वारली चित्रकला स्वाध्याय

वारली चित्रकला स्वाध्याय

वारली चित्रकला स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो ?

उत्तर :

महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांत वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृण्मूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तु यांचा समावेश होतो. या सर्वातून आदिवासी कलांचा समृद्ध वारसा दिसून येतो. हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे.

आ) आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात ?

उत्तर :

आदिवासी लोक चित्रे काढताना तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक या साहित्याचा उपयोग चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी ते साधे रफ ‘स्केच’ देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात.

इ) वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात ?

उत्तर :

वारली चित्रकार झाडे रंगवतात नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते.

ई) वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकरांतून काय घेतले ?

उत्तर :

वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारांतून वाक आणि वळणे घेतली. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्र काढत असतात.

उ) वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे ?

उत्तर :

वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते. आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो.

प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत.

उत्तर :

वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्गसंपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूला परिसर, परिसरातील पशुपक्षी, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयाला धरून भित्तीचित्रे रेखाटलेली आहेत.

आ) वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दुष्टिकोन कसा मांडतात ?

उत्तर :

वारली चित्रकार झाडाची चित्रे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. त्यातून अगदी सहजपणे झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना याच्या नेमके उलटे म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्युख जीवन असते. वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन असा मांडतात.

प्रश्न. 3. शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढायची आहेत. त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल ?

उत्तर :

i) एक मुलगी पाणी प्यायल्यावर नळ बंद करीत आहे.

ii) एक मुलगा काचेच्या ग्लासातून पाणी प्यायल्यावर ग्लासात उरलेले पाणी फेकू पाहतो. दुसरा मुलगा त्याला अडवत आहे.

iii) काही मुले वर्ग आणि खेळाचे मैदान झाडत आहेत.

iv) ‘स्वच्छ भारत’ हा फलक घेऊन विद्यार्थ्याचा मोर्चा निघाला आहे.

शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर काढावयाच्या चित्रांसाठी आम्ही हे विषय सुचवू.

प्रश्न. 4. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे क म्हटले आहे.

उत्तर :

आजकाल टी शर्टस, साडी, कुर्ता, बेडशीटस्, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. म्हणून वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे म्हटले आहे.

खेळूया शब्दांशी

अ) हे शब्द असेच लिहा.

पशुपक्षी, पाषाणमूर्ती, प्रमाणबुद्ध, शास्त्रशुद्ध, उदयोन्मुख, संस्कृती, इंद्रधनुष्य, सृष्टीला, चित्राकृती, भित्तिचित्रे, अर्धवर्तुळ, भौमितिक.

उत्तर :

पशुपक्षी, पाषाणमूर्ती, प्रमाणबुद्ध, शास्त्रशुद्ध, उदयोन्मुख, संस्कृती, इंद्रधनुष्य, सृष्टीला, चित्राकृती, भित्तिचित्रे, अर्धवर्तुळ, भौमितिक.

आ) ‘घरदार’ या शब्दासारखे पाठातील जोडशब्द शोधून लिहा.

उत्तर :

पशुपक्षी, नदीनाले, वृक्षवेली, आगळेवेगळे.

इ) खालील शब्दांची फोड करा.

उत्तर :

शोध घेऊया

आ) आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत असणाऱ्या आदिवासी जमातींची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या. उदा., आदिवासी जमातींची नावे, पोशाख, सण, लोकगीते, लोककला, नृत्य, घरे इत्यादी.

उत्तर :

आदिवासी जमातीची नावे –

i) सह्याद्री विभागातील – नाशिक, रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर, पुणे इ. जिल्ह्यात मल्हार कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकूर दुबळा, धोडिया.

ii) सातपुडा विभाग – धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नांदेड या जिल्ह्यात कोकणा, पावरा, गामीत, गावीत, भिल्ल, कोरकू, धानका, पारधी, नायकडा, राठवा इ.

iii) गोंडवन विभाग – चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात गोडं, आंध, कोलाम, परधान, हळबा-हबळी,कावर थोटी-थोट्या, कोरकू, माडिया, राजगोंड इ.

आदिवासींचा पोशाख – पूर्वी आदिवासी आपले विशिष्ट अंग झाकले जाईल इतकेच कपडे घालायचे. ते साडी, लुगडे, चोळी, धोतर, पागोटे असा पोशाख गुडघ्यापर्यंत घालत असे. परंतु आता मात्र शहरीकरणाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या पोशाखात बदल झाला आहे.

आदिवासींचे सण – आदिवासी विशेष करून होळी, दिवाळी हे सण साजरे करतात.

आपण समजून घेऊया

खालील शब्दसमूहातील नाम व विशेषण यांचे सारणीनुसार वर्गीकरण करा.

पिवळसर गुलाब, मोठा चेंडू, मसालेदार भाजी, लालचुटूक कळी, स्वच्छ रुमाल, टवटवीत चेहरा, निळेशार पाणी, रागीट घोडा.

नाम विशेषण
1) गुलाब
2) चेंडू
3) भाजी
4) कळी
5) रुमाल
6) चेहरा
7) पाणी
8) घोडा
1) पिवळसर
2) मोठा
3) मसालेदार
4) लालचुटूक
5) स्वच्छ
6) टवटवीत
7) निळेशार
8) रागीट

खालील वाक्यांत मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा.

(पांढरे, प्रचंड, भव्य, जाडेभरडे, आंबट)

1. समुद्रात ………………… लाटा उसळतात.

उत्तर :

समुद्रात प्रचंड लाटा उसळतात.

2. तिच्या अंगावर ……………….. कपडे होते.

उत्तर :

तिच्या अंगावर जाडेभरडे कपडे होते.

3. मला ……………… फूल आवडते.

उत्तर :

मला पांढरे फूल आवडते.

4. मी खाल्लेची संत्री ……………… होती.

उत्तर :

मी खाल्लेची संत्री आंबट होती.

5. आबासाहेबांनी …………………. वाडा बांधला.

उत्तर :

आबासाहेबांनी भव्य वाडा बांधला.

पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. चित्रात एकूण किती मुले आहेत ?

उत्तर :

तीन

2. चित्रात किती मांजरे आहेत ?

उत्तर :

एक

3. मांजराच्या कितीपट मुले आहेत ?

उत्तर :

तिप्पट

4. घरावर किती आहेत ?

उत्तर :

असंख्य, खूप

खाली दिलेल्या वाक्यांत योग्य विरामचिन्हे घ्याला.

अ) अहमद कुठे गेला आहे

उत्तर :

अहमद कुठे गेला आहे ? (प्रश्नार्थक चिन्ह)

आ) ढग खूप गर्जत होते पण पाऊस पडला नाही

उत्तर :

ढग खूप गर्जत होते पण पाऊस पडला नाही. (पूर्णविराम)

इ) शर्वरी आंबा खाते

उत्तर :

शर्वरी आंबा खाते. (पूर्णविराम)

ई) बापरे केवढी मोठी ही गुहा

उत्तर :

बापरे ! केवढी मोठी ही गुहा ! (उद्गारवाचक चिन्हे)

उ) प्रामाणिक हुशार मेहनती मुले सर्वाना आवडतात

उत्तर :

प्रामाणिक, हुशार, मेहनती मुले सर्वाना आवडतात. (स्वल्पविराम व शेवटी पूर्णविराम)

Leave a Comment