबा म्हणतात, ‘अगं आई, अगं आई | पटकन खायला डे ना गं काही’ ताई म्हणते, ‘अंघोळ कर पटकन | नाष्टा कर चटकन’ इ.

प्रश्न. 3. या पाठातील आशयच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.

उत्तर :

एक छानसं एकत्र कुटुंब असतं. त्या कुटुंबात आजोबा, आजी, बाबा, आई, सुधीर व ताई असे घटक असतात. शाळेत सुधीरला बाईनी ‘काव्यप्रतिभा’ या विषयावर प्रकल्प दिला असतो. सुधीरला यातलं काहीच कळलेलं नसतं. सर्वजण जर कवितेत बोलले तर त्याला काही कळेल असं आजोबा सांगतात. त्या रात्री सर्वजण गद्य वाक्यात यमक जुळवून पद्यात बोलतात. बाबा रात्रपाळीच्या ड्यूटीवर जातात. दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात. ती वाचून सुधीरच्या भवन उचंबळून येतात. कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो. केवळ यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे. कवितेने भावना उचंबळून आल्या पाहिजेत. आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवे गार गालिचे पसरले पाहिजेत.

प्रश्न. 4. ‘आम्ही चित्र काढतो’ या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.

उत्तर :

हा वर्गातील संवाद आहे. जो लिहिण्याची गरज नाही.

प्रश्न. 5. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.

उत्तर :

‘शांताबाईची बाग अन् सुर्वेची गिरणी

गदिमांचे घर अन् बलकवींची फुलराणी

चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी.’

हा सुधीरने म्हटलेला काव्यसंवाद मला सर्वाधिक आवडला. कारण त्यात श्रेष्ठ कवींची नामावली तर आहेच पण त्यांची वैशिष्ट्येही सांगितली आहेत. शांताताई म्हणजे शांता शेळके. त्यांच्या कविता बागेतील फुलांसारख्या टवटवीत व रंगीबेरंगी आहेत. सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे. गिरणी म्हणजे ते कामगार कवी आहे. गदिमा म्हणजे ग. दि. माडगुळकर. त्यांचे गीतरामायण घराघरातून पोचले आहे. आणि बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता अजूनही अवीट आहे.

प्रश्न. 6. खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर :

खेळूया शब्दांशी

खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा.

1) खो देणे.

2) पाश सोडणे.

3) हेका धरणे.

4) भावनांचे मोहोळ चेतवणे.

उत्तर :

1) खो देणे – नकार देणे.

2) पाश सोडणे – बंधनातून मुक्त होणे.

3) हेका धरणे – हट्ट करणे.

4) भावनांचे मोहोळ चेतवणे – भावना जागृत करणे.

खेळ खेळूया

अ) खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.

(अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे, नावडतीचे मीठ अळणी, थेंबेथेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)

अ) फुशारकी मरणाऱ्याचा पराजय होतो.

उत्तर :

गर्वाचे घर खाली.

आ) एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले, की त्याला सोडून द्यायचे.

उत्तर :

कामापुरता मामा

इ) सर्वत्र परिस्थिती समान असणे.

उत्तर :

पळसाला पाने तीनच

ई) थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे.

उत्तर :

थेंबे थेंबे तळे साचे

उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे.

उत्तर :

आगीतून उठून फुफाट्यात पडणे.

ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.

उत्तर :

अति तेथे माती

ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती पसंत पडत नाही.

उत्तर :

नावडतीचे मीठ अळणी

आ) खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.

1) आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.

उत्तर :

आमचे मराठीचे सर (शिक्षक) इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर (बरोबरी) येत नसे.

2) सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात कालेली मला चालत नाही.

उत्तर :

सकाळचा चहा मला कपात (कपामध्ये) काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात (कमी) कालेली मला चालत नाही.

3) एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला.

दूरध्वनीवर ते मला म्हणाले, “सर आपण आमच्या शाळेला भेट द्या.” मी त्यांना विचारले, “काय भेट देऊ ?” ते शिक्षक म्हणाले, “ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.”

उत्तर :

एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला.

दूरध्वनीवर ते मला म्हणाले, “सर आपण आमच्या शाळेला भेट (मुलाखत) द्या.” मी त्यांना विचारले, “काय भेट (वस्तू) देऊ ?” ते शिक्षक म्हणाले, “ते शाळेला भेट (मुलाखत) दिल्यानंतर ठरवा.”

आपण समजून घेऊया

वाक्य म्हणजे काय, हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.

1) विधानार्थी वाक्य

ही वाक्ये वाचा.

अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.

आ) तो रोज व्यायाम करत नाही.

या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.

2) प्रश्नार्थी वाक्य

ही वाक्ये वाचा.

अ) तुला लाडू आवडतो का ?

आ) तुम्ही सकाळी कधी उठता ?

या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.

3) उद्गारार्थी वाक्य

ही वाक्ये वाचा.

अ) अरेरे ! फार वाईट झाले.

आ) शाबास ! चांगले काम केलेस.

या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.

4) आज्ञार्थी वाक्य

ही वाक्ये वाचा.

अ) मुलांनो, रांगेत चला.

आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.

या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.

वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

उत्तर :

1) मी पाणी पितो. (विधानार्थी)

2) तू जेवतोस का ? (प्रश्नार्थी)

3) वा ! छान नृत्य केलंस. (उद्गारार्थी)

4) नील, अभ्यास कर. (आज्ञार्थी)

Leave a Comment