दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. ओळखा पाहू.

1) सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत –

उत्तर :

आईचे नाव

2) कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव –

उत्तर :

कुंतल

2. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा.

पल्लव कांची
……………ऐहोळ, बदामी, पट्टदकल
सातवाहन……………

उत्तर :

पल्लव कांची
चालुक्य ऐहोळ, बदामी, पट्टदकल
सातवाहनपैठण, भोकरदन, वेरूळ

3. खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा.

सातवाहन, पांड्य, चालुक्य, वाकाटक, पल्लव, मदुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम, वातापी

अ.क्र. राजसत्ता राजधानी
1.
2.
3.
4.

उत्तर :

अ.क्र. राजसत्ता राजधानी
1. सातवाहन प्रतिष्ठान (पैठण)
2. पांड्यमदुराई
3. चालुक्य वातापी
4. पल्लव कांचीपुरम

4. पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हांला काय माहिती ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

i) अजिंठा लेणी – औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस (100 कि.सी.) अजिंठा हे खानदेश व मराठवाडा यांच्या सीमेलगत असलेल्या सातमाळ पर्वतरांगेतील एक लहानसं गाव. या लेण्यांच्या भिंती सुंदर व अप्रतिम प्रसंगचित्रांनी चित्तारलेल्या आहेत. जगभर प्रसिद्ध असलेल्या या लेण्यांच्या निर्मितीस इ.स. पू. दुसऱ्या शतकात सुरुवात झाली. त्यांच्या निर्मितीचे काम अनेक वर्षे चालू होते. आज अस्तित्वात असलेली लेणी 9 व्या – 10 व्या शतकातील आहेत.

ii) कार्ले येथील चैत्यगृह – पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) 4-5 कि.मी. अंतरावरील कार्ले येथे प्रसिद्ध चैत्यगृह आहे. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य, मूर्ती व हत्तींची शिल्पे सुंदर आहेत.

iii) वेरूळ येथील कैलास लेणी – वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. स्थापत्य, मंदिरस्थापत्य, शिल्पकला या सर्वच दृष्टीनी ही लेणी अजोड आहे. हे एकपाषाणी मंदिर आहे. गोपूर, नंदीमंडप, ध्वजस्तंभ, मुख्य मंडप, गाभारा, शिखर, लंकेश्वर मंदिर, सरिता मंदिर इ. वास्तू येथे प्रेक्षणीय आहेत.

5. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या ?

उत्तर :

दक्षिणेतील चेर, पांड्य आणि चेळ या प्राचीन राजसत्ता होत्या.

2) मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले.

उत्तर :

मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाले.

6. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा.

उत्तर :

i) महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता.

ii) त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला.

iii) तो स्वत: नाटककार होता.

2) त्रिसमुद्रतोयपीतवाहन म्हणजे काय, ते स्पष्ट करा.

उत्तर :

i) तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन.

ii) ‘ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्याले आहे’, असा त्याचा अर्थ होतो.

iii) तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर.

3) मुझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे ?

उत्तर :

i) ‘मुझिरीस’ हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते.

ii) मुझिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे.

Leave a Comment