केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय

केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय

केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.

1) भारतातील कार्यकारी सत्ता ……………… यांच्याकडे असते.

(राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती)

उत्तर :

भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपती कडे असते.

2) राष्ट्रपतीचा कार्यकाल ………………. वर्षाचा असतो.

(तीन, चार, पाच)

उत्तर :

राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.

3) मंत्री मंडळाचे नेतृत्व ……………. करतात.

(पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती)

उत्तर :

मंत्री मंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात.

प्रश्न. 2. ओळखा आणि लिहा.

1) राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव –

उत्तर :

संसद

2) अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ हा या नावाने ओळखला जातो –

उत्तर :

शून्यकाळ

प्रश्न. 3. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

1) महाभियोग प्रक्रिया

उत्तर :

राष्ट्रपतीचे वागणे जर संविधानाचा भंग करणारे असेल तर राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. याला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. संसदेत कोणतेही एक सभागृह महाभियोगाचा प्रस्ताव ठेवते. त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते. दोन्ही सभागृहांच्या 2/3 विशेष बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपती पदावरून दूर होतात.

2) अविश्वास ठराव

उत्तर :

मंत्रिमंडळाला संसदेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार काम करू शकते. सदस्यांनी हे बहुमत काढून घेतल्यास सरकार सत्तेवर राहू शकत नाही, आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही; असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने सिद्ध झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.

3) जम्बो मंत्रिमंडळ

उत्तर :

जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ. आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार खूप मोठा ठेवण्याकडे कल होता. काही वेळा आघाडीची सरकारे तयार होतात. यामध्ये सामील सर्व घटकपक्षांच्या उमेदवारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवावा लागतो. अशा प्रकारे मंत्रिमंडळाचा आकार वाढतो, यालाच जम्बो मंत्रिमंडळ म्हणतात.

प्रश्न. 4. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर :

i) कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेणे. त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करणे.

ii) शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, परराष्ट्र व्यवहार, अशा अनेक विषयांवर एक निश्चित धोरण व कार्याची दिशा ठरवणे.

iii) मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घेऊन खात्याचे धोरण संसदेत मांडणे व त्यावर चर्चा घडवून आणून ते मंजूर करून घेणे.

i) कायद्याची व धोरणाची अंमलबजावणी करणे.

2) संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते ?

उत्तर :

संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. हे नियंत्रणाचे मार्ग पुढीलप्रमाणे –

चर्चा व विचारविनिमय : कायद्याच्या निर्मितीदरम्यान त्यावर संसद चर्चा व विचारविनिमय करतात व मंत्रिमंडळाला धोरणातील त्रुटी किंवा दोष दाखवून देतात. त्यामुळे कायदा निर्दोष होण्यास मदत होते.

प्रश्नोत्तरे : संसदेच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराने होते. संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते. हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रभावी मार्ग आहे.

शून्य प्रहर : अधिवेशन काळात दुपारी 12 चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या काळात सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येते.

अविश्वास ठराव : लोकसभेत बहुमत असेपर्यंत सरकार काम करते. संसद सदस्यांनी पाठिंबा काढून घेतल्यास विरोधी पक्ष अविश्वास ठराव मांडू शकतात. तो बहुमताने मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अशा प्रकारे संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते.

प्रश्न. 5. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

Leave a Comment