दुपार स्वाध्याय

दुपार स्वाध्याय

दुपार स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. तुलना करा.

कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
1)
2)
3)
4)

उत्तर :

कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
1) हातगाडीवाले हातगाडी सावलीत लावून काम देणाऱ्या शेठची वाट पाहत असतो. 1) डबा खाण्यासाठी लेखनिकांचे लक्ष घड्याळाकडे लागलेले असते. संगणक विश्रांतीच्या वेळी बाजूला ठेवलेले असते.
2) सायकलरिक्षावाले कुणी लांबची वर्दी देणारे येतील या आशेवर बसले असतात. 2) सहकाऱ्यांशी जिवाभावाच्या गप्पा मारत, सुख-दु:ख ‘शेअर’ करीत एकमेकांच्या डब्यांतल्या पदार्थाची चव घेत जेवण चाललेले असते.
3) कारखान्यात कामगारांची एक पाळी संपून दुसरी पाळी सुरू होते. 3) कुणी कार्यालयात काम करता करता दुपारी खुर्चीतच डुलकी घेतो.

प्रश्न. 2. कोण ते लिहा.

अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक –

उत्तर :

गाडीवान व सायकलरिक्षावाले

आ) दुपारला आनंद देणारा घटक –

उत्तर :

शाळेतील मुले

इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी –

उत्तर :

संगणकावर काम करणारे

ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक –

उत्तर :

दुपार

उ) मानवी जीवनक्रमातील दुपार –

उत्तर :

कर्तृत्वाचा काळ

ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ –

उत्तर :

आयुष्याची संध्याकाळ

प्रश्न. 3. आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 4. ‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.

उत्तर :

या विधानातील चेतनगुणोक्ती अलंकार आहे. अचेतन गिरिशिखरे मानवाप्रमाणे धापा टाकतात असे वर्णन आहे.

प्रश्न. 5. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

उदा., मित्र – दोस्त, मैत्री, सखा, सोबती = मैत्री

1) रस्ता – वाट, मार्ग, पादचारी, पथ

उत्तर :

पादचारी

2) पर्वत – नग, गिरी, शैल, शिखर

उत्तर :

नग

3) ज्ञानी – सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकर

उत्तर :

सुकर

4) डौल – जोम, ऐट, दिमाख, रुबाब

उत्तर :

जोम

5) काळजी – चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर

उत्तर :

जबाबदारी

प्रश्न. 6. स्वमत

अ) ‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.

उत्तर :

माझी मे महिन्यातील दुपार

मे महिन्यात शाळेला सुट्टी असते. त्यामुळे शाळेत जाणे किंवा अभ्यास करणे असा मनावर कोणताच ताण नसतो. दुपारी थोडी विश्रांती घेतो. थोड्याच वेळात माझे तीन मित्र ठरल्याप्रमाणे घरी येतात. आम्ही चौघांनीही प्रत्येक दिवशी कुणाकडे जायचे हे ठरवून घेतले आहे. तसे दुपारी आम्ही एकत्र जमतो. कधी संगणकावर बसून खेळ खेळतो तर कधी टीव्हीपुढे बसून चित्रपट पाहतो. आई नित्यनेमाने आम्हाला थंड सरबत देते. कधी कधी ती आमच्याकरिता मोठ्या आवडीने आईसक्रीम बोलवते. दुपारी आईसक्रीम खाण्याची मजा काही औरच असते. शिवाय कूलर असतोच.

आ) ‘दुपार’ या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.

उत्तर :

मला शाळेतील मधल्या सुट्टीचा प्रसंग अधिक आवडला कारण आम्ही जे करतो तेच लेखकाने लिहिले आहे. आमच्याही आईने डब्यात काय दिले आहे याची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. तो आम्ही पटापट खातो. राहिलेल्या थोड्या वेळात मस्तीही करतो. त्यामुळे हा प्रसंग वाचून ते सर्व दृश्य आमच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. म्हणून हा प्रसंग आम्हाला आवडला.

प्रश्न. 7. अभिव्यक्ती

अ) तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

उत्तर :

मला उन्हाळ्यातली सकाळ खूप आवडते. कारण परीक्षा संपलेल्या असतात. त्यामुळे टॅंकमध्ये पोहणे हा माझा आवडता कार्यक्रम मला मनसोक्त उपभोगता येते. पावसाळ्यात ढगांमुळे कधी कधी सूर्यच दिसत नाही. हिवाळ्यात सूर्यकिरणात उभे राहावेसे वाटते पण अभ्यास व शाळा यामुळे तसे करता येत नाही.

संध्याकाळजी खरी मौज हिवाळ्यात अनुभवता येते कारण उन्हाळ्यात संध्याकाळीही गरमी होत असते आणि पावसाळ्यात पाऊस कधी पडेल याचा नेम नसतो. हिवाळ्यात सूर्यास्त एक वेगळाच आनंद देत असतो.

आ) पाठात आलेल्या ‘दुपार’ च्या विविध रूपांचे वर्णन करा.

उत्तर :

दुपार जेव्हा शेतात जाते तेव्हा ती आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हा ही दुपार आईप्रमाणे प्रेमळ भासते. वडाच्या झाडावर दुपारी पक्षांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत विचारे पक्षीदेखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. तेव्हा जणू काय दुपार अंगाई गीत गात असते. आणखी उत्साहाने काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा असं प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत राहा असा संदेश देत असताना ही दुपार एखाद्या बापासारखी भासते.

Leave a Comment