या झोपडीत माझ्या स्वाध्याय

या झोपडीत माझ्या स्वाध्याय

या झोपडीत माझ्या स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा.

झोपडीतील सुखेमहालातील सुखे
1)
2)
1)
2)

उत्तर :

झोपडीतील सुखेमहालातील सुखे
1) पैसा नसल्यामुळे तिजोऱ्या नसतात आणि दाराला दोऱ्याही लावण्याची गरज नसते. निर्भयतेने झोपता येते.
2) जमिनीवर झोपून ताऱ्यांकडे पाहण्याचा आनंद मिळतो.
1) पैसा असल्यामुळे तिजोऱ्या असतात. पैशाने मिळणारी सर्व सुखे महालात मिळतात.
2) झोपायला मऊमऊ बिछाने असतात. प्रकाशाचा झगमगाट असतो.

प्रश्न. 2. आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 3. ‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.

उत्तर :

झोपडीत जमिनीवर झोपावे लागते म्हणजे भूमीचे सान्निध्य मिळते. झोपता झोपता ताऱ्यांकडे पाहता येते म्हणजे आकाशाचे व वृक्षांचेही सान्निध्य मिळते. बाहेरचा मोकळा वारा मिळत असतो. अशा रीतीने झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे.

प्रश्न. 4. ‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर :

सावकार आपला पैसा ज्यात ठेवतात त्याला काय म्हणतात ?

प्रश्न. 5. काव्यसौंदर्य.

अ) ‘पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’

या काव्य पंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर :

देवाचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो व स्वर्गात सर्व सुखे असतात अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हणतात, मनाची शांती हे माणसाचं सर्वात मोठं सुख असते. ते सुख श्रीमंत, सत्ताधीश, राजेलोक यांनाही त्यांच्या विवंचनेपायी मिळत नाही. असे सुख झोपडीत राहणाऱ्या मला सदैव मिळते. माझ्या झोपडीत मला इतके पराकोटीचे सौख्य लाभते की माझी सुखे पाहून इंद्रालासुद्धा माझ्या सुखाचा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार वरील ओळींतून व्यक्त होत आहे.

आ) ‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’

या काव्य पंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तुत कवितेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लहानश्या झोपडीतही शांतिसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन अतिशय समर्पक शब्दांत केले आहे. जे श्रीमंत असतात ते आपलं धन तिजोरीत ठेवतात. पण त्यांना चोरांची सदैव भीती वाटत असते आणि त्या चिंतेने त्यांना धड सुखाची झोपही लागत नाही. उलट झोपडीत राहणाऱ्यास चोरांची भीतीच नसते कारण त्यांच्याकडे धनच नसते. त्यांच्या झोपडीच्या दाराला कुलूपच काय पण दोऱ्याही नसतात. त्यामुळे त्यांना निश्चितपणे सुखाची झोप लागते.

झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

उत्तर :

झोपडी : तू महाल आणि मी मात्र झोपडी. तरी मी तुझ्यापेक्षा अधिक सुखी आहे.

महाल : फालतू बकवास करू नकोस. माझ्या जवळ पैसा आहे. तुझ्याजवळ ?

झोपडी : माझ्याजवळ पैसा नाही म्हणून तर मला तुझ्यासारखी चोरांची भिती, विवंचना नाही.

महाल : तुझ्याजवळ मऊमऊ गाद्याही नाहीत.

झोपडी : नसतील, पण निश्चित झोप मात्र मलाच येते.

महाल : माझ्याकडे नोकरचाकर आहेत.

झोपडी : म्हणूनच सामान्य माणसाला तुझ्याकडे यायला मज्जाव असतो.

महाल : खरं आहे. मी कबूल करतो की माझ्यापेक्षा तूच अधिक सुखी आहेत.

उजळणी तक्ता पूर्ण करा.

उपमेय – आईचे प्रेम उपमान – सागरउपमेय – आंबा उपमान – साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.
रूपक वात्सल्यसिंधू आई.

उत्तर :

उपमेय – आईचे प्रेम उपमान – सागरउपमेय – आंबा उपमान – साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.आंबा साखरेसारखा गोड असतो.
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.आंबा म्हणजे जणू साखरच.
रूपक वात्सल्यसिंधू आई.साखररूपी आंबा.

Leave a Comment