सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा स्वाध्याय
सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) सुविधांचा वापर आपण …………….. केला पाहिजे.
उत्तर :
सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे.
आ) आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे ………………. असते.
उत्तर :
आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते.
इ) शाळेच्या जडणघडणीत ……………….. वाटा असतो.
उत्तर :
शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो.
2) पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत ?
उत्तर :
पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक इत्यादी महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत.
आ) सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते ?
उत्तर :
सार्वजनिक सेवा, या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते.
इ) प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे ?
उत्तर :
शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलींचा हक्क आहे.
3) पुढील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो ?
उत्तर :
आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो
i) बस, रेल्वे, विमान, रिक्षा, टॅक्सी इत्यादी वाहतुकीच्या सुविधा.
ii) टपालसेवा, दूरध्वनी अशा संपर्क सुविधा.
iii) अग्निशमन, पोलीस, बँक, नाट्यगृह बाग बगिचे, पोहण्याचे तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा.
आ) शाळेत शिक्षक-पालक आणि माता-पालक संघ का असावेत ?
उत्तर :
i) शिक्षक-पालक व माता-पालक संघांमुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकत.
ii) शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो.
iii) या संघांमुळे शाळेच्या समस्य सोडवता येऊ शकतात. तसेच विद्यार्थ्याच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकांपुढे ठेवता येतात.
म्हणून शाळेत शिक्षक-पालक आणि माता-पालक संघ असावेत.
4) काय होईल ते लिहा.
अ) मुलामुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही, तर.
उत्तर :
मुला-मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही; तर प्रामुख्याने मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कम होईल. अल्पशिक्षित वा निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल. समाजाचा समतोल विकास होणार नाही.
आ) समाजाने शाळेला मदत केली नाही; तर.
उत्तर :
समाजाने शाळेला मदत केली नाही; तर शाळा विद्यार्थ्याना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्याची प्रगती होणार नाही. शाळेच्या समस्या वाढत जातील.
इ) सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला; तर
उत्तर :
सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला; तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना वा शासनास शक्य होईल. त्यांचा दर्जा चांगला राहील. त्याच त्या गोष्टींवर खर्च होणार नाही. त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल.