आश्वासक चित्र स्वाध्याय

आश्वासक चित्र स्वाध्याय

आश्वासक चित्र स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्रकवितेतील मूल्य आश्वासक चित्र दर्शविणाऱ्या ओळी

उत्तर :

कवितेचा विषय कवितेतील पात्रकवितेतील मूल्य आश्वासक चित्र दर्शविणाऱ्या ओळी
भविष्यकाळात स्त्री-पुरुष समानता येणार मुलगी, मुलगा व कवयित्री समता जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

2) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

1) तापलेले ऊन –

उत्तर :

तापलेले ऊन – उन्हाळा

2) आश्वासक चित्र –

उत्तर :

आश्वासक चित्र – आशादायी चित्र

3) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.

उत्तर :

अ. ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?’

आ. तशी हसून म्हणते ती, ‘आता तू’.

4) चौकट पूर्ण करा.

कवयित्रीच्या मनातील आशावाद –

उत्तर :

एका आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं,….. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकच हातात हात असेल दोघांचाही…… ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

5) कवितेतील खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.

अ) मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर –

उत्तर :

आव्हानाचा स्वीकार करणे.

आ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी –

उत्तर :

आत्मविश्वास

इ) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी –

उत्तर :

स्त्री – पुरुष समानता

6) काव्यसौंदर्य

अ) खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.

‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत होत असेल दोघांचाही’

उत्तर :

भातुकलीचे खेळ वेगळे आणि वास्तव जीवन वेगळे. पण भातुकलीच्या खेळातून त्या मुलांच्या मनावर उमटलेले संस्कार इतके घट्ट आहेत की प्रत्यक्ष जीवनात आणि संसारात स्त्री आणि पुरुष हातात हात घालून काम करतील. आजही आपण पाहतो की नवरा ऑफिसातून आल्यावर पत्नीला स्वयंपाक घरात पूर्ण सहकार्य करतो तर ती देखील गृहोद्योग किंवा नोकरी करून अर्था जनात सहकार्य करते.

आ) ‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :

मुलगी मुलगा म्हणते की, मी पुरुषाचं काम आणि घर संभाळणं ही दोन्ही कामं करू शकते. ती क्षमता माझ्यात आहे. पण ही क्षमता तुझ्यात आहे का ? असा प्रश्न विचारण्याचं कारण घर सांभाळण्याचं काम तो करू शकणार नाही असं तिला वाटत असतं.

इ) कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

कवितेतील मुलगा व मुलगी भविष्यातील विवाहित दांपत्याचे प्रतिनिधित्व करतात. विवाहानंतर कोणत्याही कामात. स्वयंपाक करायचा असेल तरीही तो दोघांनीही मिळून करावा. मुलांचा सांभाळही दोघांनी मिळून करावा. अशा स्त्री – पुरुष समानतेच्या विचारांचं ते प्रतिनिधित्व करतात.

ई) ‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.

उत्तर :

i) शिक्षण समान असावे. विषयात विविधता असावी. दोघांनाही कोणतेही विषय घेता यावेत. फक्त मुलींसाठी शाळा नकोत.

ii) संसारात आर्थिक समता हवी. पैसे मागण्याची पाळी तिच्यावर नको.

iii) बाळंतपणात दोघांनाही सुट्टी असावी कारण घर तो सांभाळतो.

iv) राजकारण, समाजकारण यात दोघांनाही समान स्वातंत्र्य असावे.

v) वडिलांच्या इस्टेटीवर तिचाही हक्क असावा.

vi) आई-वडीलांना खांदा देण्याचा मुलांइतकाच तिलाही हक्क असावा.

Leave a Comment