कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय

कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय

कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ) प्रामाणिकपणा ही आपली ……………. असते.

उत्तर :

प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते.

आ) सामाजिक जीवनात सर्वाना ……………….. गरज असते.

उत्तर :

सामाजिक जीवनात सर्वाना सहकार्याची गरज असते.

इ) आपल्या देशात ………………… वृत्तीला विशेष महत्त्व आहे.

उत्तर :

आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे.

ई) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वाना ……………….. करता येते.

उत्तर :

समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वाना प्रगती करता येते.

2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात ?

उत्तर :

परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वानी मिळून घ्यायचे असतात.

आ) सहिष्णुता म्हणजे काय ?

उत्तर :
आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे, म्हणजे सहिष्णुता होय.

इ) स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय ?

उत्तर :

मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता, दोघांनाही समान मानणे, म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय.

ई) स्त्री-पुरुषांच्या समान गरजा कोणत्या ?

उत्तर :

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान गरजा आहेत.

3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो ?

उत्तर :

i) कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी, मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात. तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात.

ii) आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो.

iii) घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वाना पटतील असे निर्णय घेतो.

अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत आपण सहभागी होतो.

आ) सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते ?

उत्तर :

i) मित्र-मैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणिवा आपल्याला दूर करता येतात.

ii) एकमेकांच्या विचारांत मतभिन्नता असली, तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे.

iii) आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते.

Leave a Comment