गोधडी स्वाध्याय

गोधडी स्वाध्याय

गोधडी स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

गोधडी या पाठावरती MCQ टेस्ट द्यायची असे तर पुढील लिंक वरती क्लिक करा.

https://swadhyaybooks.com/2025/01/godhadi_prashn_uttre/

प्रश्न. 1. आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा.

अ) ……….. आ) ……….. इ) ………… ई) …………..

उत्तर :

अ) आईची गोधडी शिवत असते.

आ) गोधडीत चिंध्या दाटीदाटीने बसवते.

इ) चिंध्या स्मृतीच्या सुईने शिवते.

ई) नवऱ्याच्या फाटक्या धोतराचे किंवा त्याने घेऊन दिलेल्या फाटक्या लुगड्याने अस्तर लावते.

प्रश्न. 3. तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

उत्तर :

आमच्या घरी एक जुनी आजोबांची छत्री आहे. पावसात जवळपासच जायचे असेल तर मी तीच छत्री घेऊन जातो. कारण पावसात आजोबा मला नेहमी त्याच छत्रीच न्यायचे. मी ओला होऊ नये एवढा भाग माझ्याकडे धरायचे. त्यामुळे स्वतः ओले व्हायचे. ती छत्री घेऊन मी चाललो की आजोबाच मला छत्रीतून घेऊन जात आहेत, असा मला भास होत राहतो.

प्रश्न. 4. आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा.

उत्तर :

i) मायेला मिळणारी ऊब.

ii) आईने दटावून बसवलेल्या (चिंध्या).

iii) स्मृतीच्या सुईने शिवलेले.

प्रश्न. 5. खालील ओळींतील भाव स्पष्ट करा.

अ) ‘गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.’

उत्तर :

ज्यांची दुलई किंवा ब्लँकेट घेण्याची ऐपत नसते असे गरीब लोक आपल्या मुलाबाळांना थंडी वाजू नये म्हणून गोधडी शिवतात. पण दुलईत जे प्रेम नसते ते या गोधडीत असते. कारण गोधडीला जे अस्तर असते ते आईच्या फाटक्या लुगड्याचे किंवा बापाच्या फाटक्या धोतराचे असते. त्यामुळे गोधडी अंगावर घेणे म्हणजे आईवडिलांच्या प्रेमळ कुशीतच झोपणे होय. ते गरीब असेल तरी गोधडीच्या अस्तराच्या रूपाने आपल्यावर मायेचा हात फिरवून ऊब देत असतात.

आ) ‘गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.’

उत्तर :

गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. कारण त्यात आईवडिलाचे प्रेम असते, माया असते. त्यामुळे गोधडी केवळ ऊबच देत नाही तर मायेची ऊब देत असते.

लिहिते होऊया

‘गोधडीचे आत्मकथन’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा.

उत्तर :

माझे नाव गोधडी. मला वाकळ असेही म्हणतात. माझा जन्म एका गरीब शेतमजुराच्या घरी झाला. श्रीमंत लोकांच्या घरी मी कधीच जन्म घेत नाही. माझ्या झोपडीच्या अवतीभवती अशाच शेतमजुरांची घरे आहेत.

आमच्या घरी एक लहानगे बाळ होते. एकदा गंमतच झाली. ते बाळ अचानकच खूप रडू लागले. आईने त्याला दूध देण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते नाकारले. त्याचे आपले रडणे सुरूच होते. मग आईने त्याला कोणती तरी खेळणे दिले. तेही त्याने घेतले नाही. मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले. तेव्हा त्याने रडणे थांबवले. आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी. तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला. रात्रभर तो माझ्या कुशीतच दडून होता.

माझ्या जन्माचीही एक कहाणी आहे. आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या. त्यात तिच्या कधीकाळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या झालेले लुगडे होते. बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते. मामानं तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंध्या होत्या. त्या चिंध्या तिने एकत्र गोळा केल्या. त्यातून माझा जन्म झाला. मला झोपडीतच राहणे आवडते. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे.

“राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या”

आपण समजून घेऊया

1) यमक अलंकार

खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर/शब्दांच्या जोड्या शोधा.

अ) नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी

रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी

उत्तर :

नदीशी – झाडांशी

आ) आई, तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा;

शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा

उत्तर :

तान्हा – पान्हा

इ) कडीस जोडोनि दुज्या कडीला

मनुष्य बनवीतसे साखळीला

उत्तर :

कडीला – साखळीला

2) अनुप्रास अलंकार

खालील ओळींत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा.

अ) रजतनील, ताम्रनील

स्थिर पल जल पल सलील

उत्तर :

आ) संत म्हणति, ‘सप्त पदें सहवासें सख्य साधूशीं घडते’ |

उत्तर :

Leave a Comment